Agripedia

शेवग्याच्या अनेक जाती आहेत. त्यामध्ये पीके एम-1, पीकेएम 2, कोकण रुचिरा, धारवाड सिलेक्शन इत्यादी वानांचा यामध्ये समावेश होतो. परंतु वरील पैकी सर्व जातींमध्ये काही ना काही दोष होते. या लेखामध्ये आपण शेवग्याच्या काही उपयुक्त आणि फायदेशीर वानांची माहिती आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.

Updated on 25 November, 2021 6:19 PM IST

शेवग्याच्या अनेक जाती आहेत. त्यामध्ये पीके एम-1, पीकेएम 2, कोकण रुचिरा, धारवाड सिलेक्शन इत्यादी वानांचा यामध्ये समावेश होतो. परंतु वरील पैकी सर्व जातींमध्ये काही ना काही दोष होते. या लेखामध्ये आपण शेवग्याच्या काही उपयुक्त आणि फायदेशीर वानांची माहिती आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.

शेवग्याची प्रमुख वान व वैशिष्ट्ये

रोहित -1

1-या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे लागवडीपासून सहा महिन्याचे उत्पन्न सुरू होते.

2- शेंगांची लांबी मध्यम प्रतीची 45 ते 55 सेंटिमीटर असून शेंगा सरळ व गोल आहेत.

3- शेंगांचा रंग गर्द हिरवा असून चव गोड आहे.

4- उपलब्ध सर्व जातींपेक्षा 30 टक्के उत्पन्न जास्त येते.

5- व्यापारी उत्पन्नात देण्याचा कालावधी सात ते आठ वर्षाचा आहे. असे असले तरी वाणाचे अकरा वर्षे वयाचे झाड चांगले उत्पन्न देते.

6- वर्षभरात एका झाडापासून सरासरी 15 ते 20 किलो शेंगांचे उत्पन्न मिळते.

7- या जातीपासून 80 टक्के शेंगा एक्सपोर्ट गुणवत्तेच्या मिळतात.

8- व्यापारी लागवडीसाठी रोहित ही जात सर्वश्रेष्ठ आहे.

जाफना

  • हा शेवगा वाण स्थानिक व लोकल आहे.
  • देशी शेवगा म्हणून ओळखतात.
  • या वाणाच्या शेंगा चवदार असतात.
  • या वाणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एका देठावर एकच  शेंग  येते.
  • शेंगांची लांबी 20 ते 30 सेंटिमीटर लांब असते.
  • या वानाला वर्षातून फेब्रुवारी महिन्यात फुले येतात.
  • मार्च, एप्रिल आणि मे मध्ये शेंगा मिळतात.
  • एका किलोमध्ये 20 ते 22 शेंगा बसतात.
  • एका हंगामात एका झाडापासून दीडशे ते दोनशे शेंगा मिळतात.
  • या जातीच्या शेंगा चवीला चांगल्या व बी मोठे असतात.

कोकण रुचिरा

  • हा वान कोकण कृषीविद्यापीठाने विकसित केलेला आहे.
  • हावाणकोकण विभागासाठी शिफारस केला आहे.
  • या वानाच्या झाडाची उंची पाच ते सोळा मीटर वाढते.
  • एका झाडाला 15 ते 17 फांद्या व उपफांद्या येतात.
  • शेंगा गर्द हिरव्या रंगाच्या असतात.
  • या वाणाचे उत्पादन ओलिताखाली सर्वोत्तम येते.
  • एका देठावर एकच शेंग लागते.
  • या वानाला एकाच हंगामात शेंगा येतात.
  • साईस मध्यम असल्यामुळे वजन कमी भरते.

पिकेएम-1

  • हावाणतमिळनाडू कृषी विद्यापीठाने पेरियाकुलम् फळबाग संशोधन केंद्राने विकसित केला आहे. हवामान चवदार आहे.
  • लावणी केल्यानंतर सहा महिन्यात शेंगा सुरू होतात.
  • शेंगांची लांबी 40 ते 45 सेंटिमीटर असते.
  • या वानाला महाराष्ट्र वातावरणात वर्षातून दोन वेळा शेंगा येतात.
  • शेंगा वजनदार व चविष्ट, मात्र बी मोठे होत नाही.
  • या वाणाची झाडे साडेचार ते पाच मीटर उंच होतात.
  • दोन्ही हंगामात मिळून 650 ते850 शेंगा ओलिताखाली मिळतात.

पिकेएम-2

  • हा वाण तमिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे.
  • हा वान आज महाराष्ट्राचे स्वतंत्र शेवगा शेतीत तसेच आंतरपीक शेवगा शेतीत आहे.
  • शेवगा शेतीतील खरी क्रांती या वानाने केली आहे.
  • भारतामध्ये आज माहिती असलेल्या सर्व शेवगा वानात हा वाण  विक्रमी उत्पादन देतो.दोन हंगामात ओलिताखाली व छाटणी आणि खत व्यवस्थापन उत्तम ठेवल्यास आठशे ते एक हजार शंभर शेंगा प्रति झाड  मिळतात.
  • या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत.
  • सर्व वानात लांब शेंगा  असणारा हा वाण आहे. शेंगा 70 ते 80 सेंटिमीटर लांब येतात.
  • लांब शेंगा वजनदार शेंगा त्यामुळे बाजार भाव  सर्वात जास्त मिळतो.
  • एका झाडाला एकाच हंगामात 2190 शेंगा मिळविण्याचा विक्रम या वानाने  केला आहे.
  • या वानात एका देठावर चार ते पाच शेंगाचा झुपका येतो. हे वैशिष्ट्य इतर कोणतेही  जातीत नाही.
  • सध्या या वाणाची परदेशी निर्यात केली जाते
English Summary: most benificial veriety of drumstick tree for drumstick farming
Published on: 25 November 2021, 06:19 IST