Agripedia

भारतात खरबूज एक महत्वाचे फळपीक आहे याची लागवड हि मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ्यात हे फळ सर्वात जास्त खाल्ले जाते त्यामुळे याला उन्हाळ्यात मागणी हि जास्त असते शिवाय हे फळ आरोग्यासाठी देखील खुपच फायदेशीर असते त्यामुळे याची लागवड हि शेतकऱ्यांसाठी फायदेमंद सिद्ध होत आहे. हे फळ खाण्यास खुपच स्वादिष्ट असते याच्या लागवडीचा हंगाम हा जवळच येऊन थोपला आहे म्हणुन कृषी जागरण आपणांस आज खरबूज लागवडीविषयी माहिती सांगणार आहे. हे एक वेलीवर्गीय फळपीक आहे याची लागवड हि सामान्यता डिसेंबर पासुन मार्चपर्यंत केली जाते.

Updated on 05 November, 2021 8:43 AM IST

भारतात खरबूज एक महत्वाचे फळपीक आहे याची लागवड हि मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ्यात हे फळ सर्वात जास्त खाल्ले जाते त्यामुळे याला उन्हाळ्यात मागणी हि जास्त असते शिवाय हे फळ आरोग्यासाठी देखील खुपच फायदेशीर असते त्यामुळे याची लागवड हि शेतकऱ्यांसाठी फायदेमंद सिद्ध होत आहे. हे फळ खाण्यास खुपच स्वादिष्ट असते याच्या लागवडीचा हंगाम हा जवळच येऊन थोपला आहे म्हणुन कृषी जागरण आपणांस आज खरबूज लागवडीविषयी माहिती सांगणार आहे. हे एक वेलीवर्गीय फळपीक आहे याची लागवड हि सामान्यता डिसेंबर पासुन मार्चपर्यंत केली जाते.

पंजाब, यूपी, बिहार, महाराष्ट्र इत्यादी राज्यात याची लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रात याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि शेतकरी बांधव ह्या पिकातून चांगली कमाई देखील करत आहेत. एकट्या महाराष्ट्रात खरबूज पिकाचे 240 हेक्टर क्षेत्र हे लागवडीखालील आहे यावरून आपल्याला खरबूज शेतीचे महाराष्ट्रातील महत्व समजून येते. महाराष्ट्रात पूर्वे पासुन पश्चिम पर्यंत तर उत्तर पासून दक्षिण पर्यंत खरबूजची लागवड हि केली जाते. उन्हाळ्याच्या हंगामात नदी खोऱ्याच्या प्रदेशात तसेच इतर फळबाग पिकांमध्ये एक प्रमुख आंतरपीक म्हणुन ह्या खरबूज पिकांची लागवड हि केली जाते. खरबूज फळात चुना, फॉस्फरस सारखी खनिजे आणि काही जीवनसत्त्वे जसे की, अ, ब, क हे भरपुर प्रमाणात आढळत असल्याने ह्याचे सेवन हे मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे बाजारात खरबूज फळाला मोठी मागणी असते, म्हणुन आज आपण ह्या फळाची शास्त्रीय पद्धतीने कशी लागवड करायची हे जाणुन घेणार आहोत.

 खरबूज

खरबूज पिकासाठी आवश्यक जमीम आणि हवामान

खरबूज हे एक वेलीवर्गीय पिक आहे, याच्या लागवडीसाठी चिकणमाती व मध्यम काळ्या मातीच्या जमिनीची निवड करावी, तसेच जमीन हि पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी यामुळे खरबूज पिकापासून चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. खरबूज पिकांसाठी जमिनीच्या मातीची पातळी 5.5 ते 7 दरम्यान असावी असा खरबूज उत्पादक शेतकरी सल्ला देतात. खरबूज पिकासाठी उष्ण आणि कोरडे हवामान चांगले मानवते त्यामुळे ह्याची लागवड अशाच हवामाणात करावी जिथे उष्णता असते आणि सोबतच कोरडे हवामान असते व भरपूर सूर्यप्रकाश पडतो. 24 °C ते 27 °C तापमान खरबूज पिकाच्या वेलींच्या वाढीसाठी योग्य असल्याचे सांगितले जाते. तापमान 18 °C पेक्षा कमी झाल्यास व तापमान 32 °C च्या वर गेल्यास वेलीच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो, वेल वाढत नाही शिवाय फळांचा विकास होत नाही.

 

 खरबूज पिकासाठी खत व्यवस्थापन आणि खरबूजच्या काही सुधारित जाती

खरबूज पिकाच्या लागवडीसाठी 40 कि.ग्रॅ. नायट्रोजन, 30 किलो. फॉस्फरस आणि 25 किग्रॅ. पोटॅश प्रति एकरी लावण्याची शिफारस केली जाते. खरबूज लावण्याच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा आणि पूर्ण प्रमाणात स्फुरद व पालाश लावण्याचा सल्ला दिला जातो.  उरलेल्या नत्राचे दोन समान भाग करून पेरणीनंतर 20 आणि 45 दिवसांनी उभ्या पिकातील मुळांजवळ द्यावे. काशी मधु, हर मधु, पंजाब सुनहरी आणि पंजाब शंकर इत्यादी खरबूजच्या सुधारित जाती आहेत. शेतकरी बांधव ह्या जातींची लागवड करून चांगली कमाई करू शकता.

English Summary: melon cultivation process and earn more money through melon cultivation
Published on: 05 November 2021, 08:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)