Agripedia

सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती. रासायनीक शेती ही उत्पादनखर्च वाढवणारी आहे व मानवी आरोग्य व प्राण्यांचे आरोग्यास हानिकारक आहे त्याच बरोबर मातीचे ही उत्पादनक्षमता कमी होते त्यामुळे आता आपल्याला नैसर्गिक कीटकनाशके व नैसर्गिक टॉनिक वापरावे लागेल. त्यामध्ये जिवाणू पाणी गारबेज, सेंद्रिय युरिया, संजीवनी अर्क, ह्युमिक ऍसिड अशा प्रकारचे टॉनिक व कीटकनाशके वापरायचे आहे.

Updated on 22 June, 2021 11:41 AM IST

सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती.

रासायनीक शेती ही उत्पादनखर्च वाढवणारी आहे व मानवी आरोग्य व प्राण्यांचे आरोग्यास हानिकारक आहे त्याच बरोबर मातीचे ही उत्पादनक्षमता कमी होते त्यामुळे आता आपल्याला नैसर्गिक कीटकनाशके व नैसर्गिक टॉनिक वापरावे लागेल. त्यामध्ये जिवाणू पाणी गारबेज, सेंद्रिय युरिया, संजीवनी अर्क, ह्युमिक ऍसिड अशा प्रकारचे टॉनिक व कीटकनाशके वापरायचे आहे.

जिवाणूपाणी / कल्चर : एकरी पाणी १८० लीटर + देशी गायीचे शेण ५ किलो + देशी गायीचे गोमुत्र ५ लिटर + गुळ २ किलो + राख ( अग्निहोत्राची असेल तर सर्वोत्तम ) २ किलो + माती ( रस्त्याकडचा फुफूटा) २ किलो हे सर्व मिश्रण एकत्र करून ७ दिवस ठेवणे .७ ते २१ दिवसापर्यंत वापरता येते

 

गारबेज – ( ९० दिवसाचा फॉर्मूला ) गोड फळे १० किलो+ गुळ ३.५ किलो + पाणी ३५ लिटर हे सर्व मिश्रण एकत्र करून बॅरल मध्ये पॅक करून ठेवणे.

 

पहिले ३० दिवस दररोज एकवेळ त्यामधील गॅस काढणे. दुसऱ्या ३० दिवसापर्यंत ४ दिवसातुन एक वेळ गॅस काढणे. शेवटच्या ३० दिवसात ८ दिवसातुन एकदा गॅस काढणे. प्रमाण फवारणी करीता १ लीटर पाण्यास १ मिली गारबेझ. आळवणी करीता १ लीटर पाण्यास ५ मिली गारबेझ.

 

सेंद्रीय युरीया – एकरी २ किलो कॉंग्रेस गवत + १०० ग्रँम ईष्ट पावडर किंवा २ लिटर D कंपोजर + देशी गायीचं गोमूत्र ४ लिटर + पाणी १० लिटर हे सर्व मिश्रण एकत्र करून २० दिवस ठेवावे दररोज सकाळ संध्याकाळ काडीने ढवळावे. २० दिवसानंतर तयार होते.

 

गारबेज – ( १५ दिवसाचा फॉर्मूला ) यामध्ये वरील सर्व निविष्ठासोबत ईष्ट पावडर १०० ते १५० ग्रँम वापरावी. पाण्याऐवजी D कंपोजर वापरू शकता.

 

संजीवनी अर्क – देशी गायीचे गोमूत्र ५ लीटर + मैदा १ किलो + तांदळाचे पिठ १ किलो + गुळ १ किलो हे मिश्रण एकत्र करून ८ दिवस ठेवावे. ८ दिवसानंतर त्या मधील १ लिटर विरजण घ्यावे व त्यात ४ लिटर देशी गायीचे गोमूत्र व २५० ग्रॅम गुळ टाकून परत ८ दिवस ठेवून नंतर वापरावयास घ्यावे.

 

प्रमाण – प्रति पंप ८० ते १५० मिली आळवणी एकरी ५ लिटर .

अग्निहोत्राची राख १०० ग्रॅम १ लीटर देशी गायीच्या गोमुत्रामध्ये १२ ते २४ तास भिजत ठेवुन त्यानंतर १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकाच्या फूलकळी अवस्थेमध्ये गोमूत्राऐेवजी ताक वापरावे. याचे अद्भुत परीणाम मिळतात.

 

ह्यूमिक अॅसीड – एकरी देशी गायीच्या २० लिटर गोमुत्रामध्ये ५ लिटर ताक टाकावे या मिश्रणामध्ये तिसऱ्या दिवशी २०० ते ३०० ग्रॅम गुळ टाकून ७ दिवसाच्या आत वापरावे.

 

जनावराची वार( देशी गायीची सर्वोत्तम ) एका ड्ममध्ये २० लीटर पाणी + २ लीटर D कंपोजर + २० लीटर देशी गायीच गोमुत्र हे सर्व एकत्र वारेचे पाणी होईपर्यंत ठेवणे.

 

 

प्रमाण – फवारणीसाठी प्रती पंप २०० मिली आळवणी एकरी ३ते ४ लिटर

 

 करपा – एकरी १०० ग्रॅम बाभळीचा पाला २ लीटर पाण्यात टाकून १ लिटर होईपर्यंत शिजवावे गार झाल्यानंतर त्यामध्ये देशी गायीचे गोमूत्र १ लीटर टाकून फवारणी करावी . ६४ प्रकारच्या किडींवरती एकच औषध – २ किलो काँग्रेस गवत १० लीटर पाण्यात टाकून २.५ लीटर होईपर्यंत शिजवावे .

 

प्रमाण प्रती पंप १५ ते २० मिली खतरनाक रिझल्ट

फुलकळी वाढवण्यासाठी – हुंबूराची फळे १ किलो व १ किलो गुळ दहा दिवस एकत्र करून कुजवणे

 

प्रमाण – फवारणी साठी प्रती पंप ५० मिली

फळगळ – एकरी पळसाची फुले २ किलो + देशी गायीचे गोमुत्र २ लीटर + पाणी २ लीटर हे सर्व मिश्रण एकत्र करून ७ दिवस ठेवणे. त्यानंतर वापरावयास चालते. कॅल्शीयम व बोरॉनची कमतरता पूर्ण करते.

 

 रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्याकरीता – एकरी १०० ग्रॅम बेलाची पाने २ लिटर पाण्यामध्ये टाकून १ लिटर होईपर्यंत आटवावे तयार झालेल्या द्रावणाची फवारणी करावी.

 

 खोड किड किंवा शेंडा मुरगळणे- ३ फड्याची (घायपात )पाने घेउन छोटे छोटे तुकडे करून २ लिटर पाण्यात ३६ तास भिजत ठेवावे ३६ तासानंतर फवारणीसाठी प्रमाण प्रती पंपास १ ते अर्धा लिटर

 

शरद केशवराव बोंडे

 ९४०४०७५६२८

प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: natural tonic for crop
Published on: 22 June 2021, 11:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)