गाजर गवत म्हणजेच काँग्रेस गवत ये शेतीमध्ये आणि सगळीकडे दिसणारे गवत आहे.या गवताचा बंदोबस्त करणे फार अवघड आहे.गाजर गवताचा बंदोबस्तही शेतकऱ्यांपुढे फार मोठी समस्या असते.परंतु गाजर गवताच्या संपूर्ण निर्मुलना करिता मेक्सिकन भुंग्यांचा वापर फायदेशीर ठरतो. याबाबत या लेखात माहिती घेऊ.
मेक्सिकन भुंग्यांचा जीवनक्रम
या किडीचे प्रौढ भुंगे मळकट पांढरे असून त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. या भुंग्यांच्या माद्याअलग अलग अथवा गुच्छात पानाच्या खालील बाजूवर अंडी घालतात.त्यांच्या अंड्यांचा रंग फिकट असून अंड्यातून अळ्या बाहेर पडण्याच्या वेळी त्या लालसर होतात.त्यांच्या अंडी अवस्था कालावधी हा चार ते सहा दिवसांचा असतो.त्या अंड्यांमधूनबाहेर निघाल्या आळ्या गाजर गवताच्या वरील भागातील अळ्या खातात. तरुण अळ्या झाडाची वाढ व फुले येण्याचे थांबवतात.होळीच्या चार अवस्था असून पूर्ण वाढलेल्या आळ्या रंगानेपिवळ्या पडतात.
- ही अवस्था 10 ते 11 दिवसाच्या असते व कोषावस्था नऊ ते दहा दिवसांनी असून कोषावस्थेत मातीत गेलेले भुंगे जमिनीतून निघून गाजर गवताच्या पानावर आपली उपजीविका करतात.पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर पर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त करतात.नोव्हेंबरनंतर हे भुंगे जमिनीत सात ते आठ महिने दडून बसतात आणि पुढील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या पावसानंतर जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्यास सुरुवात करतात. मेक्सिकन भुंग्यांचे वैशिष्ट्य आहे की,हे एखाद्या ठिकाणी स्थिर झाले की पुढच्या वर्षी पुन्हा पुन्हा भुंगे सोडण्याची गरज पडत नाही.
भुंगे किती प्रमाणात सोडावेत?
मेक्सिकन भुंगे प्रती हेक्टरी 500 भुंगे सोडावेत.जिथे मनुष्यांचाअडथळा किंवा शिरकाव होणार नाही अशा जागी भुंगे सोडण्याची योग्य असते.
नव्या जागी भुंगे सोडण्यासाठी कसे पाठवावे?
भरपूर भुंगे असलेल्या गवतावरील 500 ते 1000 भुंगे दहा ते पंधरा सेंटिमीटर उंच प्लास्टिकच्या बाटलीतटोपणास जाळी असलेले झाकण लावावे. बाटलीमध्ये गाजर गवताचा पाला खाद्य म्हणून टाकावा. मेक्सिकन भुंगे दिवसा कार्यरत असतात त्यामुळे जमा करणे योग्य नाही. सकाळी किंवा सायंकाळी भुंगे जमा करण्यास योग्य काळ आहे.
भुंग्याचा इतर पिकांना उपद्रव आहे का?
जैविक कीडनियंत्रण संचनालय बेंगलोर येथे घेण्यात आलेल्या चाचणी यानुसार इतर पिकांना आहे भुंगे सुरक्षित आहेत. भुंगे वअळ्या फक्त गाजर गवत खातात.गाजर गवतउपलब्ध नसेल तर हे भुंगे जमिनीत सुप्तावस्थेत जातात.
Published on: 26 September 2021, 03:29 IST