Agripedia

बियाणे जमिनीत लावल्यानंतर किंवा पेरल्यानंतर त्याच्या उगवणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत वाढ, फलधारणा होण्याच्या प्रत्येक टप्प्यात जमिनीतून मिळणाऱ्या नायट्रोजन, पालाश, स्फुरद या मुख्य घटकांची आवश्यकता असते.

Updated on 15 August, 2020 5:04 PM IST


बियाणे जमिनीत लावल्यानंतर किंवा पेरल्यानंतर त्याच्या उगवणी  पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत वाढ,  फलधारणा होण्याच्या प्रत्येक टप्प्यात जमिनीतून मिळणाऱ्या नायट्रोजन, पालाश,  स्फुरद या मुख्य घटकांची आवश्यकता असते.  त्याबरोबरच लोह,  जस्त,  तांबे,  मॅगेनीज व बोरॉन यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची ही तितकीच गरज असते.  जर हे सगळे घटक पिकांना योग्य प्रमाणात मिळाले, तर पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होते.  जमिनीमध्ये जर या घटकांची कमतरता असली तर पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येतो.  व त्याची लक्षणे संबंधित पिकांवर दिसतात.  काही सूक्ष्म द्रव्यांची कमतरता असल्यास त्यांचे लक्षणे पुढीलप्रमाणे.

 तांबे-  तांबे या सूक्ष्म द्रव्याची कमतरता असेल तर प्रथम कोवळी पाने गर्द हिरवी पडतात व कालांतराने फिकट पिवळी होऊन गळून पडतात. पाने पिवळी होऊन दुमडतात व देठाजवळ वाळतात. फुलधारणाच्या काळात फुले न उमलता फुले गळून पडतात.  ज्वारी, बाजरी सारख्या पिकांमध्ये कणसांमध्ये पुरेशी दाणे भरत नाहीत.  फळझाडांमध्ये ही झाडांची शेंडे गळून पडतात लोह - लोहाच्या कमतरतेमुळे कोवळ्या पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो.  मात्र शिरा हिरव्या राहतात. पानांना हिरवा रंग येण्यासाठी जरी आपण नत्राचा उपयोग केला तरी पानांना हिरवा रंग येत नाही. पीक फुलोऱ्यात घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अनियमितता येते. फळ पिकांमध्ये फळांचा आकार लहान होतो व नवीन फांद्या वाकड्या होतात.

जस्त - जस्त या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे झाडांच्या शेंड्याची वाढ मर्यादित प्रमाणात होऊन, त्यांचे रूपांतर पुर्ण गुच्छात होते. पानांमध्ये हरितद्रव्याचा अभाव दिसून येतो.  त्यामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. बऱ्याच ठिकाणी पाने जळून त्यांची पानगळ होते. पिकाला फुलोरा कमी प्रमाणात येऊन पीक फुलावर येण्यास उशीर होतो. व फळझाडांमध्ये फळांचा आकार लहान होतो.

 


बोरॉन-  बोरॉनच्या कमतरतेमुळे पाणी पिवळी पडून ते पाणी खडबडीत व कडक होतात. व त्यांचा आकार बेढब होतो. पिकांच्या शेंड्याकडील भागात जी कोवळी पाने येतात ते पाने वाळून मुख्य शेंडा मरतो.

 मॅगेनीज-  मॅगेनीज अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे बरीचशी पानही कर आपल्या सारखे दिसतात. त्यावर तपकिरी रंगाचे डाग येतात व पान जाळीदार दिसते. पानांच्या शिरा हिरव्या व आतील भाग पिवळा दिसतो व कालांतराने पान गळून पडते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे निरीक्षण करून वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास संबंधित सूक्ष्म अन्नद्रव्याचे पुरवठा करून पिकांची स्थिती उत्तम बनवावी.

English Summary: Micronutrient deficiencies and their crop symptoms
Published on: 15 August 2020, 05:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)