Agripedia

मशरूमची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे वरदान आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा यांचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर हा व्यवसाय चांगली संधी म्हणून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Updated on 19 June, 2022 9:30 AM IST

मशरूमची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे वरदान आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा यांचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर हा व्यवसाय चांगली संधी म्हणून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होऊ शकतो.

शेतातील टाकाऊ गोष्टींचा वापर मशरूम उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही केळीची पाने व बुंधा, उसाची पाचट, कापसाच्या पराट्या, सोयाबीनचे कुटार या व अशा अनेक साधनांचा वापर यासाठी करू शकता.

तसे पाहायला गेले तर विविध प्रकारच्या जाती मशरूमच्या आपल्याकडे आहेत. परंतु आपल्याकडे शिंपला, बटन इत्यादी जातींची लागवड केली जाते. राष्ट्रीय आळिंबी संशोधन केंद्राच्या माध्यमातूनमशरूमच्या विविध प्रकारच्या जाती संशोधित करण्यात आले आहे.

आपल्या भारतामध्ये देखील उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून मशरूमचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घ्यायला सुरुवात झाली आहे व त्याला मोठ्या प्रमाणात जागतिक बाजारपेठ देखील आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो! गवती चहा( लेमन ग्रास) लागवडीचे समजून घ्या आर्थिक गणित, याच्या तेलाचे उत्पन्न हेक्टरी मिळते 4 लाखापर्यंत

 मशरूम लागवड प्रक्रिया

 मशरूम लागवडीचे तसेच विविध टप्पे असून यासाठी अगोदर पाण्यामध्ये काड भारतात पिकांचे अवशेष भिजवून त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते.

  त्यानंतर पिशव्यांमध्ये बियाणे भरून उगवले जाते.त्यानंतर 14 ते 20 दिवसांनंतर पिशवी काढली जाते व नंतर बी पेरणी केली जाते.पिशवी फाडल्यानंतर चार-पाच दिवसातच मशरूमची पूर्ण वाढ झालेली असते.

मशरूम दोन दिवसात उन्हात पूर्णतः उत्तम प्रकारे वाळते व त्यानंतरहे वाढलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.

 ही काळजी घेणे आवश्यक

1-ज्या ठिकाणी मशरूम लागवड केली असेल त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवावा.

2- उत्पादन घेताना ते बंदिस्त जागेत घ्यावे.

3- मशीनचे लागवड ज्या बंदिस्त खोलीत केली असेल तिथे हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

4- काडाचे निर्जंतुकीकरण करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

5-मशरूमची काढणी अगदी वेळेत करावी.

नक्की वाचा:या आहेत सोयाबिन पिकाचे तांबेरा प्रतिबंधक जाती

 मशरूम चे औषधी गुणधर्म

1- मशरूम मध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे त्यामुळे मधुमेही रुग्णांना खूपच उपयुक्त आहे.

2-मूत्रपिंडाचे आजार ज्यांना आहेत त्यांच्यासाठी खूपच उपयोगी आहे.

3- लठ्ठ व्यक्तींसाठी एक उत्तम आहार म्हणून उपयोगी पडते.

4- पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करते.

5-मशरूम पासून पापड, सूप पावडर, लोणची, हेल्थ पावडर, कॅप्सुल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादनांची निर्मिती केली जाते.

 मशरूम ला असलेली बाजारपेठ

 विशिष्ट हंगामात आणि वर्षभर उगवणाऱ्या मशरूम ला देशात आणि विदेशात खूप मागणी असल्याने देशाबाहेर देखील निर्यात केली जाते.

भारताचा विचार केला तर हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तरांचल, पंजाब, गोवा त्याची राज्यांमध्ये मशरूम लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मशरूम अमेरिका,नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झर्लंड व इतर देशांमध्ये निर्यात केली जाते.

मशरूम ला भावही चांगला मिळतो.  जर आपण घाऊक बाजाराचा विचार केला तर आपल्याकडे ताजी मशरूम 50 ते 100 रुपये प्रतिकिलो विकली जाते.

उन्हाळ्यामध्ये हिवाळ्याच्या च्या मानाने जास्त भाव मिळतो. ताज्या मशरूम च्या तुलनेत वाळलेला मशरूम विक्रीला सोपा असून जास्त विकला जातो.

मशरूम चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वाळलेला  मशरूम सिलबंद ठेवल्यास कमीत कमी तीन वर्षे टिकतो व वाळलेल्या मशरूम ना प्रति किलो अडीचशे ते तीनशे रुपये भाव मिळतो. आपल्या देशातच दिल्ली, मुंबई, चेन्नई, चंडीगड आणि श्रीनगर इत्यादी शहरांमध्ये मशरूम मला खूप मोठी मागणी आहे.

नक्की वाचा:हटके माहिती: टोमॅटो सॉस बनवण्यासाठी उपयुक्त आहे 'रोमा टोमॅटो', जाणून घेऊ योग्य वाढवण्यासाठीच्या टिप्स

English Summary: mushroom farming is so profitable and benificial give financial support to farmer
Published on: 19 June 2022, 09:30 IST