Agripedia

निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून, ज्यांना निंबोळ्या (किंवा निंबोण्या) म्हणतात, काढलेला अर्क होय. कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले 'झाडिराक्टीन' कीटकनाशकाचे काम करते. या घटकाचे प्रमाणाच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असते, तर ते पानांमध्ये प्रमाणात असते. या निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो.

Updated on 16 July, 2021 9:13 AM IST

निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून, ज्यांना निंबोळ्या (किंवा निंबोण्या) म्हणतात, काढलेला अर्क होय. कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले 'झाडिराक्टीन' कीटकनाशकाचे काम करते. या घटकाचे प्रमाणाच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असते, तर ते पानांमध्ये प्रमाणात असते.

या निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो. मावा, अमेरिकन बोंड अळ्या, तुडतुडे पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, कोबीवरील अळ्या, फळमाश्या, लिंबावरील फुलपाखरे, खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो.

फवारणीची वेळ

निंबोळीच्या अर्काची फवारणी संध्याकाळचे वेळेस म्हणजे दुपारी ४ वाजता नंतर करणे योग्य असते. हा तयार केलेला फवारा झाडावर कुठेही पडला तरी तो आंतरप्रवाही असल्यामुळे पूर्ण झाडात पोहोचतो.

निंबोळी अर्क घरी कसा तयार करावा..?

हा अर्क घरी तयार करण्याच्या तीन पद्धती आहेत...
*पद्धत १*
निंबोळ्या झाडाखालून वेचून घ्याव्यात व त्यावरील साल काढून त्या उन्हात वाळवाव्यात.सुमारे ५० ग्राम अशा बिया घेऊन त्याची बारीक पूड करून त्या एका कपड्यात बांधाव्या. तो कपडा एक लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावा. त्याने निंबोळीचा अर्क पाण्यात उतरतो. हा अर्क भाजीपाला अथवा पिकांवर फवारल्यास किडींचा बंदोबस्त होतो.

 

पद्धत २*
दोन किलो निंबोळ्या वाटून बारीक कराव्या.त्यात १५ लिटर पाणी टाकून ते मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे. दुसरे दिवशी त्यास नीट तलम फडक्याने गाळून घेऊन त्याची मग फवारणी करावी. याद्वारे भुंगेरे, फळावरील पाने खाणाऱ्या अळ्या याचा बंदोबस्त करता येतो.
*पद्धत ३*
५ किलो निंबोळ्या ह्या बारीक करून कपड्यात बांधून ती सुमारे १२ तास पाण्याने भरलेल्या बादलीत ठेवाव्यात. मग त्या काढून त्यात जरुरीप्रमाणे १०० ते २०० ग्राम साबणाचा चुरा टाकावा अथवा साबणाची पेस्ट करून त्यात मिळवावी. याला चांगले ढवळून घ्यावे. नंतर हे मिश्रण १०० लिटर बनेल इतके पाणी त्यात टाकावे.

याच्या फवारणीने हरबऱ्यावरील घाटे अळीचा बंदोबस्त करता येतो.या अशा प्रकारे तयार झालेल्या द्रावणास ५% द्रावण असे म्हणतात.

लेखक - राजेश डावरे

English Summary: Neem extract - an excellent pest resistant, learn how to prepare
Published on: 16 July 2021, 09:12 IST