Agripedia

भाजीपाला पिकांच्या उत्पादनात भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजीपाला पिकांमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने कर्बोदके इत्यादी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे मानवी आहारामध्ये भाजीपाला पिकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भाजीपाला पिकांचे प्रतिहेक्टतर मिळणारी जास्त उत्पादन, काढण्यासाठी लागणारा कमी कालावधी, दिवसेंदिवस देशांतर्गत व परदेशात वाढणारी मागणी इत्यादी कारणामुळे भाजीपाला पिके शेतकऱ्यांसाठी इतर पिकांच्या तुलनेत आर्थिक दृष्ट्या फायदेशीर करत आहेत

Updated on 17 October, 2021 8:44 PM IST

भाजीपाला पिकांच्या उत्पादनात भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजीपाला पिकांमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने कर्बोदके इत्यादी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे मानवी आहारामध्ये भाजीपाला पिकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भाजीपाला पिकांचे प्रतिहेक्‍टर मिळणारी जास्त उत्पादन, काढण्यासाठी लागणारा कमी कालावधी, दिवसेंदिवस देशांतर्गत व परदेशात वाढणारी मागणी इत्यादी कारणामुळे भाजीपाला पिके शेतकऱ्यांसाठी इतर पिकांच्या तुलनेत आर्थिक दृष्ट्या फायदेशीर करत आहेत

भाजीपाला पिकांच्या दर्जेदार उत्पादनासाठी योग्य जमिनीची निवड, योग्य जातींची निवड तसेच दर्जेदार बियाणे,निरोगी रोपे, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन आणि अंतर मशागत इत्यादी बाबींना जसे महत्त्व आहे तसेच भाजीपाला पिकांची योग्य परिपक्व तेला काढणीकरण्यासाठी पिकांच्या परिपक्वतेचे मापदंड माहीत असणे अत्यंत आवश्यक. या लेखात आपण भाजीपाला पिकांच्या परिपक्वतेचे मापदंड पाहणार आहोत.

 भाजीपाला पिकांच्या योग्य परिपक्वतेला काढणीचे महत्त्व

  • बाजारामध्ये जास्त मागणी चांगले दर मिळतात.
  • पिकांची वाढ चांगली होते.
  • नवीन फुलांची व फळांची संख्या वाढून उत्पादनात वाढ होते.
  • पिकांची गुणवत्ता वाढून दर्जेदार उत्पादन मिळते. कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • भाजीपाला पिकांची चव चांगले लागते व टिकवणक्षमता वाढते.

भाजीपाला पिकांची परीपक्वतेनुसार काढणी

भाजीपाला पिकांच्या काढण्यासाठी गृहीत धरलेली परिपक्वता ती कोणत्या हेतूसाठी भाज्यांची काढणी केली आहे यावर अवलंबून असते.  म्हणजे पिकाची काढणी स्थानिक बाजारपेठेसाठी, दूरच्या बाजारपेठेसाठी किंवा प्रक्रिया उद्योगासाठी वेगवेगळ्या परिपक्वतेलाकरावी लागते

  • टोमॅटो-रोपांच्या लागवडी पासून जातीनिहाय,हंगाम,जमीन इत्यादी गोष्टी विचारात घेता साधारणतः 10 ते 12 आठवड्यांनी फळे काढणीसाठी तयार होतात. दूरच्या बाजारपेठेसाठी पिकण्यास सुरुवात झालेल्या फळांची काढणी करावी व स्थानिक बाजारपेठेसाठी पूर्ण पिकलेली फळे व प्रक्रियेसाठी झाडावर पूर्ण पिकलेली किंचित मऊपडलेली फळे काढावीत.
  • वांगी-रोपांच्या लागवडीपासून जातीनिहाय, हंगाम, जमीन इत्यादी गोष्टी विचारात घेता साधारणतः  10 ते 12 आठवड्यांनी फळे काढणीसाठी तयार होतात.  पूर्ण वाढलेली परंतु कोवळीआकर्षकव चमकदार फळे काढावीत. फळांचा रंग आकर्षक नसल्यास ती फळे जास्त पक्व झाली आहे असं समजा.अशा फळांना बाजारात मागणी नसते.
  • मिरची-लागवडीपासून 40 ते 50 दिवसांनी हिरव्या फळांची तोडणी करण्यास सुरुवात होती. मिरच्या वाळवून साठवायचे असतील तर 70 ते 80 दिवसांनी रंगलाल झाल्यानंतर फळे तोडायला सुरुवातकरावी.
  • ढोबळी मिरची- लागवडीपासून 45 ते 50 दिवसांनी फळे तोडणीस तयार होतात फळे योग्य आकाराची,रंग आकर्षक असताना काढावी.रंगीत ढोबळी मिरची मध्ये फळांचा रंग जातीप्रमाणे पिवळा,लाल होण्यास सुरूवात झाल्यानंतर काढणी करावी.
  • कांदा व लसूण- हंगाम व जातीनुसार 100 ते 120 दिवसात कांदा व लसुन काढणीस तयार होतो. पाने करपण्यास सुरुवात झाली किंवा 50 ते 60 टक्के माना पडल्या नंतर काढणे सुरुवात करावी.
  • भेंडी-लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांत फळे काढणीस तयार होतात.निर्यातीसाठी आकर्षक हिरव्या रंगाची, कोवळी, लुसलुशीत, सात ते नऊ सेंटीमीटर लांबीची फळे एक दिवस आड काढावीत.
English Summary: maturity criteria for vagetable harvesting
Published on: 17 October 2021, 08:44 IST