मशरूम चे विविध प्रकार आहेत.वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचेमशरूमचे उत्पादन घेतले जाते. वेगवेगळे हवामानात चांगल्या उत्पादनासाठीहे मशरूम उत्तम असतात.मशरूम चे विविध प्रकार आहेत जसे आयस्टर मशरूम, बटन मशरूम इत्यादी.
मशरूम चे तसे हजारो प्रकार आहेत परंतु खाण्यासाठी योग्य अशा काही मोजक्याच प्रजाती आहेत. मशरूम या पिकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण शेतीशिवाय मशरूमचे उत्पादन घेऊ शकतो आणि कमी जागेत शेती करता येते. कमी गुंतवणुकीमध्ये अधिक नफा आपल्याला मिळतो.चांगले व्यवस्थापन आणि प्रशिक्षण घेतले तर मशरूमचे उत्पादनएक आर्थिक कणा बनू शकतो. या लेखात आपण मिल्की मशरूम विषयी माहिती घेऊ.
मिल्की मशरूम
मिल्की मशरूम ची लागवड उन्हाळ्याच्या काळात केली जाते. जर या प्रकारच्या मशरूम ची लागवड आपण व्यावसायिकदृष्ट्या केली त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकतो. या मशरूम साठी 28 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान तसेच 80 ते 90 टक्के आर्द्रताअसावी लागते.अधिक तापमानात देखील मशरूमचे उत्पादन चांगले येते.
मशरूमच्या उत्पादनासाठी आवश्यक साहित्य
मिकी मशरूम साठी एक अंधार असलेली खोली,बियाणे, भुसा,हायड्रोमीटर,फवारणी यंत्र,वजन करणारी मशीन,पेंढा कटिंग करणारी मशीन,प्लास्टिक ड्रमआणि शीट,पीपी बॅग ठाणे रबर बँडइत्यादी साहित्य आवश्यक असते. झेंडा कापल्यानंतर आपण त्याला आपल्या कापडाच्या छोट्या पिशव्यांमध्ये भरला आणि कमीतकमी 12 ते 16 तास गरम पाण्यात बुडवून ठेवावे लागते. जेणेकरून पेंढा पाणी चांगले शोषून घेईल.
लागवडीपूर्वी ची तयारी
जेथे आपण लागवड करणार आहोत त्या ठिकाणी भुसाघालण्यापूर्वी संबंधित जागा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी किंवा फार्मोलीनची फवारणी करावी.रासायनिक उपचारांसाठी सिमेंटच्या टाक्यांमध्ये 90 लिटर पाण्यात दहा किलो भुसा भिजत घालावा. त्यानंतर एका बादलीमध्ये 10 लिटर पाणी घेऊन त्यात दहा ग्रॅम वेबिस्टीनआणि पाच मिलि फार्मोलीनमिसळावे.हे द्रावण ड्रममध्ये भिजलेल्या भुसा मध्ये घालावी.संबंधित ड्रमला पॉलिथिन ते झाकून ठेवावे आणित्यावर काही वजनाची सामग्री ठेवावी.जवळजवळ हा भुसा 12 ते 16 तास भिजल्यानंतर ड्रम मधून पेंडा काढून त्याच जमिनीवर पसरून ठेवावे जेणेकरून जास्त असलेले पाणी बाहेर येते.या सगळ्या प्रक्रियेनंतरपेंडा हा मिकी मशरूमच्या लागवडीसाठी तयार होतो.
एक किलो भूशासाठी 40 ते 50 ग्रॅम बियाणे आवश्यक असते. यामध्ये 16 सेंटी मीटर रुंद आणि 20 सेंटिमीटर उंच पीपी बॅग मध्ये तयार केलेला पेंडा टाकावा. बियाणे जोडल्यानंतर त्यावर उपचारीतपेंडा घाला.पीपी बॅग मध्ये दोन ते तीन पृष्ठभाग पेरणी करता येते. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपण पीपी बॅग बांधावी आणि त्यास एक काळोख्या खोलीत ठेवावे. याला दोन ते तीन आठवड्यांपर्यंत तापमान 28 ते 38 डिग्री ठेवावे आणि आर्द्रता 80 ते 90 टक्के ठेवावी.
काही दिवसानंतर बॅगा या बुरशीमुळे भरलेले दिसतात.यानंतर तुम्ही त्यावर केसिंग करा. केसिंग साठी जुने शेण उपयुक्त मानले जाते.ओलावा टिकण्यासाठी पाण्याची फवारणी देखील करावी लागते.
मिल्की मशरूमची काढणी
जवा मशरूम 5 ते 7 सेंटीमीटर झाल्यावर त्याला तोडावी लागते. तयार मशरूम पीपी बॅग मध्ये ठेवावे. एक किलो भुशापासून आपल्याला एक किलो ताजा मिल्की मशरूम मिळतो.यासाठी प्रति किलो 20 ते 25 रुपये खर्च येत असतो. परंतु विक्री ही त्याची दोनशे ते चारशे रुपये प्रति किलो दराने होते. अशा प्रकारे शेतकरी मशरूमच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
Published on: 28 August 2021, 01:59 IST