नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाजियाबाद या संस्थेद्वारे संशोधन शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जिवाणूंची कल्चर आहे. गाईच्या शेणातील जिवाणू पासून तयार केलेले हे कल्चर एका विशिष्ट माध्यमात जतन केलेलेअसते. हे जिवाणू प्लास्टिक बाटल्यांमध्ये तीन वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य अवस्थेत राहतात. यामध्ये पिकाच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी व विषाणू पासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमिनीच्या सुपीकतेसाठी, पिकांच्या वाढीसाठी व रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो.
या कल्चर पासून 200 लिटर द्रावण तयार करता येते व या द्रावणात पासून पुन्हा लाखो लिटर द्रावण तयार करता येते.हेएकच द्रावण पिकास पोषण व रोगप्रतिकारक म्हणून वापरता येते. द्रावण तयार करण्याची पद्धत अगदी सोपी व कमी खर्चिक आहे.ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधा याबाबत जनावरे पाळणे शक्य नाही व त्यामुळे नैसर्गिक शेती साठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे.
तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
- वेस्ट डी कंपोजर
- दोन किलो गूळ
- दोनशे लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण ( कोणत्याही धातूचा अजिबात नको )
- दोनशे लिटर पाणी
कसे बनवावे
ड्रम मध्ये दोनशे लिटर णीटाकावे. त्यात वेस्ट डिकंपोजर बाटलीतील कल्चर व दोन किलो गूळ टाकून लाकडी काठीने दोन ते पाच मिनिटे ढवळावे.यानंतर हे द्रावण स्वच्छ कापड अथवा बारदाना ने झाकावी. स्थानिक वातावरण व तापमानानुसार हे द्रावण तयार होण्यास पाच ते सात दिवसाचा अवधी जरुरी आहे. यादरम्यान दररोज दोनदा हे द्रावण लाकडी काठीने दोन ते पाच मिनिटे ढवळावे. द्रावण बनवताना ड्रम सावलीत किंवा उघड्यावर ठेवावे अशी कोणतीही अट नाही.पहिल्या दिवशी द्रावणाचा रंग त्यातील गुळामुळे काहीसा तांबूस दिसतो. तीन दिवसानंतर हा रंग दुधाळ दिसू लागतो पाचव्या किंवा सातव्या दिवशी द्रावणाचा रंग पूर्णपणे दुधाळ दिसू लागेल. याचा अर्थ कल्चर मधील जिवाणू व एंझ्यामे द्रावणात पूर्णपणे विकसित झालेले आहेत व द्रावण वापरण्यासाठी तयार आहे. हेच द्रावणवीरजन म्हणून वीस लिटर एका ड्रममध्ये टाकून त्यात 200 लिटर पाणी व दोन किलो गूळ टाकून वरील प्रमाणे पाच ते सात दिवसात तयार करा.अशाप्रकारे लाखो लिटर द्रावण तयार करता येते.
हे द्रावण कसे वापरावे?
तयार झालेले दोनशे लिटर द्रावण एक एकरास ठिबक द्वारे अथवा पाटपाण्याने द्यावे. यामुळे जमिनीत सूक्ष्म जिवाणू व गांडूळाचे वाढवून जमीन सुपीक व भुसभुशीत बनते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे अतिशीघ्र विघटन होऊन त्यांचे अन्नद्रव्य रूपांतर होते.हे अन्नद्रव्य पिकाच्या मुळांना सहजी ग्रहण करता येतात. परिणामी पिकांची वाढ जोमाने होते.
फवारणीसाठी वापर
पिकांवर फवारणी साठी एक लिटर पाण्यात 300 मिली या प्रमाणात वेस्ट डी कंपोजर द्रावण मिसळून दर आठ ते पंधरा दिवसांनी फवारल्यास हानिकारकबुरशी व कीड यांचा उपद्रव होत नाही.या प्रमाणानुसार फवारणीच्या 15 लिटर क्षमतेच्या पंपाचे चार ते साडेचार लिटर द्रावण मिसळावे.आपल्या परिसरात होणाऱ्या प्रादुर्भावाचा तीव्रतेनुसार फवारणी चा काळ ठरवावा.
शेणखत कूजवण्यासाठी कंपोस्ट बनवण्यासाठी
अंदाजे एकटं शेणखताच्या ढिगावर केवळ वीस लिटर वेस्ट डी कंपोजर द्रावण शिंपडावे. एक आठवड्यानंतर हा ढीग पलटावा व त्यावर पुन्हा वीस लिटर द्रावण शिंपडावे असे दर आठवड्याला करत 40 दिवसात उत्तम प्रतीचे कुजलेले शेणखत तयार होते. ज्यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या अधिक आहे.शेना ऐवजी आपल्याकडील जमा केलेला काडी-कचरा किंवा धान्य मळणी नंतर निघालेला कोणत्याही पिकाचा भुसा यावर अशीच प्रक्रिया करून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार करता येते( संदर्भ- कृषीवर्ल्ड)
Published on: 20 October 2021, 06:56 IST