डॉ.आदिनाथ ताकटे, ऐश्वर्या राठोड
कमी कालवधीत व कमीत कमी पाण्यात येणारे चांगला आर्थिक फायदा देणारे ,उन्हाळ्यातील तापमान मुगाच्या वाढीसाठी उत्तम असून मुगाचे चांगले उत्पादनासाठी शिफारशीत सुधारीत वाणांची निवड फायदेशीर ठरू शकते. तर चला मूगाच्या वाणांची अधिक माहिती घेऊयात. मूग लागवडीसाठी जमीन मध्यम ते भारी आणि चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. पाणथळ, क्षारपड, चोपण तसेच उताऱ्यावरील हलक्या जमीनीवर मुगाची लागवड करू नये.
लागवडीची वेळ व अंतर
•उन्हाळी मुगाची पेरणी फेब्रुवारी चा शेवटचा आठवडा आठवडा ते मार्चचा पहिला आठवडा या दरम्यान करावी. उशिरा पेरणी केल्यास हे पीक पावसात सापडण्याची शक्यता असते.
•पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. पेरणी करताना दोन ओळींत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी. ठेवावे.
बियाणे आणि बीजप्रक्रिया
•हेक्टरी १५-२० किलो बियाणे वापरावे.
•पेरणीपूर्वी कार्बेन्डाझीम ३ ग्रॅम/किलो अथवा ट्रायकोडर्माची ५ ग्रॅम/किलो त्यानंतर रायझोबियम व पीएसबी २५ ग्रॅम/किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
उन्हाळी मुग सुधारित वाण:
खत व्यवस्थापन
•लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत व कंपोस्ट खत हेक्टरी ५ टन द्यावे.
•पेरणीच्या वेळी हेक्टरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद अथवा १०० किलो द्यावे.
•पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरिया (२० ग्रॅम प्रती लिटर पाणी) फवारणी करावी.
•तसेच शेंगा भरत असतांना २ टक्के डीएपी (२० ग्रॅम डीएपी प्रती लिटर पाणी) फवारणी करावी
आंतरमशागत
•पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी हलकीशी डवरणी करावी. त्यानंतर गरज भासल्यास १०-१२ दिवसानी परत एकदा खुरपणी करावे.
•शेक्यतो पेरणी पासून ३०-३५ दिसापर्यंत शेत ताण विहरीत ठेवावे.
पाणी व्यवस्थापन
•पेरणीपूर्वी एक पाणी द्यावे व वापस्यावर आल्यानंतर पेरणी करावी.
•पेरणीनंतर पहिल्यांदा ३-४ दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे.
•पहिल्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. पिकास साधारणपणे ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या संपूर्ण कालावधीत द्याव्यात.
•विशेषतः पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा भरताना पाण्याच्या ताण पडू देऊ नये.
काढणी व उत्पादन
मूगाच्या शेंगा ७५ टक्के वाळल्यानंतर पहिली तोडणी व त्यानंतर ८-१० दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात. शेंगा खळयावर चांगल्या वाळल्यावर मळणी करावी. साठवणीपूर्वी मूग धान्य ४-५ दिवस चांगले उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. वरील प्रमाणे सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उन्हाळी मुगाची जातीपरत्वे ४ ते ५ क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळू शकते.
वाण पुढीलप्रमाणे
वैभव
प्रसारण वर्ष – २००१, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी : ७०-७५ दिवस
वैशिष्टे : १) खरीप व उन्हाळी हंगामासाठी प्रसारित , २) अधिक उत्पन्न, मध्यम हिरवे दाणे, ३) भुरी रोग प्रतिकारक्षम
उत्पादन (क्विं/हे.) - १४-१५ क्विं/हे.
पी.के.व्ही, ए.के.एम-४
प्रसारण वर्ष :२०११ महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी : ६५-७० दिवस
वैशिष्टे : १) अधिक उत्पादन, मध्यम आकाराचे दाणे, २) एकाच वेळी पक्वता येणारा वाण, ३) भुरी रोग प्रतिकारक
उत्पादन (क्विं/हे.) – १०-१२ क्विं/हे.
पी.के.व्ही, ग्रीन गोल्ड (AKAM 9911)
प्रसारण वर्ष :२००७ विदर्भासाठी प्रसारित
पिकाचा कालावधी : ७०-७५ दिवस
वैशिष्टे : १)अधिक उत्पादन, मध्यम आकाराचे दाणे, २) एकाच वेळी पक्वता येणारा वाण, ३) भुरी रोग प्रतिकारक, ४) खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य
उत्पादन (क्विं/हे.) – १०-११ क्विं/हे.
बी.एम. २००३-२
प्रसारण वर्ष : २०१०, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी : ६५-७० दिवस
वैशिष्टे : १) मध्यम आकाराचे दाणे, एकाच वेळी पक्वता येणारा वाण, २) भूरी रोग प्रतिकारक्षम
उत्पादन (क्विं/हे.) – १२ -१४ क्विं/हे.
बी.एम. २००२-१
प्रसारण वर्ष – २००५ महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी – ६५-७० दिवस
वैशिष्टे : १) टपोरे दाणे, लांब शेंगा, अधिक उत्पादन, २) एकाच वेळी पक्व होणारा वाण, ३) भुरी रोग प्रतिकारक्षम
उत्पादन (क्विं/हे.) – १२ -१४ क्विं/हे.
बी.पी.एम.आर. १४५
प्रसारण वर्ष:२००१, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी : ६५-७० दिवस
वैशिष्टे : १) टपोरे, हिरवे दाणे, लांब शेंगा, २) भुरी रोग प्रतिकारक्षम, ३) खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य
उत्पादन (क्विं/हे.) – १२ -१४ क्विं/हे.
उत्कर्ष
प्रसारण वर्ष – २००८, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी – ६५-७० दिवस
वैशिष्टे - अधिक उत्पन्न, टपोरे हिरवे दाणे
उत्पादन (क्विं/हे.) – १२ -१४ क्विं/हे.
फुले चेतक
प्रसारण वर्ष :२०२०, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी – ६५-७० दिवस
वैशिष्टे : १) टपोरे हिरवे दाणे, लांब शेंगा, २) अधिक उत्पादनक्षम वाण, ३) भुरी रोग प्रतिकारक्षम
उत्पादन (क्विं/हे.) – १२-१५ क्विं/हे.
पुसा वैशाखी
प्रसारण वर्ष :१९७१, महाराष्ट्र मध्यप्रदेश व गुजरात राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी: ६०-६५ दिवस
वैशिष्टे : उन्हाळी हंगामासाठी योग्य
उत्पादन (क्विं/हे.) – ६-७ क्विं/हे.
फुले एम-२
प्रसारण वर्ष :२०११, महाराष्ट्र मध्यप्रदेश व गुजरात राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी– ६०-६५ दिवस
वैशिष्टे : १) मध्यम हिरवे चमकदार दाणे, २) खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य
उत्पादन (क्विं/हे.) :११-१२ क्विं/हे.
बी एम-४
प्रसारण वर्ष :२०११, महाराष्ट्र मध्यप्रदेश व गुजरात राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी:६०-६५ दिवस
वैशिष्टे : १) मध्यम हिरवे चमकदार दाणे, २) खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य
उत्पादन (क्विं/हे.) – १०-१२ क्विं/हे.
एस-८
प्रसारण वर्ष :२०११, महाराष्ट्र मध्यप्रदेश व गुजरात राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी– ६०-६५ दिवस
वैशिष्टे :१) हिरवे चमकदार दाणे, २) खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य
उत्पादन (क्विं/हे.) – ९-१० क्विं/हे.
कोपरगाव
प्रसारण वर्ष :१९८२, महाराष्ट्र मध्यप्रदेश व गुजरात राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी– ६०-६५ दिवस
वैशिष्टे :१) हिरवे चमकदार दाणे, २) उन्हाळी हंगामासाठी योग्य वाण
उत्पादन (क्विं/हे.) – ९-१० क्विं/हे.
आय.पी.एम. ४१०-३ (शिखा)
प्रसारण वर्ष :२०११, महाराष्ट्र मध्यप्रदेश व गुजरात राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी:६५-७० दिवस
वैशिष्टे :१) उन्हाळी हंगामासाठी, २) पिवळा विषाणू प्रतिकारक
उत्पादन (क्विं/हे.) – ११-१२ क्विं/हे.
आय.पी.एम. २०५-७ (विराट)
प्रसारण वर्ष :२०१६, देशाचे सर्व विभागासाठी प्रसारित
पिकाचा कालावधी :५२-५६ दिवस
वैशिष्टे : १) उन्हाळी हंगामासाठी, २) पिवळा विषाणू प्रतिकारक
उत्पादन (क्विं/हे.) – १०-११ क्विं/हे
पी.के.व्ही .मुग ८८०२ ( AKM 8802)
प्रसारण वर्ष :२००१
पिकाचा कालावधी :60-65 दिवस
वैशिष्टे : १)लवकर व एकाच वेळी पक्व होणारा, २) भुरी रोगास साधारण प्रतिकारक्षम
उत्पादन (क्विं/हे.) – १०-११ क्विं/हे
टी ए आर एम -१
प्रसारण वर्ष :१९९७ मध्यम आणि दक्षिण भारत विभागाकरीता प्रसारित
पिकाचा कालावधी :७५-८० दिवस
वैशिष्टे : १) लवकर व एकाच वेळी पक्व होणारा, २) भुरी रोगास प्रतिकारक्षम
उत्पादन (क्विं/हे.) :१२-१३ क्विं/हे
लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे, मृद शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ ,राहुरी, मो.९४०४०३२३,
ऐश्वर्या राठोड, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
Published on: 19 January 2024, 02:11 IST