जमिनीत विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हमखास वाढून जमिनीचे आरोग्य चांगले राखता येते. त्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता स्तर वाढविता येतो. या सेंद्रिय कर्बाचे जमिनीतील प्रमाण वाढविणाऱ्या ठराविक बाबी खालील प्रमाणे:
सेंद्रिय निविष्ठांचा नियमित व जास्तीत जास्त वापर करणे.बियाण्यांना जिवाणू प्रक्रिया (बीजप्रक्रिया) करूनच पेरणी करणे.उताराला आडवी पेरणी केल्याने पाण्याचा अभाव कमी करण्यास मदत.संवर्धित शेतीचा स्थूलसापेक्षा उपयोग करणे.
मिश्र पीक पद्धतीची फेरपालट करणे.
पिकांचे अवशेषांचे मूळस्थान योग्य व्यवस्थापन करणे.
माती झाकणाऱ्या पिकांची आंतरपीक म्हणून धैंचा किंवा बिरूची लागवड करावी.शेतातील बांधबंदिस्ती, जल, व मृद व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे.शेताच्या बांधावर गिरीपुष्प, शेवरी उंबर, करंज, साधी बाभूळ इत्यादी समान झाडांची लागवड करणे.पीक उत्पादकता वाढविण्यासाठी उपाय – Measures to increase crop productivityपीक उत्पादनात जमिनीचे आरोग्य चांगले असणे आवश्यक असून त्यातून जमिनीची पीक उत्पादकता क्षमता स्पष्ट होते. यासाठी जमिनीत पीक उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक बाबींची माहिती खालील प्रमाणे : जमिनीतील पाणी, हवा व वनस्पती यांचा संबंध राखण्यासाठी योग्य मशागत करावी.जमिनीला पिकाच्या आवश्यकतेनुसार सेंद्रिय समतोल पुरवठा करावा.जमिनीचा पोत, प्रत आणि सुपीकता यांचा विचार करून जमिनीचा कस टिकवावा.
पिकांची योग्य फेरपालट करावी.जमिनीची धूप थांबवावी पिकांवर आढळणारे किडी – रोगांचे नियंत्रण करावे.जमिनीतील अपायकारक क्षार निचऱ्याचा अवलंब करून आणि भूसुधारकांचा वापर करून टाकावेत. त्यासाठी जमिनीतील उघडे अथवा बंदिस्त चर खोदून निचऱ्याची व्यवस्था करावी.जमीन जास्त विम्लयुक्त बनल्यास जिप्समचा वापर करावा आणि जास्त आम्लयुक्त चुन्याचा वापर करावा.
सेंद्रिय पदार्थ आणि जमिनीचे आरोग्य – Organic Substance and soil health या लेखाच्या माध्यमातून जमिनीतील सेंद्रिय पदार्थ व त्यांचा जमिनीवर होणारा परिणाम, मातीचे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म, सेंद्रिय कर्बाचे जमिनीतील प्रमाण वाढविणारे घटक
पीक उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी आदी घटकातीलसखोल माहितीचा उपयोग सेंद्रिय पदार्थ आणि जमिनीचे आरोग्य, पीक उत्पादन क्षमता, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण व उपयुक्त ठरणार आहे.
सदर लेखाच्या आधारे सेंद्रिय पदार्थ व जमिनीचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी उपयोग होणार असून त्यातून जमिनीची सुपीकता व उत्पादकता स्तर वाढविणे शक्य होणार नाही. याबाबत सविस्तर माहिती वाचकांना देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.
Published on: 13 January 2022, 02:55 IST