1. कृषीपीडिया

शेतकऱ्याला आर्थिक झटका देणारा डाळिंब बागेवरचा रोग; योग्य निगाच वाचवेल फळबाग

KJ Maharashtra
KJ Maharashtra


मागील पाच ते आठ वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी हा फळशेतीकडे वळला आहे. ज्या भागात जमीन मुबलक आहे, परंतु पाण्याची कमतरता अशा भागात शेतकऱ्यांनी फळपिकांची शेती करण्यावर भर दिला आहे. या भागातील शेतकरी हे प्रामुख्याने द्राक्ष आणि डाळिंब या फळांची शेती करत असलेले दिसत आहेत. खासकरून डाळिंब या पिकाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. कोणत्याही फळबागेची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. ज्यावेळी फळांची वाढ व्हायला सुरुवात होते. यावेळी फळांवर विविध कीटकांचा हल्ला होतो आणि जर योग्य नियोजन झाले नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे जाणवले आहे. डाळिंब या फळाची वाढ होत असते यावेळी त्यावर मवा हा रोग पडण्याची दाट शक्यता असते. डांळिब बागावर मवा हा रोग थैमान घालत असतो. फाळांचा शेंडा, फळांची वाढ, फळ लागण्याआधी या रोगाचा हल्ला झाला तर झाडाला फळ लागत नाही. पानांवर बुरशी येत असते.

मवा या रोगाचे कीटक हे पांढरा आणि हिरव्या रंगाचे असतात. हे कीटक प्रामुख्याने झाडाच्या शेंड्यावर आणि पानांवर हल्ला करतात. ते कोवळ्या फुटणाऱ्या शेंड्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे काही दिवसांनी हे शेंडे वळून जातात. किड्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे झाडाची वाढ खुंटत असते. हे किडे झाडाच्या फुलावर किंवा कळीवर हल्ला करत असतात. त्यामुळे झाडाला फळ लागत नाही. तसेच फळ जारी लागले तरी ते एका बाजूने चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.  याबरोबरच हे किडे झाडाच्या पानांवर पिवळ्या रंगाचा चिकट पदार्थ सोडतात. त्यामुळे पानांवर बुरशी वाढते. मवा हा रोग इतरही रोगांना आमंत्रण देत असतो.

कोणते औषध ठरते मवाचा कर्दनकाळ
मवा हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी टाटा अनंता या नावाचे कीटकनाशक प्रभावी ठरते. हे १०० ग्राम औषध २०० लिटर पाण्यात फवारणी करताना त्यात एम-४५ हे १ ग्राम टाकल्यास बुरशीचा नाश होण्यासाठी मदत होते. हे कीटकनाशक फवारणी करतेवेळी तापमान हे २५ अंश सेल्सिअस पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्ही हे औषध सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करु शकता. ही फवारणी केल्यानंतर २-३ तासांमध्ये मवा या किड्यांचा यांचा नाश होतो. अशा पद्धतीने काळजी घेतल्यास हा रोग नियंत्रणात येऊ शकतो.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters