Agripedia

शेतकरी बंधूंनो आपणास कल्पना असेलच की भारत सरकारच्या की केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिनांक 13 एप्रिल 2021 पासून जमीन सुपोषण व संरक्षण जनजागरण अभियान राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. या अभियानाचा महत्त्वाचा उद्देश लक्षात घेऊन मातीपरीक्षण संदर्भातील मूलभूत बाबी शेतकरी बंधू पर्यंत पोचून माती परीक्षणाच्या आधारावरच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून पिकाचे पोषण केले जावे व जमिनीचे आरोग्य अबाधित राहावे या उद्देशाने काही बाबी समोर ठेवत आहे.

Updated on 03 May, 2021 10:08 PM IST

शेतकरी बंधूंनो आपणास कल्पना असेलच की भारत सरकारच्या की केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिनांक 13 एप्रिल 2021 पासून जमीन सुपोषण व संरक्षण जनजागरण अभियान राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. या अभियानाचा महत्त्वाचा उद्देश लक्षात घेऊन मातीपरीक्षण संदर्भातील मूलभूत बाबी शेतकरी बंधू पर्यंत पोचून माती परीक्षणाच्या आधारावरच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार  करून पिकाचे पोषण केले जावे व जमिनीचे आरोग्य अबाधित राहावे या उद्देशाने काही बाबी समोर ठेवत आहे. शेतकरी बंधूंनो माती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. आगामी खरीप हंगामात आपल्या स्वतःच्या जमिनीतील माती नमुन्याच परीक्षण करून खताचा किंवा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन पिकात करणं गरजेचे आहे त्यामुळे माती परीक्षण या विषयी ठळक बाबी जाणून घेऊया.

  • माती परीक्षण म्हणजे काय ?

आपल्या स्वतःच्या शेत जमिनीतील पीक पेरणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी प्रातिनिधिक माती नमुना काढून प्रयोगशाळेत प्रामुख्याने या माती नमुन्याच रासायनिक पृथक्करण करून त्यातील मुख्य अन्नद्रव्य दुय्यम, (नत्र, स्फुरद व पालाश ) दुय्यम अन्नद्रव्य (कॅल्शियम  मॅग्नेशियम व गंधक ) तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य (लोह,जास्त ,मंगल ,तांबे, बोरॉन मॉलिब्डेनम इत्यादी)  इत्यादी बाबीच प्रमाण तपासणे होय. या परीक्षणात जमिनीचा सामू ,विद्राव्य क्षारांचे प्रमाण,  सेंद्रिय कर्ब इत्यादी बाबी ची सुद्धा तपासणी होते.आवश्यक असल्यास जमिनीची भौतिक व जैविक गुणधर्माची ची तपासणी सुद्धा केली जाऊ शकते.

  • माती परीक्षणामुळे होणारे फायदे :

  1. माती परिक्षण केल्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या आधारावर पिकाला योग्यवेळी योग्य प्रमाणात रासायनिक खत देणे शक्य होतं त्यामुळे अनावश्यक खताचा वापर कमी होऊन खताच्या खर्चात बचत होते.
  2. जमिनीची नेमकी सुपीकता, उपलब्ध असलेले जमिनीतील क्षार, सेंद्रिय कर्ब सामू इत्यादी बाबीची माहिती मिळते त्यामुळे जमिनीची नेमकी सुपीकता टिकून ठेवण्यासाठी तसेच समस्यायुक्त जमिनीत शिफारशीत उपायोजना करण्यासाठी नियोजन करता येते.
  3. माती परीक्षणाच्या आधारावर खताचे व्यवस्थापन झाल्यामुळे खताच्या मात्रेत बचत होते उत्पादन खर्चात कपात होते.
  4. जमिनीतील काही घटकाच्या उपलब्धतेनुसार/ माती परीक्षण अहवालाच्या आधारावर पिकाचे योग्य नियोजन करता येते उदाहरणार्थ संत्रा वर्गीय पिकात 10% च्या वर चुनखडी चे प्रमाण जमिनीत आढळल्यास अशा जमिनत संत्रा वर्गीय पीक घेणे टाळावे असा सल्ला दिला जातो व पर्यायी पिकाचा सल्ला दिला जातो.
  • माती परीक्षणा करिता नमुना केव्हा घ्यावा ?

  1. मातीचा नमुना वर्षभर केव्हाही आवश्यक असेल तेव्हा घेता येतो परंतु सर्वसाधारण पिकाकरिता रबी पिकाची काढणी झाल्यानंतर उन्हाळ्यात मार्च ते मे या कालावधीत शेणखत टाकण्यापूर्वी जमिनीतून मातीचा नमुना काढणे योग्य ठरते.
  2. जमिनीवर पीक उभे असताना मातीचा नमुना घ्यावयाचा असेल तर खते दिल्यानंतर दोन महिन्यांनी मातीचा नमुना पिकाच्या दोन ओळी मधून घ्यावा.

 

  • कुठला किंवा केव्हा मातीचा नमुना घेणे टाळावे ?

  1. नुकतेच खत टाकलेल्या जमिनी, खोलगट भाग, पाणथळ जागा, झाडाखालील जमीन, बांधजवळील जागा, शेणखताच्या ढिगाऱ्याजवळील जागा, शेतातील बांधकामा जवळचा परिसर ,कंपोस्ट खताच्या जवळपासची जागा अशा ठिकाणातून मातीचा नमुना घेऊ नये.
  2. कोणत्याही परिस्थितीत पिकांना दिलेल्या खताच्या मात्रे नंतर लगेच मातीचा नमुना घेऊ नये.
  3. पिकाची नागरनी केल्यानंतर नमुना घेणे टाळावे.
  • सर्वसाधारण पिकासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा ?

  1. प्रथम आपले स्वतःच्या शेताची पाहणी करून आपले वेगवेगळे जमिनीचे किती प्रकार पडतात ते निश्चित करा उदाहरणार्थ हलकी भारी मध्यम या प्रकारच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या जमिनी करता स्वतंत्र वेगळा नमुना घ्यावयाचा आहे हे लक्षात घ्या.
  2. नमुना घ्यावयाच्या शेतामध्ये स्वतः फिरून शेतात जमिनीचे चार कोपरे सोडून झाडाखालचा भाग सोडून जनावरे बांधत असलेला भाग सोडून आत मध्ये संपूर्ण शेत प्राथमिक रूपात समाविष्ट केले जाईल याप्रमाणे शेतजमिनीचे काल्पनिक आठ ते दहा वार्ड पाडा प्रत्येक वार्डात म्हणजे भागात नमुना घ्यावयाच्या जागेवरील काडीकचरा बाजूला करून सर्वसाधारण म्हणजे सोयाबीन तुर उडीद मूग ज्वारी भात या पिका करतात 15 ते 20 सेंटिमीटर तर कपाशी ऊस केळी  या पिकाकरिता करता 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत   व्ही आकाराचा खड्डा करा म्हणजे साधारणता आठ ते दहा खड्डे तयार होतील. या प्रत्येक खड्ड्याच्या आतल्या पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती खुरपी च्या साह्याने खरडून प्रति खड्डा साधारणता 100 ग्रॅम माती म्हणजेच गो आठ ते दहा खड्ड्यातून साधारणता एक किलो गोळा झालेली माती एका स्वच्छ प्लॅस्टिकच्या कागदावर टाका चांगली मिसळा ओली असल्यास वा वा नंतर या या मातीचे चार समान भाग करा व समोरासमोरील दोन भाग काढून टाका उरलेले दोन भाग एकत्र मिसळावा ही प्रक्रिया साधारणता अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंत करा. उरलेली अंदाजे अर्धा किलो माती स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरा व पिशवीत माहितीपत्रक टाका व एक लेबल पिशवीला बांधा. नंतर ही माती मान्यताप्राप्त मातीपरीक्षण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवा. साधारणपणे नमुना गोळा करणे व प्रयोगशाळेत पाठवणे यात दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ नसावा

फळबागेसाठी मातीचा नमुना कसा घ्यावा :

फळझाडाची मुळे जमिनीत खोल जात असल्यामुळे उथळ जमिनी फळबागेसाठी आयोग्य करतात ठरतात. फळबागेसाठी नमुना घेताना खड्ड्याच्या उभ्या छेदा प्रमाणे पहिल्या एक फुटातील त्याच्याच खाली दुसऱ्या एक फुटातील त्याच्या खाली तिसऱ्या एक फुटातील व त्याच्याखाली चौथ्या एक फुटातील खड्ड्यातील माती वेगवेगळी गोळा करावी व असे चार फूट आतील चार नमुने एकच नमुना म्हणून म प्रत्येक नमुन्यात लेबल टाकून व जमिनीतील खोलीचा उल्लेख करून खालील निर्देशित माहिती पत्रका सहित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे.

मातीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवताना नमुन्या सोबत पाठवायच्या माहितीपत्रकात कोणती माहिती पाठवावी ?

मातीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवताना प्रत्येक नमुना सोबत माहितीचे पत्र भरून पाठवावे शेतकऱ्याचे नाव व पत्ता शेत सर्वे क्रमांक मागील हंगामात घेतलेले पीक पुढे हंगामा घ्यावयाची पिके इत्यादी माहिती माहिती पत्रकात भरून हे माहिती पत्रक माती नमुन्याच्या पिशवीत टाकून माती परीक्षण प्रयोगशाळा कडे पाठवा. माती परीक्षण करताना कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र किंवा शासनाच्या किंवा शासनाच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत माती नमुना तपासणीसाठी पाठवा. वाशीम जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र करडा तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे सुद्धा माती परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध आहे  या प्रयोग शाळेत प्राथमिक व सूक्ष्म अन्नद्रव्याचे निर्देशित शुल्क भरून माती परीक्षण केले जाते.

माती परीक्षण अहवालात सर्वसाधारणपणे काय बाबी लिहून येतात व व त्याचा वापर कसा करावा ?

शेतकरी बंधुंनो माती परीक्षण अहवाल आपल्या जमिनीत उपलब्ध सेंद्रिय कर्ब नत्र स्फुरद पालाश तपासलेली संबंधित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य अन्नद्रव्य तसेच सामू विद्युत वाहक इत्यादी इत्यादी बाबत माहिती असते या आधारावर आपण प्रस्तावित केलेल्या पिकासंदर्भात एकात्मिक पद्धतीने कोणती खते द्यावी व किती प्रमाणात द्यावी तसेच समस्यायुक्त जमिनीमध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना दिल्या असतात. आपण या सूचनांचं पालन करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून पिकाच्या खताचे व्यवस्थापन केलं तर अनावश्यक व अवाजवी खताचा वापर टाळल्या जाऊन खताच्या मात्रेत  बचत होते व जमिनीची सुपीकता टिकून राहते उत्पादन खर्चात कपात होते.

 

माती परीक्षण किती कालावधी नंतर करावे व प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी माती परीक्षण करणे गरजेचे आहे का ?

शेतकरी बंधूंनो सर्वसाधारण पिकासाठी एकदा मातीचा नमुना तपासला गीत त्यामधून कोणत्या पिकाला किती प्रमाणात व कोणत्या रूपात खते द्यायची ते कळू शकते त्यामुळे वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळ्या मातीचा नमुना घेण्याची जरूरत नाही परंतु निर्देशीत पद्धतीप्रमाणे फळ पिकाकरिता व सर्वसाधारण पिकाकरिता वेगवेगळ्या पद्धतीने नमुने घ्यावे. शेतकरी बंधुंनो साधारणता तीन ते चार वर्षानंतर पुन्हा एकदा माती परीक्षण करून घेणे चांगले परंतु दरवर्षी त्याच त्या जमिनीचा नमुना काढून माती परीक्षण करणे गरजेचे नाही.तेव्हा शेतकरी बंधूंनो आगामी खरीप हंगामात आपल्या सर्वांच्या मातेच म्हणजे भूमातेचच म्हणजे मातीचे परीक्षण करून घ्या व त्या आधारावरच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून पिकांना खत द्या व जमिनीचा आरोग्य चांगले राखण्याकरता योगदान देऊन आपले उत्पादन खर्चात सुद्धा कपात करा.

 

      लेखक :

      कु. वैष्णवी वि. बहाळे.

      शेतीशाळा प्रशिक्षक, (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई )

      उपविभाग : अमरावती

      ता. भातकुली जि. अमरावती.

 

 

 

 

 

 

English Summary: My opinion is ‘soil testing Is important
Published on: 03 May 2021, 10:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)