भारतात गेल्या अनेक वर्षांपासून फुल शेती मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना पारंपारिक पिकात मोठा तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी बांधव सध्या जे विकेल तेच पिकेल या धोरणाचा अवलंब करीत फुलशेतीकडे आकृष्ट होत आहेत. याव्यतिरिक्त अनेक असे नगदी पिके आहेत ज्यामध्ये लागवडीसाठी उत्पादन खर्च अधिक येतो त्यामुळे शेतकरी बांधव फुलशेतीकडे वळला असल्याचे चित्र देशात बघायला मिळत आहे.
आज आपण फुल शेती विषयी जाणून घेणार आहोत, फुल शेती पैकी सर्वात जास्त झेंडूची लागवड आपल्या देशात बघायला मिळते राज्यात देखील झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात आपल्या नजरेस पडत असेल. झेंडूची शेती शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर देखील आहे त्यामुळे आज आपण झेंडू लागवडीविषयी जाणून घेऊया. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी काही महत्त्वाच्या बाबी.
हवामानानुसार झेंडूची लागवड करावी लागते. प्रामुख्याने याची लागवड जानेवारी, एप्रिल-मे किंवा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये केली जाते. या कालावधीत झेंडूची लागवड केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. झेंडूच्या शेतीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर फुलशेतीच्या तुलनेत खर्च खूपच कमी आणि नफा अधिक मिळतो म्हणून कृषी तज्ञ झेंडूची शेती करण्याचा सल्ला देत असतात.
झेंडूच्या फूलांना बाजारात मोठी मागणी असते. म्हणून बाजारात झेंडूची फुले सहज विकली जातात. झेंडूचे हार बनवून बाजारात चढ्या किंमतीने विकली जातात. झेंडुचा उपयोग रंग तयार करण्यासाठी देखील केला जातो. यासोबतच याच्या पानांचा वापर अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठीही केला जातो.
शेतकरी मित्रांनो जर आपणास झेंडूची लागवड करायची असेल तर प्रारंभी 25 ते 30 हजार रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. मात्र एवढी गुंतवणूक करून आपण झेंडूच्या शेतीतून 2 लाखांपर्यंतचा नफा सहज मिळवू शकतात. शेतकरी बांधव झेंडूची लागवड जसजशी वाढवत जातील तेवढा त्यांचा नफा वाढेल.
झेंडूची लागवड हवामानाचा अंदाज घेऊन पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तीनही ऋतूंमध्ये केली जाऊ शकते. झेंडूच्या शेतीसाठी मेहनत देखील एवढी घ्यावी लागत नाही. मात्र, शेतकरी बांधवांना पावसापासून आणि प्राण्यांपासून झेंडूच्या झाडांचे संरक्षण करावे लागणार आहे. जर आपण याकडे लक्ष दिले नाही तर आपली सर्व मेहनत वाया जाऊ शकते.
पावसाळ्यात झेंडूच्या झाडाला 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 1-2 वेळा पाणी द्यावे लागते, त्याचबरोबर हिवाळ्याच्या हंगामात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळी हंगामात 5 ते 7 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. शेतकरी बांधवांनो, फुलोर येईपर्यंत पिकासाठी पाण्याची कमतरता भासू नये याची विशेष काळजी घ्या, नाही तर उत्पादनात मोठी घट होऊ शकते.
संबंधित बातम्या:-
जिओ बदलणार भारतीय शेतीचे चित्र! ड्रोन ऑपरेशन प्लॅटफॉर्म स्कायडेक लाँच; वाचा याचे फायदे
लई भारी! एकाच वेळी गाईने दिला दोन वासरांना जन्म; शेतकऱ्याने पेढे वाटून केला आनंद साजरा
Published on: 24 March 2022, 03:29 IST