राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन केंद्रात विकसित केलेले रुंद वरंबा सरी पद्धतीने जी कांदा लागवडीचे प्रमाण आहे ते त्या तुलनेमध्ये विदर्भात कमी आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत सरी वरंबा, ठिबक सिंचन व त्याद्वारे विद्राव्य खतांचा वापर आणि तंत्राचा पारंपरिक कांदा लागवडीसोबतचा तुलनात्मक अभ्यास तेथील तज्ञ वर्ग करत आहे. जवळपास २ वर्ष हा अभ्यास सुरू आहे जे की यामधून ३३ टक्केपर्यंत पाणी बचत, कांद्याचा एकसमान आकार, दर्जा सुधार व साठवणुकीची ५ महिन्यांपर्यंत टिकवण असे सकारात्मक नित्कर्ष पुढे आले आहेत.
तंत्रशुद्ध लागवड पद्धत :-
१. कांदा पिकाची लागवड करण्यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करणे.
२. कांदयातील वाफ्याची उंची ही १५ ते २० सेमी असावी तर दोन्ही सरीमधील अंतर हे ४ फूट असावे.
३. दोन रोप आणि दोन ओळीतील अंतर १० बाय १० सेमी असावे.
४. या पद्धतीने जर तुम्ही रोपांची लागवड केली तर हेक्टरी ८ लाख ८० हजार ते ९ लाख ७० हजार रोपे बसतात.
कमी पाण्यात अधिक उत्पादकता :-
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये मिरची व भाजीपाला विभागात ठिबक सिंचन पद्धतीचा कसा वापर करायचा याबाबत अभ्यास केला जात आहे.
- जमिनीच्या मगदुराप्रमाणे एक किंवा दोन लॅटरचा वापर केला जातो तर भारी जमिनीत एक लॅटर पुरेसा आहे.
- ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा यामध्ये वापर केला जातो. ठिबक सिंचनामुळे फर्टिगेशन दर सहा दिवसांनी केले जाते. यामध्ये प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश व ३० किलो गंधक असे देण्यात येते. पीक कालावधी हा ११० दिवसांचा असतो. ठिबकद्वारे पाणी देऊन याची बचत होते. यामुळे अतिरिक्त पाण्याचा साठा होत नाही तसेच रुंद वरंबा सरी पद्धतीचा निचरा देखील चांगला होतो. मागील दोन वर्षांच्या अभ्यासानुसार कांद्याची उत्पादकता जवळपास २५० ते ३०० क्विंटल असताना ४०० क्विंटल वाढ मिळालेली आहे. कमी पाण्यामध्ये ३० ते ४० टक्के वाढ झालेली आहे.
पारंपरिक सिंचन पद्धत :-
यंत्राच्या साहाय्याने बियाणे अधिक वापरली जातात. तर सपाट वाफ्यात रोपांची लागवड केली तर दोन रोपातील अंतर जर कमी जास्त राहिले तर रोपांची गर्दी होते आणि याचा परिणाम उत्पादनावर होतो. पाटपाणी पद्धतीने पाणी देताना दोन पाण्यातील अंतर ठेवण्यात अडचणी निर्माण होतात.
ठिबक सिंचन :-
रुंद वरंबा पद्धतीने दोन रोपातील आणि दोन ओळीतील अंतर १० सेमी ठेवले जाते. यामुळे एक होते की अन्नद्रव्य, पाणी, सूर्यप्रकाश आणि हवा मिळवण्यासाठी कोणताही परिणाम होत नाही. प्रत्येक रोपाला समान घटक भेटतात. ठिबक पद्धतीने पाणी दिल्याने दुसऱ्या दिवशी ही समान पाणी देता येते. जे की असे केल्याने पाण्याची बचत होते. अशा पद्धतीने सर्वकाही केले तर जवळपास ३३ टक्के पाण्याची बचत होते.
कांदा हंगामनिहाय जाती :-
राजगुरुनगर केंद्रात हंगामासाठी ३ जाती :- खरीप-लेटखरीप (गडद लाल रंग)- एन-५३, बसमत ७८०, भीमा सुपर, फुले समर्थ, भीमा रेड, भीमा शुभ्र, अॅग्री फाउंड व्हाइट, रब्बी (लाल कांदा), भीमा शक्ती, एएफएलआर, (भगवा) एन-२-४-१. (पांढरा) फुले सफेद आणि अकोला-सफेद, भीमा शुभ्रा, भीमा श्वेता, ॲग्री फाउंड व्हाइट.
Published on: 04 April 2022, 06:06 IST