Agripedia

Bondali Nandurbar Pattern: राज्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीमुळे मोठ्या संकटात सापडत आहे. यावर उपाय म्हणून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने नंदुरबार जिल्ह्यात बोंड अळी नियंत्रण कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला आहे. हा प्रयोग यशस्वी होत असून यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Updated on 23 October, 2022 10:00 AM IST

Bondali Nandurbar Pattern: राज्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीमुळे मोठ्या संकटात सापडत आहे. यावर उपाय म्हणून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने नंदुरबार जिल्ह्यात बोंड अळी नियंत्रण कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला आहे. हा प्रयोग यशस्वी होत असून यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कापूस संशोधन केंद्र नागपूर यांच्यामार्फत क्रॉसिलू-4 जेल देण्यात आला असून याच्या प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दिला जात आहे. नंदुरबार तालुक्यातील जून मोहिदा या गावात कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत हे प्रात्यक्षिक देण्यात येत आहे. कापसावर बोंडअळी थांबवण्यासाठी या जेलच्या उपयोग करून प्रत्येक झाडामध्ये सहा इंचाच्या अंतर ठेवून सव्वाशे ग्राम हे लावायचं असून तीन वेळेस याच्या उपयोग करायच्या आहे.

बागायती कापूस असेल तर त्या ठिकाणी चार वेळेस या जेलच्या वापर करायचा आहे. या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांची पैशांची आणि वेळेची बचत होणार आहे. तर कापूस देखील चांगल्या प्रतीचा येणार आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र प्रा.पद्माकर कुंदे यांनी दिली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर; सोयाबीन पिकासाठी तब्बल ४० कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर

क्रॉसिलू-4 जेल मुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. पीक जगवण्यासाठी अनेक प्रकारचे फवारणी करावा लागत होती मात्र या नवीन उपक्रमामुळे फवारणी मजुरी आणि वेळ वाचणार असून त्यासोबत शेतकऱ्यांच्या उत्पन्ना त चांगल्या प्रमाणात वाढ होणार आहे.

जुन्या मोहिदा गावातील प्रल्हाद पाटील या शेतकऱ्यांनी दोनदा या जेलच्या वापर केला गेला, असून आज तिसऱ्यांदा कापसाच्या पिकावर वापर करण्यात आला असून कापूस पिकाची परिस्थिती उत्तम असून शासनाने या जेलच्या वापर करावा यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या फायदा होणार आहे.

दिवाळीत पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? मोदी सरकार देऊ शकते मोठी दिवाळी भेट!

सरकारने आणि शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळी येऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत, मात्र या क्रॉसिली व जेल मूळ आतापर्यंत या शेतकऱ्याच्या फायदा झाला असून शासनाने उपक्रम अमला त आणला तर कापसावर होणारे गुलाबी बोंड अळी रोखण्यास यशस्वी होऊ शकतो.

दिवाळीत घरात या दिशेला लावा दिवे, घरात प्रकाशासह सुख समृद्धी येईल

English Summary: Nandurbar pattern success on Bondali
Published on: 23 October 2022, 10:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)