Agripedia

Mushroom Farming: मशरूम शेती (Cultivation Of Mushroom) गेल्या काही वर्षांपासून भारतात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आपल्या राज्यातील नवयुवक तरुण देखील आता मशरूम शेतीकडे (Farming) आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे.

Updated on 18 August, 2022 7:17 PM IST

Mushroom Farming: मशरूम शेती (Cultivation Of Mushroom) गेल्या काही वर्षांपासून भारतात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आपल्या राज्यातील नवयुवक तरुण देखील आता मशरूम शेतीकडे (Farming) आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो जाणकार लोकांच्या मते कमी खर्चात अधिक नफा मिळवायचा असेल तर शेतकरी बांधवांनी (Farmer) शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय (Agri Business) म्हणून मशरूमची शेती केली पाहिजे.

मशरूम शेती कमी जागेत सुरू करता येत असल्याने शेतकऱ्यांसाठी मशरूम शेतीचा व्यवसाय फायद्याचा सौदा ठरू शकतो. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी मशरूमच्या काही जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

मित्रांनो आज आपण भारतात उत्पादित केल्या जाणार्‍या काही प्रमुख मशरूमच्या जाती (Mushroom Variety) जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया भारतात उत्पादित केल्या जाणाऱ्या मशरूमच्या काही सुधारित जाती.

मशरूमच्या सुधारित जाती

आयस्टर मशरूम: आयस्टर मशरूम ही मशरूम ची एक प्रगत जात आहे. या जातीची लागवड वर्षभरात 5 ते 6 वेळा करता येते. हे मशरूम अडीच ते तीन महिन्यांत तयार होते. 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान आणि 80 ते 90 टक्के आर्द्रता आयस्टर मशरूमच्या लागवडीसाठी उत्तम मानली जाते. आयस्टर मशरूमची लागवड सहज उपलब्ध स्ट्रॉमध्ये करता येते. त्याचे पीक अडीच ते तीन महिन्यांत तयार होते.

बटन मशरूम:- बटन मशरूम मशरूम ची एक सुधारित आणि प्रगत जात आहे. याच्या लागवडीसाठी थंड हवामान उत्तम मानले जाते. या जातीच्या चांगल्या उत्पादनासाठी 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमान आणि 80 ते 85 टक्के ओलावा आवश्यक आहे. ऑक्टोबर ते मार्च हा हंगाम मशरूमच्या लागवडीसाठी अनुकूल असतो. बटन मशरूमचे दोन उत्पादन 6 महिन्यांत मिळू शकते. याचे पीक चक्र 6 ते 8 आठवड्यांचे असते.

मिल्की मशरूम:- दुधाळ मशरूम किंवा मिल्की मशरूम मशरूमची एक सुधारित जात आहे. याच्या लागवडीसाठी जास्त तापमान योग्य मानले जाते. डोंगराळ प्रदेश वगळता, दुधाळ मशरूमचे पीक जवळजवळ सर्व मैदानी भागात घेतले जाऊ शकते. 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान आणि 80 ते 90 टक्के आर्द्रता त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य आहे. 40 अंशांपर्यंत तापमान असतानाही या पिकातून चांगले उत्पादन मिळते. दुधाळ मशरूमच्या लागवडीसाठी मार्च ते ऑक्टोबर हा सर्वोत्तम काळ आहे.

पेडिस्ट्रा मशरूम:- पेडिस्ट्रा मशरूम देखील वर नमूद इतर जातींप्रमाणेच एक प्रगत जात आहे. या जातींचे मशरूम उच्च तापमानात वेगाने वाढणारा मशरूम आहे. त्यामुळे या जातीच्या लागवडीसाठी जास्त तापमान चांगले असते. 28 ते 35 अंश तापमान आणि 60 ते 70 टक्के आर्द्रता असलेले क्षेत्र पॅडिस्ट्रा मशरूमच्या लागवडीसाठी योग्य आहे. पॅडिस्ट्रा मशरूमचे पीक 20 ते 25 दिवसांत तयार होते. पॅडिस्ट्रा मशरूमची लागवड मे ते सप्टेंबर या कालावधीत केली जाते.

English Summary: Mushroom Farming Farm this variety of mushroom
Published on: 18 August 2022, 07:17 IST