फिरते पुर्व शीतकरण केंद्र हे फिरते केंद्र असुन शेतकरी यांच्या शेतावर जाउन फलोत्पादीत, औषधी व सुगंधी वनस्पती मालाचे पुर्व शीतकरण करणे अपेक्षीत आहे. फलोत्पादीत, औषधी व सुगंधी वनस्पती मालाची काढणी झाल्यानंतर/प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर त्यातील उष्णता (field heat)कमी करणे आणि आवश्यक्तेनुसार पुढिल कार्यवाही करणे तसेच फलोत्पादीत, औषधी व सुगंधी वनस्पतीचा टिकाउपणा वाढविणे यासाठी पुर्व शीतकरण केन्द्राची आवश्यकता असते.
अर्थसहाय्याचे स्वरुप-
अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च- रु.25 लाख.
प्रती यूनिट प्रकल्प क्षमता - 6 मे.टन
सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारत घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल रु.8.75 लाख अर्थ साह्य देय आहे.
डोंगराळ व अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारत घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.12.50 लाख अर्थ साह्य देय आहे.
अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात.
अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वतः उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही. मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखा परिक्षण केलेल्या मागिल 3 वर्षाचे पुरावे सादर करावे लागतील.
क. अशा प्रकारचे पुर्व शीतकरण गृह हे फिरत्या स्वरुपाचे असुन यामध्ये वाहन आणि मशिनरिचा खर्च हा भांडवली खर्च म्हणून गृहित धरण्यात येइल. मात्र वाहन हे याच उद्देशासाठी घेतलेले आहे याबाबत आर.टी.ओ. कडे वाहनाची नोंद करणे आवश्यक आहे.
अधिक माहिती साठी-https://drive.google.com/file/d/1bkCdOilGALDnjQXrzVUswjto3xDTTJFU/view?usp=drivesdk
Published on: 07 February 2022, 05:38 IST