Agripedia

शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतां शिवाय पर्याय नाही. बरेच शेतकरी शेतामध्येपिकांना आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा करता यावा म्हणून रासायनिक खतांचा वापर करतात.

Updated on 07 May, 2022 10:49 AM IST

शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतां शिवाय पर्याय नाही. बरेच शेतकरी शेतामध्येपिकांना आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा करता यावा म्हणून रासायनिक खतांचा वापर करतात.

आपण रासायनिक खतांचा विचार केला तर या मध्ये जेव्हा पिकाला रासायनिक खतांची आवश्यकता असते, नेमके त्याचवेळी खतांची टंचाई भासते. त्यासोबतच खतांच्या किमती देखील बऱ्यापैकी वाढलेले असताना रासायनिक खतांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून त्याचा वापर करणे फार महत्त्वाचे ठरणारे आहे. याचाच एक भाग म्हणून  कृषी विभागाने लिक्विड फॉर्ममधील नॅनो युरिया हा एक उत्तम पर्याय असल्याचे सांगितले आहे. जर या युरियाच्या कार्यक्षमतेचा विचार केला तर नॅनो युरियाची अर्धा लिटर बाटलीचा विचार केला तर ते 45 किलो युरिया खतापेक्षा अधिक कार्यक्षम आहे. तसेच आपण युरिया खताचा विचार केला तर रासायनिक खतांमध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारे हे रासायनिक खत आहे. त्याला पर्याय म्हणून जर नॅनो युरिया वापरला तर निश्चितच  शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये घट घेऊन उत्पादनात वाढ होणार आहे.

नॅनो युरियाची कार्यक्षमता चांगली(Efficency Of Nano Urea)

 युरियाचा वापर करायचा असेल तर लिक्विड स्वरूपातील हा नॅनो युरिया शेतकऱ्यांना खूप फायद्याचा ठरणार आहे. याच्या वापराने उत्पादन तर वाढेल यात शंका नाहीच परंतु उत्पादन खर्च देखील कमी होईल, एक फार मोठी जमेची बाजू आहे. 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' या उक्तीप्रमाणे याचा आकार छोटा आहे परंतु कार्यक्षमता फार मोठी आहे. तसेच पिकाच्या पोषणासाठी प्रभावी आणि परिणामकारक राहणार आहे. त्यामुळे उत्पादन तर वाढेलच परंतु उत्पादन खर्चामध्ये देखील घट येईल  व गुणवत्तादेखील सुधारण्यास मदत होऊ शकते. जर आपण पारंपारिक युरियाचा  विचार केला तर  आपण 100 किलो जर वापरला तर तो 35 किलो पिकांना लागू होतो.  परंतु द्रवरूप नॅनो युरियाचा अर्धा लिटर बाटलीचा वापर केला तर हा 90 टक्के पिकांना लागू होतात.

त्यामुळे या युरियाचा वापर उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:शेतकरी बंधूंनो!NPK आहे पिकांचा आत्मा, जाणून घेऊ NPK चे पीक वाढीतील महत्व

नक्की वाचा:लई भारी! नोकरीला लाथ मारली अन शेती सुरु केली; आज करतोय चांगली कमाई

नक्की वाचा:दुःखद! वावरात उभ्या ऊस पिकावर ट्रॅक्टर चालवण्याची ओढवली नामुष्की; शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

English Summary: nano urea is useful for decrease production cost and growth income
Published on: 07 May 2022, 10:49 IST