Agripedia

सवणा गेल्या हंगामात सोयाबीन बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार भावानुसार दर न मिळाल्याने भावफरक देण्याची मागणी केली जात होती. ३१ डिसेंबरला येथे झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान चिखली (जि. बुलडाणा)

Updated on 02 January, 2022 10:14 PM IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. यावर 'महाबीज' प्रशासनाने पहिल्या टप्‍यात ४०० व नंतर २०० असे ६०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सुमारे २६,००० सोयाबीन बीजोत्पादकांना लाभ होईल. याचा सविस्तर अहवाल तयार करून आकडेवारी निश्‍चित होईल.

शहरात शुक्रवारी ऑफलाइन व ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने महाबीज भागधारकांसाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी महाबीजचे अध्यक्ष व राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला व्यवस्थापकीय संचालक रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी निमा अरोरा, संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, बीज परिक्षण केंद्राचे रेणापूरकर उपस्थित होते.

गेल्या हंगामात वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर वेगवेगळे होते. यामुळे बीजोत्पादकांना दर मिळताना फरक जाणवत होता. 

काही शेतकरी नुकसान होत असल्याचे सातत्याने बोलत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठा मधील दरानुसार बिजोत्पाकांना देण्यात येणारे दर ठरविण्यात येतील व सम्पूर्ण महाराष्ट्रा साठी सारखेच दर रहातील बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भाव फरकाची मागणी केली जात होती. या सभेला शेतकरी मोठ्या संख्येने चिखली तालुक्यातील सवणा येथुन आले होते. यावर क्रुषि सचिव एकनाथ डवले यांनी निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांना एकूण ६०० रुपये दिले जातील. ४०० व २०० अशा दोन टप्प्यांत हा निधी बीजोत्पादकांना प्रति क्विंटलमध्ये मिळेल.महाबीजचा २०२०-२१चा अहवाल मंजूर करण्यात आला. हरभऱ्याचा 'राजविजय २०२' वाण पुढील हंगामा पासुन महाबीज ने बंद करण्याचा निर्णय केला

        महाबीज बिजोत्पाक शेतकऱ्यांना बोलण्याचे व मुद्दे माडण्याची संधी देण्याचा निर्णय झाला

बिजोत्पादन मागणी अर्ज सातबारा,आठ अ,आधार कार्ड, बँकं पासबुक झेरॉक्स वारवांर देण्याची आवश्यक ता नाही हा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

          31/12/2021 रोजच्या वार्षीक आमसभेत भागधारक/बिजोत्पाकाच्या हितासाठी पात्र बियाण्यास बोनस म्हणुन 2016/17 हरभरा 131 रु प्रती क्यु,2018/19 सोयाबीन 200 रु प्रती क्यु, 2019/20 सोयाबीन 200 रु प्रती क्यु, करडी 902 रु प्र.क्यु, धान 750 रु प्रती क्यु, ज्वारी 1578 रु प्रती क्यु, बाजरी 1629 रु प्रती क्यु, मुग उडीद 350रु प्रती क्यु, तुर 506 रु प्रती क्यु , 2019/20 हरभरा सर्व वान 960रु प्रती क्यु या प्रमाणे तर मागील वर्षीच्या 2020/21 च्या सोयाबीन साठी 400+200 प्रती क्यु प्रमाणे बोनस देण्याचे ठरविले आहे.

महत्वाचे म्हणजे आमसभेत भागधारक शेतकऱ्या प्रमाणे बिजोत्पाक शेतकऱ्यांना बसण्यास व बोलण्यास संधी दिली त्याबद्दल बिजोत्पाक शेतकरी महाबीज अध्यक्ष व संचालक यांचे रुणी आहे.

-विजय भुतेकर

 प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Mhabeej 44 amsabha seed production farmers benifitial
Published on: 02 January 2022, 10:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)