१. कोण सहभाग घेऊ शकतात
अ . अ. वैयक्तिक शेतकरी, राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपनी यांना अर्थसहाय्य देय आहे
२. अर्थसहाय्य -
अ. वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी या घटकासाठीचे अनुदान बँक कर्जाशी निगडित असून प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के अनुदान देय आहे. सदरील अनुदान बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय आहे.
ब. राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपनी यांना अनुदान वगळता
प्रकल्पाचा इतर खर्च स्वतः उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही. मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे पुरावे सादर करावे लागतील. अश्या लाभार्थींनाही प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के अनुदान देय आहे.
३. कोणते प्रकल्प उभारता येतील -
अ. अळिंबी उत्पादन प्रकल्प - खर्चाच्या ४० टक्के किंवा रुपये ०८ लाख प्रति युनिट इतके अनुदान पायाभूत सुविधांसाठी देय आहे. सदरचे अनुदान प्रकल्पाधारित व बँक कर्जाशी निगडित असेल.
ब. अळिंबी बीज उत्पादन केंद्र स्थापन करणे (Spawn Making Unit) - खर्चाच्या ४० टक्के किंवा रुपये ०६ लाख प्रति युनिट इतके अनुदान पायाभूत सुविधांसाठी देय आहे. सदरचे अनुदान प्रकल्पाधारित व बँक कर्जाशी निगडित असेल.
४. आवश्यक कागपत्रे -
अ विहित नमुन्यातील अर्ज
ब प्रकल्प अहवाल
क बँक कर्ज मंजुरी पत्र - बँक कर्ज एकूण प्रकल्प खर्चाच्या कमाल ५० टक्के असावे.
ड बँकेचा अप्रायझल रिपोर्ट
इ ५०० रुपये बॉण्ड पेपर वर हमीपत्र
५. मापदंड -
अ. अळिंबी उत्पादन प्रकल्प (बटन अळिंबी/धिंगरी अळिंबी) - उत्पादन प्रकल्पाचे क्षमता १५ टन प्रति वर्ष असावी.
बांधकाम हे १५x१५ फूटच्या ४ खोल्या असे एकूण ९०० चौ फुटाचे बांधकाम असावे. यासाठी ११. ०० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच साहित्यासाठी ९.०० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
ब. अळिंबी बीज उत्पादन केंद्र स्थापन करणे (Spawn Making Unit) - बांधकाम हे १५x१५ फूटच्या ३ खोल्या असे एकूण ६७५ चौ फुटाचे बांधकाम (आर सी सी) मध्ये असावे. यासाठी ८.२५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच साहित्यासाठी ६.७५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
मार्गदर्शक सूचना
https://drive.google.com/open?id=1hfghbfkCi8UIvI4UceQ4Zz5c_tOWQ15I
अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
Published on: 08 February 2022, 05:01 IST