डॉ. एस एस माने सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. यावेळी डॉ. लांबे सर यांनी कृषि शिक्षण याचा ग्रामीण स्तरावर महत्त्व व प्रसार करण्यासाठी प्रयत्न करावे याबद्दल माहिती सांगितली; तर डॉ. शेळके सर यांनी कृषि संलग्न गोष्टींना सोबत घेऊन स्वयं रोजगार निर्माण करा व पशुसंवर्धन आणि दूध प्रक्रिया व्यवसाय यावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला दिला. डॉ. दिवेकर सर यांनी कृषि उत्पादनात मोठ्या प्रमाणात होते,
पण साठवणूक क्षमता नसल्यामुळे होणाऱ्या ऱ्हास कमी करण्यात यावा, यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
विद्यार्थी म्हणून अनिकेत पजई यांनी देखील डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनावर प्रकाश टाकत नवीन कृषि आणि भारत, व भविष्यात कृषि क्षेत्रात करण्यासाठीच्या गोष्टी बद्दल माहिती दिली. विद्यार्थीनी मधून कोमल बानदुरकर बोलल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री व्यवहारे यांनी केले.
डॉ. एस.एस माने सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. त्याच बरोबर कृषि महाविद्यालयाचे शिक्षक डॉ. काहाते सर, डॉ. खाडे सर, डॉ. मारावार सर, डॉ. उज्जेनकर सर, डॉ. दलाल सर, डॉ वराढे सर, मोरे मॅम, सानप मॅम, डॉ ठाकूर सर, इत्यादी शिक्षक उपस्थित होते.
यानिमित्ताने एस.आर.पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणाबद्दल व भविष्यात कृषिमध्ये असलेल्या संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. खाडे सर, डॉ. लांबे सर, डॉ. शेळके सर उपस्थित होते.
एन. एस. एस कार्यकर्ता, तृतीय वर्षाचा विद्यार्थी, यश शिंदे; अजय धोंडगे सर; अरुणा काटोले मॅडम यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 03 December 2021, 08:07 IST