कधी कशाला जास्त मार्केट येईल कोणीही सांगू शकत नाही. सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात आंबे खाण्यासाठी आंबेप्रेमी पैसे देखील खर्च करण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. आता एका अशाच आंब्याची किंमत तुम्ही ऐकाल तर तुमचे डोळे फिरतील. या आंब्याचे नाव 'तायो नो तुमांगो' असे आहे. या आंब्याची जपानमध्ये लागवड केली जाते.
असे असताना आता या आंब्याची मध्य प्रदेशातील जबलपूर येथे देखील लागवड केली जात आहे. याची किंमत 2 लाख 70 हजार रुपये प्रतिकिलो आहे. जबलपूरचे रहिवासी संकल्प परिहार या लाखमोलाच्या आंब्यांचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी या आंब्याच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली आहे. यामुळे सध्या त्यांची चर्चा सुरु आहे.
त्यांनी आंब्यांच्या संरक्षणासाठी बागेत 3 रक्षक आणि 9 कुत्रे ठेवले आहेत. काही दिवसांपूर्वी या बागेत चोरी झाली होती. यामुळे याठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. या आंब्याला 'एग ऑफ सन' म्हणजेच सूर्याचं अंड असं देखील नाव आहे. या आंब्याचा रंग फिकट पिवळा आणि लाल होतो. आंब्याचं वजन 900 ग्रँमच्या आसपास जातं. चवीला हा आंबा अतिशय गोड असतो. जपानमध्ये या आंब्याचं उत्पादन पॉलिहाऊस मध्ये घेतले जाते.
संकल्प परिहार यांनी याची 52 झाडं त्यांनी लावली आहेत. दरवर्षी ते 14 विविध प्रकारच्या आंब्याचे आंब्याचे उत्पादन घेत असतात. त्यांनी त्यांच्या बागेच्या सुरक्षिततेसाठी आता जी काळजी घेतली आहे आणि जो खर्च केला आहे, याची सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर या आंब्याचे फोटो व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता शेतकऱ्यांचे टेन्शन मिटले, आता जाणार नाही शेतातील वीज, सरकारचा मोठा निर्णय..
शेतकऱ्यांनो खिशातले पैसे नका खर्च करू, आता शेतीसाठी उपकरणे खरेदी करायला सरकार देतंय अनुदान
आता मोदी सरकारच्या 'या' योजनेत शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार २०० रुपये, जाणून घ्या..
Published on: 31 March 2022, 03:05 IST