Agripedia

गुलाबी बोंडअळीचे शास्त्रीय नाव पेक्टीनोफोरा गॉसीपीएल्ला (सान्डर्स) ती गण लेपिडोप्टेरा आणि कुळ जेलेचिडी मध्ये वर्गीकृत आहे. हया किडीचे मुळ उगमस्थान भारत, पाकीस्तान आहे. मादी पतंग 100 ते 200 अंडी एकल किंवा पुंजक्यांनी घालते. मादी अंडी पात्या, फुलावर, नविन बोंडावर, देठावर आणि कोवळया पानांच्या खालच्या बाजुस घालते. अंडीचा आकार 0.5 मि मि लांब व 0.25 मिमि रुंद असतो. अंडी लांबट व चपटी असुन रंगाने मोत्यासारखी चक चकीत असतात.

Updated on 18 September, 2021 6:21 PM IST

. पंधरा दिवसाचे बोंड अंडी घालण्यासाठी पसंतीचे ठिकाण असते. अंडी उबवण्याचा काळ हा 3 ते 6 दिवसाचा असतो. पहिल्या दोन अंतरीक अळी अवस्था पांढूरक्या असतात आणि तिसऱ्या आंतरीक अवस्थेपासून गुलाबी रंगाच्या होतात.

 

उष्ण भागात अळी अवस्था ही 9 ते 14 दिवसांची असते. पुर्ण वाढलेल्या अळीची लांबी 10 ते 13 मिमि असून डोके गडद रंगाचे असते. कोष साधारण 10 मि‍मि लांब बदामी रंगाचा असून अवस्था 8 ते 13 दिवसात पुर्ण केल्या जाते. जिवनक्रम 3 ते 6 आठवडयात पुर्ण होतो. पतंग 8 ते 10 मिमि तपकिरी करडया रंगाचा असून पंखावर काळे ठिपके असतात. पतंग कोषातून सकाळी किंवा संध्याकाळीच बाहेर निशाचर असतात आणि दिवसाला मातीत किंवा जमिनीच्या भेगात लपून बसतात. खाध्य वनस्पती अभावी गुलाबी बोंडअळी 6 ते 8 महिनेपर्यत निद्रावस्थेत राहते.

 

   उघडलेल्या बोंडावरती डाग हे गुलांबी बोंडअळीचे प्रमुख लक्षण आहे. ही लक्षणे सुरुवातीला येणाऱ्या फुलोऱ्यावस्थेत आणि पिकांच्या वाढीच्या शेवटच्या अवस्थेत नुकसान झाल्यावर दिसून येते. कामगंध सापळयामध्ये नर पतंग अडकल्यास कामगंध सापळयाद्वारे मादी पतंगासारखा गंध सोडल्यामुळे नर पतंग आकर्षित होतात. डोम कळी फुले पुर्णपणे उमलत नाहीत ते मुरडले जातात. हिरव्या बोंडावर दिसणारे डाग हिरव्या बोंडावर दिसणारे. डाग हे गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव लक्षण आहे. हिरव्या बोंडावर दिसणारे निकास छिद्र अंदाजे 1.5 ते 2 मिमि व्यासाची लहान छिद्र बोंडावर असल्यास गुलाबी बोंडअळी उपस्थित असल्याचे कळते.

गुलाबी बोंडअळी येण्याचे कारणे

जास्त कालावधीच्या संकरीत वानाची लागवड केल्याने गुलाबी बोंडअळीला यजमान वनस्पतीचा अखंडीत खाद्य पुरवठा. असंख्य संकरीत वाण ज्यांचा फुलोरा आणि फळधारणेचा कालावधी वेगवेगळा असतो. जो गुलाबी बोंडअळीच्या एकापाठोपाठ येणाऱ्या पिढीला अखंडीत पुरवठा करतो. जिनिंग मिल आणि मार्केट यार्डमध्ये कच्चा कापसाची जास्त कालावधीसाठी साठवणूक केल्यामुळे येणाऱ्या कापसाच्या पिकांसाठी गुलाबी बोंडअळीचे स्त्रोतस्थान म्हणून काम करते. पुर्वहंगामी (एप्रिल-मे) लागवड केलेल्या कापसाचा फुलोरा जुन- जुलै मध्ये येणाऱ्या कमी तिव्रतेच्या गुलाबीबोंड अळीसाठी लाभदायक ठरतो. गुलाबी बोंडअळीचे क्राय 1 एसी 2 एबी या दोन्ही जनुकाप्रती प्रतिकार निर्माण होतो. त्यामुळे त्या बोलगार्ड 2 वरती सहजपणे जगू शकतात. संकरीत वानाची बोंडातील बियामध्ये वेगवेगळे असलेल्या विषाच्या प्रमाणामुळे लवकर प्रतिकार निर्माण होतो. ही परिस्थिती निवडक प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी अतिशय आदर्श ठरते. सुरुवातीला पेरलेले पिक आणि अगोदरचे पीक यांच्या सलग उपलब्धतेमुळे गुलाबी बोंडअळीला वर्षभर निरंतर खाद्य पुरवठा होतो.

त्यामुळे त्यांच्या अनेक पिढया एक वर्षात तयार होतो. ज्यामुळे गहन निवडक दबाव तयार होऊन प्रतीकार तयार होण्यास मदत होते. गैर बीटी कपाशीची (रेफुजी) आश्रय पिक म्हणून वापर न करणे. वेळेवर आणि योग्य व्यवस्थापनाचा अभाव.

 अशा करा उपायोजना : कापुस पिकाचा हंगाम डिसेंबर ते जानेवारी दरम्यान संपुष्टात आणणे. अर्धवट उमलेली प्रादुर्भावग्रस्त बोंडे व पिकांच अवशेष त्वरीत नष्ट करावेत. गुलाबी बोंडअळीने प्रादृर्भावग्रस्त कापसाची गोदामाध्ये साठवण करु नये. बीटी कापुस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जुन महिन्यात पेणी करावी. बीटी बियाण्यासोबत गैर बीटीचे बियाणे दिले असल्यास त्याची आश्रय पीक म्हणून लागवड करावी. पतंगाच्या हालचालीवर लक्ष्य ठेवण्यासाठी पेरणीच्या 45 दिवसानंतर हेक्टरी 5 याप्रमाणे कामगंध सापळे लावावेत. कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीच्य प्रादुर्भावाचे निदान करण्यासाठी पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत वेळोवळी निरीक्षण करावी. ज्या ठीकाणी उपलब्धता असेल तिथे ट्रायकोग्रामा बॅक्ट्रीया अंडयावर उपजिविका करणारा परोपजीवी मित्र किटक 60000 एकर या प्रमाण एका आठवडयाच्या अंतराने कपाशीच्या फुलोरा अवस्थेत तिनदा प्रसारण केलयास चांगले नियंत्रण मिळते. लागवडीच्या 60 दिवसानंतर निंबोळी अर्क 5 टक्के निम तेल 5 मिली प्रती लिटरची एक फवारणी करावी.

मान्यता असलेल्या व शिफारस केलेल्या किटनाशकाची फवारणी (लेबल क्लेम) प्रमाणे करावी. जहाल विषारी व उच्च विषारी किटनाशकाची फवारणी टाळावी. किटनाशकाचा मिश्राणचा कोटेकोरपणे वापर टाळावा. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नोव्हेंबरपुर्वी कुठल्याही प्रकारच्या सिंथेटीक पायरेथ्रोईड, असिफेट, फिप्रोनील इत्यादी चा वापर करु नये. बोंडे लागण्याच्या अवस्थेत एक एकर क्षेत्रातून वेगवेगळया झाडांची 20 बोंडे तोडून ती फोडून पाहावी. खाली गळून पडलेली प्रादुर्भावग्रस्त पात्या, फुले व बोंडे गोळा करुन त्वरीत नष्ट करावीत. आर्थिक नुकसान पातळी (8 पतंग, कामगंध सापळा, दिन किंवा एक अळी,10 फुले किंवा एक अळी 10 हिरवी बोंडे) ओलांडल्यास तक्त्यात दिलेल्या रासायनिक किटनाशकांचा गरजेनुसार वापर करावा. स्वच्छ व निरोगी कापसाची स्वतंत्र वेचनी करुन विक्री अथवा योग्य साठवणूक करावी. तसेच किडग्रस्त कापुस त्वरीत नष्ट करावे. सुतगिरणी, जिनिंग मिलमध्ये साठवलेल्या किडग्रस्त कापसात सुप्तावस्थेत असलेल्या अळयांपासून निघनाऱ्या पंतगांना पकडण्यासाठी त्या परिसरात कामगंध अथवा प्रकाश सापळे लावावेत व जमा झालेले पतंग नष्ट करावे. फेरोमन सापळ्याचा वापर करावा

यासाठी एकरी दोन किंवा पाच फेरोमन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये 8 ते 10 पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे. फुलावस्थेत दर आठवड्याने पिकांमध्ये मजुरांच्या साहाय्याने डोमकळ्या शोधुन नष्ट कराव्या.

गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केलेली किटनाशके

सप्टेंबर महिन्यात किटकनाशक थायोडीकार्ब 15.8 टक्के डब्ल्युपी 25 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 25 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के 30 मिली किंवा इंडाक्साकार्ब 15.8 टक्के 10 मिली किंवा डेल्टामेंथीन 2.8 टक्के 10 मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच 5 टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझॉडीरेक्टीन 0.03 (300 पिपिएम) 50 मिली किंवा 0.15 टक्के (1500 पिपिएम) 25 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव 10 टक्क्यांच्यावर आहे, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव वाढू नये म्हणून क्लोरेंट्रानिलीप्रोल 9.3 टक्के अधीक लँब्डासायहॅलोथीन 4.6 टक्के 5 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के अधिक सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 14.5 टक्के अधिक ॲसीटामोप्रिड 7.7 टक्के 10 मिली या प्रमाणे फवारणी करून कापूस पिकाचे संरक्षण करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी श्री. डाबरे यांनी केले आहे.

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: managment of pink ballworm
Published on: 18 September 2021, 06:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)