भारतामध्ये उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.ऊस उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. ऊस लागवडीतूनशेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते परंतु बराच वेळेस उसावर बर्याच प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.या लेखामध्ये आपण उसाच्या उन्नत असलेल्या तीन जाती पाहणार आहोत व त्याबद्दल माहिती घेणार आहोत.
गोविंद वल्लभ पंत कृषी आणि प्रौद्योगिकी विश्वविद्यालय पंतनगर मधील कृषी शास्त्रज्ञांनी उसाच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. या जातींचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या जातीमध्ये रोग आणि किडींच्या विरोधी लढण्याची खास क्षमता आहे.या जातींच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले व जास्त उत्पादन मिळू शकते. या तीन जातींमध्ये पंत 12221, पंत 12226 आणि पंत13224 या तीन जाती आहेत. या जातींची वैशिष्ट्ये आपण पाहू.
पंत 12221
उसाच्या या जातीच्या मूल्यांकन कृषी शास्त्रज्ञान द्वारे केले गेले आहे. या मूल्यांकनामधील दिसून आले आहे की या जातीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. या जातीमध्ये रसाची गुणवत्ताही चांगली आहे. शेतकरी आणि साखर उद्योगासाठी ही जात चांगली मानली जात आहे.
पंत 12226
उसाची जात रोग प्रतिरोधी आहे. तसेच या जातीची उत्पादन क्षमता ही चांगली आहे. ऊसाची ही जात लवकर तयार होते. या जातीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही जात अति पावसात किंवा दुष्काळग्रस्त परीस्थितीत देखील चांगले उत्पादन देण्याची क्षमता ठेवते. या जातीच्यायागुणधर्मामुळे ऊस शेतीसाठी ही चांगली मानली जात आहे.
पंत 13224
कृषी वैज्ञानिकांनी विकसित केलेली ही जात कमी खर्चात जास्त उत्पादन देते. उसाची हि जात देखील रोग आणि कीड प्रतिरोधी आहे. उसाच्या जास्त उत्पादनासाठी ही जात चांगली मानली जाते.
कृषी वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की या जातीच्या लागवडीने शेतकऱ्यांनाऊस पिकाचे अधिक उत्पन्न व फायदा मिळेल.
Published on: 07 October 2021, 03:25 IST