सध्या जवळपास प्रत्येक भारतीय घरात मनी प्लांट (Money Plant) लावलेला दिसतो. काही लोकांना मनी प्लांट घरात ठेवायला आवडते तर काहींना बाल्कनीत लावायला आवडते. घराची शोभा वाढवण्यासाठी लोक मनी प्लांट्स लावतात खर पण काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
मनी प्लांट आपल्याला प्रदूषणापासून तर वाचवतोच पण ऑक्सिजनही (oxygen) चांगला देतो. वास्तुशास्त्रात मनी प्लांटचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की घरात मनी प्लांट लावल्याने आर्थिक स्थिती लगेच सुधारते.
अनेकदा लोक आपल्या घरात कोणत्याही ठिकाणी मनी प्लांट ठेवतात पण ते करू नये. वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट (Money Plant) लावण्यासाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे योग्य पालन केल्यास तुम्हाला फायदा होईल मात्र मनी प्लांट लावताना तुम्ही काही चुका केल्या तर त्यामुळे तुमच्यावर मोठे आर्थिक संकटही येऊ शकते.
मनी प्लांटला वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज नसते, ते घराच्या आताही व्यवस्थित वाढते. त्यामुळे मनी प्लांट कायम घराच्या आताच ठेवावे. ते घराबाहेर लावू नये. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या अग्निमय दिशेला (Fiery direction) लावावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मकता दूर होते.
आग्नेय दिशेला मनी प्लांट लावल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर-पूर्व दिशेला मनी प्लांट कधीही ठेवू नये. असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते.
Agricultural Business: 'या' शेतीतून शेतकरी घेत आहेत लाखोंमध्ये उत्पन्न; जाणून घ्या
मनी प्लांट दक्षिण पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते. घरामध्ये मनी प्लांट लावताना हे लक्षात ठेवा की मनी प्लांटची वेल जमिनीला स्पर्श करू नये किंवा मनी प्लांट कधीच लटकत्या अवस्थेत ठेऊ नये. कारण हे अशुभ मानले जाते.
यामुळे तुमचे आर्थिक नुकसान (financial loss) होऊ शकते. घरातील सदस्यही आजारी पडू शकतात. तसेच घरातील सुख-समृद्धीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. तुम्ही मनी प्लांटला दोरी किंवा काठीच्या मदतीने वरच्या बाजूला बांधू शकता. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचे नशीबही पालटेल.
महत्वाच्या बातम्या
Soil Fertility: शेतातील मातीची सुपिकता 'या' सोप्या मार्गांनी वाढवा; जाणून घ्या
Agricultural Technology: आता फोनवर उपलब्ध होणार कृषी उपकरणे; नवीन अॅप लॉन्च
Planting Vegetables: भाजीपाल्याची रोपवाटिका तयार करून व्हा मालामाल; 'या' पद्धतीचा करा अवलंब
Published on: 09 August 2022, 09:31 IST