Agripedia

हरभरा, तूर, मूगउडीद मुळ कडधान्य पिके असून, मटकी चा समावेश दुय्यम कडधान्य पिकामध्ये केला जातो.मटकीलावर्षभर मागणी असून, कमी लागवड क्षेत्र व उत्पादक मुळे वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो.

Updated on 21 February, 2022 9:52 AM IST

हरभरा, तूर, मूगउडीद मुळ कडधान्य पिके असून, मटकी चा समावेश दुय्यम कडधान्य पिकामध्ये केला जातो.मटकीला वर्षभर मागणी असून, कमी लागवड क्षेत्र व उत्पादक मुळे वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो.

राजस्थानमध्ये खरीप हंगामात कमी पावसाच्या प्रदेशातरेतियुक्तहलक्‍या ते जमिनीत या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.राजस्थाननंतर लागवडीमध्ये महाराष्ट्राचा क्रम लागतो. उन्हाळी हंगामात सुद्धा या पिकाची लागवड करता येते.

 मटकी मध्ये 25 ते 26 टक्के प्रथिनांचे प्रमाण असून, आहारात उसळ, पापड नमकीन बनविण्यासाठी वापर होतो.

 या पिकाचा हिरवळीच्या खतासाठी व चारा पीक म्हणूनही लागवड करता येते.

मटकीचे पीक लवकर जमीन झाकत  असल्यामुळे उतार असलेल्या जमीनीत पावसाच्या पाण्याद्वारे मातीची होणारी धूप थांबविण्यासाठी मटकीची लागवड उताराला आडवी पट्टापेर पद्धतीने पेरणी  केली जाते.

 मोट4 ओळी – तूर एक ओळ आंतरपीक पद्धतीचा सुद्धा अवलंब करता येतो.

  • शिफारशीत जाती :-

 विदर्भासाठी मोट नं. 88 ( उत्पादन एकरी 2 ते 3क्विंटल )

 पश्‍चिम महाराष्ट्रासाठी एमबीएस -27(उत्पादन एकरी 3 ते 4क्विंटल)

 मोटनं. 88 हे वाण भूरी रोगास कमी प्रमाणात बळी पडते, तर एमबीएस -27 हे वाण भूरी रोगास काही प्रमाणात प्रतिकारक आहे.

  • जमीन :-

 हलकी - मध्यम प्रकारची जमीन, कमी पाणी धारण क्षमतेची, पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होणारी जमीन लागते.

चोपण,क्षारयुक्त, पाणथळ जमिनीत मटकीची लागवड करू नये. कमी पावसाच्या प्रदेशात या पिकाची लागवड मुख्यत केली जाते.

  • मशागत:-

 जमिनीची खोल नांगरट करून पावसाच्या आगमनानंतर उभी-आडवी वखरणी करावी. शेवटचा व करणी पूर्वी एकरी 5 ते 6 गाड्या कुजलेले शेणखत टाकून, काडी-कचरा -धसकटे इत्यादी वेचून शेत तयार ठेवावे.

 पेरणी कालावधी:-

 साधारणत: 60-70 मि.ली. पाऊस झाल्यानंतर जूनच्या अखेरपर्यंत पेरणी करावी.

 पिकाचा कालावधी 3.5ते4 महिन्याचा आहे.ओलिताच्या शेतात रब्बी हंगामातील हरभरा अथवा गहू पीक घेण्यासाठी या पिकाची वेळेत पेरणी आवश्यक ठरते.

 उशिरात उशिरा ऑगस्टच्या मध्यापर्यंत या पिकाची लागवड करता येते.

  • बीज प्रक्रिया :-

 पेरणीपूर्वी दोन ग्रॅम थायरम किंवा दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाणे या प्रमाणेप्रक्रिया करावी.

  • पेरणी :-

 मटकीची पेरणी तिफनीने, सरत्याने, पाभरीने अथवा काकरी च्या सहाय्याने करावे.

 एकरी साधारणत: 5-6 किलो बियाणे लागते.

 पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर 30 से.मी. व दोन झाडातील अंतर 10 से.मी. राखावे.पेरणीचीखोली 3 ते 4 सें.मी. राखावी.

 सलग पेरणीसाठी मुग,उडीद, सोयाबीन प्रमाणे प्रत्येक चौथी, पाचवी अथवा सहावी ओळख खाली ठेवून, नंतर डवऱ्याच्याफेरीवेळी गाळ पाडून द्यावा.अशा पट्टापेर पद्धतीमुळे उत्पादनात 15 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ शक्य होते.

  • तणनियंत्रण :-

तन व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुरुवातीचे 30 ते 45 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. नंतर पीक पूर्ण शेत व्यापत असल्याने तणांचा प्रादुर्भाव आपोआपच कमी होतो. पीक 20दिवसाचे व 30 दिवसाचे असतानाडवऱ्याचा फेर द्यावा. यादरम्यान निंदणी करून ओळीतील तणांचा बंदोबस्त करावा.

  • खत व्यवस्थापन:-

 पेरतेवेळी एकरी 30 किलो डीएपी व साधारणत:15 किलो एमओपी द्यावे.पेरणी वेळी एकरी  8  किलो गंधक दिल्यास फायदेशीर ठरते.

English Summary: moth bean cultivation method and management for more production
Published on: 21 February 2022, 09:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)