Agripedia

लसुन हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो आणि त्यासोबतच मिरची हे विटामिन सी चे भंडार आहे. या दोन्ही गोष्टी किचनचे सौंदर्य वाढवतात. कुठल्याही खाद्यपदार्थाचे चव दोघांशिवाय अपूर्णच राहते. त्यामुळे कोणताही ऋतू असो लसुन आणि मिरचीची मागणी बाजारपेठेत कायम असते. त्यामुळे शेतकरी लसुन आणि मिरचीच्या शेतीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देऊ लागले आहेत.

Updated on 14 August, 2022 8:33 PM IST

लसुन हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो आणि त्यासोबतच मिरची हे विटामिन सी चे भंडार आहे. या दोन्ही गोष्टी किचनचे सौंदर्य वाढवतात. कुठल्याही खाद्यपदार्थाचे चव दोघांशिवाय अपूर्णच राहते. त्यामुळे कोणताही ऋतू असो लसुन आणि  मिरचीची मागणी बाजारपेठेत कायम असते. त्यामुळे शेतकरी लसुन आणि मिरचीच्या शेतीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देऊ लागले आहेत.

शेतीमध्ये शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असून शेतीमधील अनेक नवीन कल्पनांमुळे  तरुण त्यामध्ये सहभागी होऊन चांगला नफा कमावू लागले आहेत. या लेखात आपण लसून आणि मिरचीच्या मिश्र लागवडीबद्दल माहिती घेऊ, जेणेकरून कमी गुंतवणुकीत शेतकरी बांधवांना अधिक नफा मिळेल.

नक्की वाचा:Chilli Crop Management:'या' रोगाचे नियंत्रण कराल तरच मिळेल मिरचीपासून भरघोस उत्पादन, वाचा त्याबद्दल सविस्तर माहिती

 लसूण आणि मिरचीला खूप मागणी

 लसूण आणि मिरची यांना आज बाजारपेठेत जास्त मागणी असून त्यांच्या शिवाय कोणत्याही घरात स्वयंपाक होऊच शकत  नाही. त्यामुळे या दोघा पिकांची मिश्र शेती केली तर सोने पे सुहाना अशी परिस्थिती होऊ शकते.

कारण या दुहेरी शेतीतून दुप्पट नफा शेतकरी बांधवांना मिळू शकतो. या दोन्ही पिकांची मिश्र शेती करणारे शेतकरी बांधव सांगतात की, हे पद्धत खूप सोपी आहे आणि कोणीही मिश्र शेती थोड्याशा कष्टाने आणि तंत्रज्ञान वापरून करू शकतात.

नक्की वाचा:अवघ्या 6 महिन्यात लखपती करणारी शेती! आयुर्वेदातही वाढत आहे मागणी

 एकरी 50 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणे शक्य

 लसूण आणि मिरच्या मिश्र लागवडीतून एकरी 50 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न सहज मिळू शकते असे जाणकार सांगतात. लसणाच्या तुलनेत मिरची लवकर खराब होते त्यामुळे मिरचीची वेळेवर बाजारात पोहोचवण्याची व्यवस्था करणे आवश्यक असते.

परंतु लसुन हे दीर्घकाळ टिकणारे पीक असल्याने ते साठवता देखील येते. मिश्र शेती मध्ये तुलनेने उत्पादन कमी मिळते परंतु दोन पैकी एका पिकाला भाव जास्त असल्यास त्याची भरपाई भरून चांगला नफा मिळण्याची शक्यता जास्त असल्याचे देखील कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नक्की वाचा:Tommato Tips:टोमॅटोच्या भरघोस उत्पादनाचे गुपित आहे रोपवाटिकेत,'या' टीप्स ठरतील महत्त्वाच्या

English Summary: mix cultivation of chilli and garlic crop is can give more profit to farmer
Published on: 14 August 2022, 08:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)