Agripedia

महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठामध्ये उपलब्ध असणा-या विविध विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३

Updated on 03 March, 2022 10:30 PM IST

महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठामध्ये उपलब्ध असणा-या विविध विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा-२०२२ महाराष्ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळ, पुणे यांचे मार्फत दि.११.०६.२०२२ ते दि.१३.०६.२०२२ या कालावधीत महाराष्ट्रातील १७ केंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. सदर परीक्षेसाठी संबंधीत विद्याशाखेचे पदवीधर आणि सन् २०२१-२०२२ या शैक्षणिक 

वर्षांच्या अंतिम वर्षातील पदवी परीक्षेस बसणारे विद्यार्थी पात्र राहतील. सदर परीक्षेसाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे http://www.mcaer.org या संकेतस्थळावर स्वतः मरावयाचे आहे. अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. ऑनलाईन (Online) अर्ज भरण्याचा कालावधी दि.०४.०३.२०२२ ते दि. २८.०३.२०२२ असा राहील. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन बँकींग (नेट बँकींग) डेबिट/क्रेडीट कार्डव्दारे 

दि.०४.०३.२०२२ (दुपारी १२.००) पासून दि.३१.०३.२०२२ (दुपारी १२.००) तारखेपर्यंत स्वीकारले जाईल. ह्या परीक्षेसंबंधित अर्ज महाराष्ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळ, पुणे यांच्याकडे पाठविण्याची आवश्यकता नाही. अंतिम पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तद्नंतर संकेतस्थळावर उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांनी आपले परीक्षा प्रवेशपत्र वरील संकेतस्थळावरून दि. ०३.०६.२०२२ पासून स्वतः प्रिंट काढून उपलब्ध करुन घ्यावयाचे आहेत.

उत्तराची नमुना पत्रिका दि. २०.०६.२०२२ व परीक्षेचा निकाल दि. २७.०६.२०२२ रोजी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे http://www.mcaer.org या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध राहील. या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२०-२५५२८११९/०२०-२५५२८५१९ या दुध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे डॉ. अमोल मा. देठे, नियंत्रक, महाराष्ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: MCAER Post Graduate Exam Schedule Announced
Published on: 03 March 2022, 10:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)