पण शेती हा विषय न समजणारा असतो.या रात्रीमध्ये प्रत्येक सर्व सजीव सृष्टी , पक्षी, प्राणी,आणि शेतातील सर्व सजीव शत्रू आणि मित्र कीटक हे या अंधारी रात्र मध्ये मोठ्या प्रमाणात प्रजनन करत असतात.तसेच आपली पिढीचा मोठा गाडा सुरळीत चालू ठेवत असतात.अंडी तयार होत असते.त्यातून पिल्ले निघत असतात.पिल्ले ही नवीन नाजूक कोमल पालवी शेतातील पिके खात असतात.आणि लाखोच्या संख्येत शेतकरी मित्रांचे नुकसान करत असतात.
पण यात सर्व शेतकरी मित्रांना चुकीचे माहिती पुरवली जाते ते कंपनी, मार्केटींग , दुकाने,बांधावर घुमनारे प्रॉडक्ट विकणारे यांच्या कडून, की सर्व शत्रू कीटक असतात .तुम्ही रासायनिक फवारणी करा बेस्ट रिझल्ट आहे.खुप सुंदर रिझल्ट आहे.सर्व पीक तुमचे रोगमुक्त होते.
पण रासायनिक बुरशीनाशक, तणनाशक, कीटक नाशक औषधे फवारणी केल्याने आपण स्वतः मित्र कीटक यांना मारून टाकतो.
त्यांची अंडी सुद्धा मारून टाकतो.सोबतच जमिनीतील सूक्ष्म जीव मारून टाकतो.मग जमीन उत्पन्न कमी देण्यास तयार होते.आज शेतकरी मित्रांना एकरी 12-15 क्विंटल होते तर मग एकरी 8-10 क्विंटल होते.आणि अस नियमित केल्याने उत्पन्न घट सुरू होते.मग लाखो रुपयांची औषधे सुद्धा काम करत नाही.मग वेळ येते कर्ज काढणे, पैसे उधार मागणे,पैसे उधारी ठेवणे.मग आत्महत्या.कर्जबाजारी.घरामध्ये व्यवहारात टेन्शन. वादग्रस्त विधान. शेतकरी मित्रहो या वर थोडा विचार करा. लेख नक्की वाचा. आवडला तर नक्की शेती हा विषय समजून घ्या.आपले जीवन, घरदार आणि आपली काळी माय वाचवा.हे सर्व शक्य होऊ शकते आता फक्त जैविक शेती,सेंद्रीय शेती या मधूनच.
कारण वास्तविक मध्ये सेंद्रीय शेतीमध्ये ,मार्केटिंगमध्ये खुप फसवणूक होत आहे.फक्त सेंद्रीय नावाने निव्वळ रासायनिक औषधे विकले जात आहे.काही कंपन्या,प्रॉडक्ट मार्केटींग, शेतावर येणारे सुट-बुट वाले प्रॉडक्ट विकणारे सुद्धा शेतकरी मित्रांची फसवणूक करत आहे.कारण कधीच सेंद्रीय औषध हजारो रुपये लिटर महाग नसते. आणि जैविक औषध आपण स्वतः घरी बनवत असतो.आपण शेतकरी मित्रहो स्वतः यावर कोणीच बोलत नाही आहे.शेतकरी हा लुटला जात आहे.हे मात्र नक्की लक्ष्यात ठेवा.
सोबतच आपल्याला अनेक आजार होत आहे आपल्या आईच्या पोषक दुधात रासायनिक घटक दिसून येत आहे.विष आपण दररोज जेवण करत आहे.काही कंपनी प्रोटीन्स जास्त मिळाले
पाहिजेत या कारणाने रसायन मिक्स करत आहे.आणि त्यासाठी आता आपल्याला विषमुक्त अन्नाची गरज आहे.आईच्या पोषक दुधाची गरज आहे.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु-हा
अमरावती.9529600161
Published on: 10 December 2021, 07:36 IST