कडूनिंब ही प्राचीन काळापासून एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. कडूनियाच्या पानाचा वापर धान्य साठविण्यासाठी होतो. तर तेलाचा उपयोग साबण तयार करण्यासाठी होतो. पिकांवर वाढत असलेला किडींचा प्रादुर्भाव यावर उपाय म्हणून शेतकरी रासायनिक किटकनाशकांचा वापर करतात. परंतु यापासुन मनुष्य व प्राण्यांना विषबाधा होवू शकते व पर्यावरणाला हानी पोहोचते.
तसेच या रासायनिक किटकनाशकाच्या वापरामुळे किटकनाशकाचा वापर करून आपण किडनियंत्रण करू शकतो. त्या वनस्पतीजन्य किटकनाशकाचा वापर करून आपण किडनियंत्रण करू शकतो त्या बनस्पतीजन्य किटकनाशकामध्ये निंबोळी अर्काचा देखील समावेश होतो.निंबोळ्या गोळा करून उन्हात वाडवून त्यापासून निंबोळी पावडर तयार करतात.
हेही वाचा : बळीराजांनो! खरीप हंगामात बीजप्रक्रिया करूनच करा पेरणी
निंबोळीपासून उत्तम प्रतिचे खत, किटकनाशके आपल्याला मिळतात. शेतकरी घरच्या घरी निबोळी अर्क तपार करू शकतात. निंबोडी अर्क तयार करण्याची पध्दती व त्यांचे किडींवर होणारे परिणाम पुढे दिले आहेत. निबोळ्यापासून नैसर्गिक, कमी खर्चाचे किटकनाशक तयार करण्यासाठी व त्यापासून पैशाचा योग्य मोबदला मिळविण्यासाठी निंबोळ्या गोळा करण्याची व त्यापासून निंबोळी अर्क तयार करण्याची शास्त्रीय पध्दती.
-
कडूनिंबाच्या पिकलेल्या निंबोळ्या बांबुच्या सहाय्याने हलवून त्या गोळा करून घ्याव्यात. यासाठी झाडाच्या खाली जमीन स्वच्छ करुन पोते किंवा कापड अवश्य अंथरावे. जमिनीवर जास्त वेळ पडून राहिलेल्या नियोळ्या गोळा करू नये. कारण त्यामध्ये विचारी बुरशीचा प्रादुर्भाव असतो. या बियांचा डिग करून ठेवू नये.
-
स्वच्छ केलेल्या बिया खणखण आवाज येईपर्यंत वाढू द्याव्या. या बिया वळविल्यानंतर त्यात १० टक्के पर्यंत आद्रता असावी.
-
त्यानंतर त्या बियाची साठवण सच्छिद्र कापडी अथवा ज्युट पोत्यात साठवाव्या.
-
फवारणीच्या आदल्या दिवशी कडूनिंबाच्या विषांची टरफले उखळात फोडून प्यावेत. फोडलेल्या बियांचे टरफले सुपाचा वापर करुन साफ करून घ्यावीत.
-
निबोडीच्या बियातील गर घेवून त्याची रव्यासारखी भुक्टी तपार करावी.
-
१ किलो भुकटी ही ३-५ लिटर पाणी व १० मिली. या प्रमाणात अॅडयुर्वेट पेपून मिश्रण रात्रभर भिजत ठेवावे.
-
दुसऱ्या दिवशी सकाळी तयार झालेले मिश्रण स्वच्छ सुती कापडाने गावून घ्यावे व एकूण द्रावण २०-८० लिटर आवश्यक तीव्रतेनुसार द्रावण करावे.
-
तयार केलेले किटकनाशक पंपात घेणून फवारणीसाठी वापरावे. तयार केलेले द्रावण त्याच दिवशी संपूर्णपणे फवारावे दोन फवारणीतील अंतर १० दिवस ठेवावे.
निंबोळी अर्काचे किडीवर होणारे परिणाम :-
निबोळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडीवर विविध प्रकारे होतो. काही किडी अर्काथ्या वासामुळे दुर जातात. तर काहींना अर्काची फवारणी मुळे पिक खाता येत नाही. निंबोळी अर्कामुळे बऱ्याचशा किडींचे नियंत्रण होत असून कडूनिंबाचे घटक किडींची तरुण अवस्थेतून प्रौड बनण्याची क्रिया बिघडविते तसेच त्यांची अंडी घालण्याची क्षमता कमी करते. पाने पोखरणाऱ्या अडीची वाङ बांबवते. तुडतुड्याची वाढ घटविते व अंड्याची संख्या कमी होते. निबोडीच्या अर्काची फवारणी केलेल्या झाडांवर ही किड बसत नाही. पांढऱ्या माशासाठी निबोडीच्या अर्काची जास्त फवारणी द्रावणाची तीव्रता वाढवते. अशा प्रकारे घरच्याघरी निंबोडी अर्क तयार करुन आपण किडीचे नियंत्रण करू शकतो.
पाच टक्के निंबोळी अर्क कोणत्या पिकात कोणत्या किडी करता व कोणत्या अवस्थेत वापरावा :-
शेतकरी बंधुंनो पाच टक्के निंबोळी अर्क सोयाबीन वरील सर्व पतंग वर्गीय किडी, कपाशी पिकावरील रस शोषणाऱ्या किडी तसेच सर्व प्रकारच्या बोंड अळ्या, तुरीवरील व हरभऱ्यावरील घाटे अळी, जवळ जवळ सर्व भाजीपाला भाजीपाल्यावरील किडी, मुग , उडीद भुईमूग पिकावरील पतंग वर्गीय कीडी संत्रा वर्गीय पिकातील काळी काळी माशी यासह ह् अनेक प्रकारच्या पिकावर शिफारशीप्रमाणे शिफारसीत किडींच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा घटक म्हणून प्रभावीपणे वापरता येतो सर्वसाधारणपणे मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी कपाशीवरील बोंड आळी उंट आळी तंबाखू वरील पाणी खाणारी अळी ज्वारीवरील व मक्यावरील खोडकिडा टोमॅटोवरील व इतर भाजीपाल्यावरील कीडी यांच्याकरता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून गरजेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन योग्यवेळी पिकात पीक संरक्षणासाठी त्याचा वापर करावा.
लेखक :-
अमरेश गजानन शेरेकर ,
शेतीशाळा प्रशिक्षक,
(नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प,मुंबई)
उपविभाग : अमरावती. ता. भातकुली. जिं.अमरावती.
Published on: 14 May 2021, 06:56 IST