भारतात अलीकडे शेती क्षेत्राकडे एक नव्या आशेने बघितले जात आहे. अनेक नवयुवक आता शेती क्षेत्रात सक्रिय भूमिका घेऊ लागले आहेत. यामुळे भारत जलद गतीने शेती क्षेत्रात एक नवीन आयाम कायम करेल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे. असे असले तरी, शेती क्षेत्रात काळाच्या ओघात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे.
अनेक शेतकरी बांधव शेतीत आता बदल स्वीकारण्यास तयार आहेत त्या अनुषंगाने शेतकरी बांधव पीकपद्धतीत बदल करीत आहेत. पारंपरिक पिकांना फाटा देऊन शेतकरी बांधव आता औषधी वनस्पती लागवड करू इच्छित आहेत. नव्हे नव्हे तर अनेक शेतकरी बांधवांनी औषधी वनस्पतींची लागवड यशस्वी देखील करून दाखवली आहे. हीच गोष्ट केंद्रस्थानी ठेवून आज आपण स्टीव्हीया या औषधी वनस्पतीच्या लागवडीविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
शेतकरी मित्रांनो तर आपणास औषधी वनस्पतींची लागवड करायची असेल तर यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. या योजनेचा लाभ घेऊन आपण अनुदान देखील प्राप्त करू शकता. यासाठी आपण आपल्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकता.
स्टिव्हिया शेतीविषयी काही महत्वपूर्ण बाबी
»स्टीव्हियाच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याच्या लागवडीसाठी आपणास उत्पादन खर्च अतिशय कमी लागतो. या पिकासाठी जास्त खत आणि कीटकनाशके वापरण्याची आवश्यकता नसते त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होते. याव्यतिरिक्त या औषधी वनस्पतींवर कीटकांचा विपरीत परिणाम होत नाही, त्यामुळे या पिकाच्या उत्पादनात घट होत नाही.
»एकदा लागवड केल्यावर, तुम्ही या पिकातून सुमारे 5 वर्षे उत्पादन घेऊ शकता, अर्थात एकदा लागवड केल्यास सुमारे पाच वर्षे आपणास या पासून पैसे मिळत राहणार आहेत.
»शेतकरी मित्रांनो जर आपणास स्टीव्हीया या औषधी वनस्पतीची लागवड करायचे असेल तर आम्ही आपणास यासाठी प्रशिक्षण घेण्याची शिफारस करू इच्छितो. यासाठी आपण लखनऊ मध्ये स्थित असलेल्या सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ़ मेडिसिनल एंड ऐरोमैटिक प्लांट्स (सीमैप ) संस्थेतून प्रशिक्षण घेऊन या पिकाची लागवड करून चांगला मोठा नफा कमवू शकता.
किती कमाई होईल
जर तुम्ही या औषधी वनस्पतीची लागवड केली तर आपण 3 महिन्यांत 3 लाख रुपयांची कमाई करू शकता. या औषधी वनस्पतींचा आयुर्वेदिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, त्यामुळे या औषधी वनस्पती ला बारामाही मागणी असते त्यामुळे या पिकातून चांगली कमाई होण्याची शक्यता असते.
संबंधित बातम्या:-
मोठी बातमी: मक्याला हमीभावपेक्षा अधिक दर! काय आहे नेमके कारण?
चेरी टोमॅटोची लागवड करा आणि मिळवा दर्जेदार उत्पादन; वाचा याविषयी
Published on: 17 April 2022, 10:19 IST