Agripedia

निंबोळी अर्क(5 टक्के) तयार करण्याची पद्धती उन्हाळ्यात गोळा करून साठवलेल्या पाच किलो निंबोळ्या फवारणीआधी 1 दिवस कुटून बारीक कराव्यात.

Updated on 14 May, 2022 2:07 PM IST

हा चुरा 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावा. तसेच 1 लिटर पाण्यात 200 ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाकावा.दुसऱ्या दिवशी सकाळी 9 लिटर पाण्यातील निंबोळीद्रावण पातळ कपड्यातून गाळून घ्यावे. त्यात 1 लिटर साबणाचे द्रावण मिसळावे. निंबोळीचा 5 टक्के अर्क तयार होतो.10 लिटर अर्कामध्ये 90 लिटर पाणी टाकून फवारणीसाठी वापरावा. चांगल्या परिणामकारक फवारणीसाठी 1 दिवस आधी तयार केलेला अर्कच वापरावा. कडुनिंबाच्या पानापासून तयार केलेला अर्क कडुनिंबाची 7 किलो स्वच्छ धुतलेली पाने पाट्यावर किंवा मिक्‍सरमध्ये बारीक करावीत.

हे मिश्रण 5 लिटर पाण्यामध्ये मिसळून रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी स्वच्छ कापडातून गाळून घ्यावे. हा संपूर्ण अर्क 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणीसाठी वापरावा.निंबोळी तेल उन्हात चांगल्या वाळवलेल्या निंबोळ्यांचे वरील साल काढून घ्यावे. पांढरा गर उखळीमध्ये ठेचून लगदा तयार करावा. त्यामध्ये थोडे पाणी टाकावे. हा लगद्याचा गोळा एका परातीत चांगला थापावा. त्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर तेल दिसेल. हा तेलाचा लगदा हाताने चांगला दाबून त्याचे तेल काढावे. गोळ्यातून थेंबाथेंबाने तेल पाझरते. गोळा पुन्हा - पुन्हा तिंबून हाताने दाबावा. गोळ्यातील तेल पूर्णपणे काढावे. उरलेला गोळा पाण्यात टाकून उकळल्यास तेल पाण्यावर तरंगते.

ते चमच्याने काढून घेता येते. अर्थात, घाणीमधून अधिक प्रमाणात तेल मिळते. 1 किलो बियांपासून साधारणतः 100 ते 150 मिली तेल मिळते. कडुनिंबाच्या तेलामध्ये ऍझाडिरेक्‍टीन 0.15 टक्के,सालान्निन 0.5 टक्के ऍसिटील निंबीन 0.15 टक्के इपॉक्‍झी ऍझाडिरेक्‍टीन हे घटक असतात.फवारणीसाठी तेल वापरताना साधारणतः 1 ते 2 टक्के तेल म्हणजेच 10 ते 20 मिली तेल प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे वापरावे.कडुनिंबाच्या बियांपासून तयार केलेली भुकटी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने कडुनिंबाच्या बियांच्या भुकटीचा तांदळातील सोंडे, धान्य पोखरणारे भुंगेरे व खापरा भुंगेरे या सारख्या

साठविलेल्या धान्यावरील किडींवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. गहू धान्याचे आकारमानाच्या 0.5 टक्के, 1 टक्के व 2 टक्के कडुनिंबाच्या बियांची भुकटी तयार करून धान्यात मिसळली असता धान्याचे किडींपासून 321 ते 329 दिवसापर्यंत संरक्षण झाल्याचे आढळले.- 1 टक्के भुकटीच्या द्रावणात बी 2 तास भिजत ठेवले असता हे बी पेरल्या नंतर सुत्रकृमीचा उपद्रव 50 टक्के कमी होतो.निंबोळी पेंड जमीन नांगरल्यानंतर हेक्‍टरी 1 ते 2 टन निंबोळी पेंड मिसळल्यास वांग्याच्या झाडाचे शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळी व सूत्रकृमीपासून वांगी पिकाचे संरक्षण होते.

English Summary: Methods of making pesticides at home
Published on: 14 May 2022, 02:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)