रासायनिक खते आणि शेती यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. पीक उत्पादनवाढीसाठी खतांची आवश्यकता ही असतेच. खतांमध्ये मुख्य अन्नद्रव्य असलेल्या नत्र, स्फुरद आणि पालाश यांची पिकांना नितांत आवश्यकता असते आणि शेतकरी देखील या खतांचा पुरवठा जास्त प्रमाणात पिकांना करतात.
जर नत्राचा विचार केला तर याचा सर्वाधिक वापर शेतकऱ्यांकडून होतो आणि युरिया नंतर डीएपी या खताला सर्वाधिक मागणी असते.आपल्याला माहित आहेच की, नॅनो युरिया बाजारात आला असून बरेच शेतकरी त्याचा वापर करीत आहे.
याच पार्श्वभूमीवर आताकाही दिवसांनी नॅनो डीएपी बाजारात येईल. नॅनो टेक्नॉलॉजी असून या माध्यमातून पीक उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत.
नक्की वाचा:'या' उपाययोजना करा आणि 'नत्राची' उपयोगिता वाढवा, पिक उत्पादनवाढीत होईल फायदा
जयपुर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमांमध्ये इफकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.उदय शंकर अवस्थी यांनी यासंबंधी माहिती दिली. त्यांच्या मतानुसार सामान्य यूरियाच्या वापरामुळे शेतीसोबतच पर्यावरणाची हानी होते.
परंतु नॅनो युरिया याबाबतीत सुरक्षित आहे. नॅनो युरियाची फवारणी करता येते व त्या माध्यमातून पिकांना नायट्रोजनाचा पुरवठा होतो.
नक्की वाचा:ऑरगॅनिक कार्बन+वापरा13 नुट्रीयंट आणि 7 लाख कोटी बॅक्टेरिया प्रति मिली, मिळेल भयानक रिझल्ट
या ठिकाणी सुरु होणार नॅनो डीएपी चे प्लांट
इफकोचे गुजरात मधील कलोल येथील विस्तार युनिट, ओडिशातील कांडला युनिट आणि पारादीप युनिट नॅनो डीएपी बनवण्याचे काम हाती घेणार आहेत. या तीनही युनिटमध्ये दररोज 500 मिली लिक्विड डीएपी च्या दोन लाख बाटल्या तयार केल्या जातील.
कलोल युनिटमध्ये याचे उत्पादन मार्च 2023 पर्यंत सुरू होईल, तर जुलै 2023 पर्यंत पारादीप आणि ऑगस्ट 2023 पर्यंत कांडला येथे उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.
जसा ज्ञानू युरिया शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहेत त्याप्रमाणेच नॅनो डीएपी देखील शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याच्या आणि पिकांसाठी अधिक प्रभावी ठरेल, असे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
Published on: 28 June 2022, 11:52 IST