दुधाला दर वाढ व एफआरपी कायदा (उत्पादन खर्चावर आधारित) करू असे दुग्ध विकास मंत्र्यांनी आश्वासन देऊन सहा महिने उलटले. अजुन निर्णय नाही. ह्या हिवाळी अधिवेशनात तरी काही निर्णय होईल का?
दुधाला भाव न मिळण्याचे अजुन एक कारण म्हणजे भेसळ.
शिवकृपा दुध संकलन केंद्र खर्डा जामखेड, अहमदनगर येथे भेसळ केलेले 8497 लिटर दुध बारामती येथे पकडुन जप्त करण्यात आल्याची छोटी बातमी होती. *हे म्हणजे हिमनगाचे एक टोक होते.
ह्याचा छडा लावण्यासाठी आम्ही अन्न आणि औषध आयुक्तांकडे (FDA) माहीती आधिकार कायद्या अंतर्गत अर्ज दाखल केला होता. समाधानकारक उत्तर न आल्यामुळे उच्च आधिकाऱ्याकडे प्रथम अपील, मग सुनावणी असा पाठपुरावा केल्यानंतर तब्बल 102 दिवसांनी सोबत जोडलेली माहीती मिळवली.
त्यानुसार दुधामध्ये खालील भेसळ आढळली आहे.
फॕटः फक्त 2.0
एसएनएफः 12.39
B. R. Reading (Butyro- Refractometer): 43.6
ग्ल्युकोज (Glucose): पाॕझिटिव्ह
डिटरजंट टेस्ट (धुण्याची पावडर: पाॕझिटिव्ह
असुरक्षित घोषित.
दूध हे ‘आदर्श अन्न’ (पुर्णांन्न) मानले जाते. कारण त्यात लहान मुले, तरूण, प्रौढ, गरोदर महीला यांच्या साठी प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, जीवनसत्व आणि खनिजे ह्या भरपूर पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे. दुर्दैवाने अश्या भेसळीमुळे माफिया लोकांच्या जिवाशी खेळतात.
शेतकरी प्रामाणिकपणे चांगल्या प्रतीचे दुध देतात*. पण डेअरी चालक, दुध संघ, संकलन केंद्रात भेसळ केली जाते.
सध्या संबंधितांवर प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) ग्रामीण पोलिस बारामतीमध्ये नोंदविण्यात आला आहे. आमचा पुढील पाठपुरावा चालु आहे. कारण ह्यांना शिक्षा झाली म्हणजे इतरांना जरब बसेल.
पण खरी गरज आहे ह्यांना पाठीशी घालुन, फाईल बंद करणाऱ्यांना शोधण्याची.
ह्यासंदर्भात केंद्राचा "अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 व अधिनियम, 2011" आहे. महाराष्ट्र राज्याने 3 वर्षापुर्वी "The Prevention of food Adulteration (Maha. Ammendment) Act- 1969" मध्ये 'दुध व खाद्य पदार्थात भेसळ केल्यास कठोर आजन्म कारावास व अजामिनपात्र गुन्हा'असा बदल आणण्याचा प्रयत्न केला. (जसा बहुदा मध्यप्रदेश मध्ये आहे.) सध्या ह्या गुन्ह्याला फक्त सहा महीने शिक्षा व एक लाख रू. दंड आहे.
दुध भेसळ करणाऱ्या प्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी अशी तरतुद आवश्यक आहे. "दुध भेसळ माफीयांवर भरारी पथक व्हॅनस तर्फे तपासणी करून कडक कारवाई करा" अशी आपली अनेक मागण्यांपैकी एक आहेच.
सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518
एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!
Published on: 05 January 2022, 03:23 IST