शेतकरी बांधवांना जर आपणास कमी जागेत चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशात शेतकरी बांधव शेती क्षेत्रात मोठा अमुलाग्र बदल घडवून आणत आहेत. यामुळे शेतकरी राजांना मोठा फायदा देखील मिळत आहे. देशातील अनेक शेतकरी बांधव पारंपरिक पिकांना फाटा देत आता मागणी मध्ये असलेल्या नगदी पिकांची लागवड करताना बघायला मिळत आहेत. शेतकरी मित्रांनो आज आपण अशाच एका पिकांपैकी एक असलेले मशरूम पिकाच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जर आपण मशरूम शेती करण्याच्या विचारात असाल तर आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की भारतात केवळ तीन मशरूमच्या जातींची व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेतले जाते. यामध्ये प्रथम क्रमांकावर बटन मशरूम दुसऱ्या क्रमांकावर ऑईस्टर मशरूम तर तिसर्या क्रमांकावर येतो धान स्ट्रॉ मशरूम. असे सांगितले जाते की, मशरूम शेती साठी जवळपास एक लाख रुपये खर्च अपेक्षित असतो.
एवढा खर्च करून शेतकरी बांधव मात्र चांगला मोठा नफा कमवू शकतात. वैज्ञानिकांच्या मते, एक किलो मशरूमचे उत्पादन घेण्यासाठी सुमारे तीस रुपये खर्च अपेक्षित असतो. आणि बाजारात एक किलो मशरूम सुमारे अडीचशे रुपये प्रति किलोने विकला जातो. अशा तऱ्हेने मशरूम शेती मध्ये दहापट अधिक नफा प्राप्त होत असल्याचे सांगितले जाते. मशरूम शेतीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या लागवडीसाठी खूपच अत्यल्प जागा आवश्यक असते. सहा × सहा एवढ्या जागेत देखील याची यशस्वी शेती केली जाऊ शकते. फक्त याची शेती अशा ठिकाणी केली पाहिजे ज्या ठिकाणी डायरेक्ट सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही आणि त्या ठिकाणचे तापमान 15 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान असावे.
अशा हवामानात मशरूमची शेती केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन मिळू शकते असा दावा केला जातो. बाजारात मशरूमचे बियाणे 75 रुपये प्रति किलो दराने मिळते, आपण आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन मशरूम बियाणे देखील खरेदी करू शकता. मशरूम चे पीक चाळीस दिवसात काढणीसाठी तयार होत असल्याचे सांगितले जाते. अर्थातच कमी जागेत आणि अल्प कालावधीत काढणीसाठी तयार येणारे मशरूम शेतकरी बांधवांसाठी वरदान सिद्ध होऊ शकते मात्र यासाठी तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे अनिवार्य राहणार आहे.
Published on: 12 March 2022, 05:16 IST