Agripedia

पिकांमध्ये फुलधारणा, फळधारणा रोग प्रतिकारकशक्ती यासारख्या कार्यांमध्ये सूक्ष्म पोषक (जीवनसत्व)घटकांची गरज असते. त्यासाठी पीक लागवडीच्या आधी माती परीक्षण केल्यास आपणास आपल्या शेतात कोणत्या घटकाची कमतरता आहे, हे लक्षात येईल आणि त्याप्रमाणे आपण सूक्ष्म पोषक घटकाचा वापर आपल्या शेतात योग्यप्रकारे करू शकतो. सर्व साधारणपणे पानाच्या रंगावरून सूक्ष्म पोषक घटकाची कमतरता ओळखता येते.

Updated on 19 January, 2022 10:56 PM IST

पिकांमध्ये फुलधारणा, फळधारणा रोग प्रतिकारकशक्ती यासारख्या कार्यांमध्ये सूक्ष्म पोषक (जीवनसत्व)घटकांची गरज असते. त्यासाठी पीक लागवडीच्या आधी माती परीक्षण केल्यास आपणास आपल्या शेतात कोणत्या घटकाची कमतरता आहे, हे लक्षात येईल आणि त्याप्रमाणे आपण सूक्ष्म पोषक घटकाचा वापर आपल्या शेतात योग्यप्रकारे करू शकतो. सर्व साधारणपणे पानाच्या रंगावरून सूक्ष्म पोषक घटकाची कमतरता ओळखता येते.

जर पहिलं तर १६ पोषक घटक असतात. त्यामध्ये १३ अन्नद्रव्य जमिनीतून घेतली जातात. तर ३ हवा आणि पाण्यातून मिळतात. नेहमी आपण जो आपल्या पिकांना खतांचा पुरवठा करतो त्यातून नत्र, स्फुरद, आणि पालाश त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे घटक मिळत असतात. खाली दिल्याप्रमाणे १६ पोषक घटकांची वर्गवारी करण्यात आली आहे.

हवा आणि पाण्याद्वारे मिळणारे घटक : कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन
महत्वाचे पोषक: नायट्रोजन(N), फॉस्फोरस(P), पोटॅशियम(K)
माध्यमिक पोषक: कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर
सूक्ष्मपोषक: बोरॉन (Boron - B), क्लोरीन (chlorine - Cl), तांबे (copper - Cu), लोह (iron - Fe), मॅगनीज (manganese - Mn), मोलिब्डेनम (molybdenum  - Mo) आणि जस्त (zinc - Zn).

जैव घटकाची संक्षिप्त माहिती

बोरॉन (Boron - B):

बोरॉन हे पिकांमध्ये कोशिका विभाजनाचे (cell division) कार्य करतात. या पृथ्वीवरील कोणत्याही सजीवाची वाढ होत असताना त्याच्या कोशिकाचे  विभाजन होत असते. कोशिका विभाजनामध्ये व्यतेय आला तर पिकांची योग्यप्रकारे वाढ होत नाही. बोरॉनच्या कमतरता हि कोंबांच्या वाढीमध्ये फूल आणि फळामध्ये दिसून येते.

क्लोरीन (chlorine - Cl):

क्लोरीनमुळे प्रकाशसंस्लेषणक्रिया सुधारते. क्लोरीनचा योग्य वापर केल्यास धान्य पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पालाश Potassium (K) आणि क्लोरीन एकत्रित प्रकाशसंलेशन क्रिया योग्यरीत्या कार्यरत ठेवतात. तसेच पिकांच्या अंतर्गत पाणी व्यवस्थापनामध्ये पालाश आणि क्लोरीन महत्वाची भूमिका पार पडतात.

 

तांबे (copper - Cu): 

तांबे प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक भूमिका पार पाडत असते. पिकांच्या श्वसन प्रक्रियेसाठी आवश्यक असते. पिकांच्या फळाची चव, रंग आणि फुलाचा रंग हा योग्य प्रमाणात तांबे असल्यास उत्तम होतो. तांबे स्थिर आहे. म्हणजेच त्याच्या कमतरतेची लक्षणे नवीन पानांमधे उद्भवतात. नवीन येणारी पाने लहान येतात आणि पानांना तेज नसतो.

लोह :

लोह हा घटक अत्यंत महत्वाचा घटक आहे. क्लोरोफिल(हरित द्रव्य) मुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो. वनस्पती लोह शिवाय क्लोरोफिल तयार करू शकत नाहीत. शिवाय, त्या ऑक्सिजन पण घेऊ शकत नाहीत. म्हणून लोह हा घटक पानांचा हिरवा रंग कायम ठेवण्यास मदत करतो.

हेही वाचा : कृषी विभागाचा कानमंत्र! संयुक्त खत वापरण्याऐवजी "या" खतांच्या मिश्रणाचा वापर करा

मॅगंनीज (manganese - Mn):

प्रकाशसंश्लेषण, श्वासोच्छ्वास, आणि नायट्रोजन योग्य पद्धतीने ग्रहण करणे यासारख्या विविध कार्यासाठी  वनस्पतींमध्ये मँगनिजचा वापर केला जातो. मँगेनजमुळे  पराग उगवण, परागनलिकामध्ये वाढ होते आणि रोगजनकांच्या प्रतिकारशक्तीशी मध्ये वाढ होते.मॅगनीजच्या कमतरतेमुळे पिकांची वाढ खुंटते आणि पिके आहे त्याच स्थितिमध्ये राहतात. 

मोलिबडेनम (molybdenum  - Mo):

पिकामध्ये असलेले नायट्रेट किंवा मातीतून घेतलेले नत्र प्रोटीन मध्ये रुपांतरीत करण्यासाठी मोलिबडेनम चा उपयोग होतो. मोलिबडेनम योग्य प्रमाणात ना मिळाल्यास नत्राची कमतरता असलेली लक्षणे दिसून येतात. आणि त्यामुळेच नायट्रेट न वापरता संचय झाल्याने पानांची कडा कारपल्यासारख्या दिसतात.

 

जस्त (Zn):

हे आठ आवश्यक पोषक घटकांमधील एक आहे. वनस्पतींसाठी कमी प्रमाणामध्ये हे आवश्यक असले तरी रोपांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. जस्त  हे झाडांमधील अनेक एंझाइम्स आणि प्रथिने यामधील एक मुख्य घटक आहे. जस्त हे विशिष्ट प्रथिनांच्या संश्लेषणासाठी जबाबदार असलेल्या एन्झाइम ला  सक्रिय करतात. हे क्लोरोफिल आणि काही कार्बोहायड्रेट निर्मिती, स्टार्च चे साखरेत रूपांतर करणे, वनस्पतींच्या ऊतीमध्ये थंड तापमान रोखण्यात मदत करते.

English Summary: Micronutrients in crops and their function
Published on: 19 January 2022, 10:56 IST