उद्योजकीय व्यवस्थापन हा विषय आज प्रत्येक व्यवसायाचा कणा बनलाय , कोण म्हणतं या मराठी मातीला ते करता येत नव्हतं ?
मधल्या काळात इंग्रजांनी आपल्या पूर्वजांना नौकरीची चटक लावली तेवढा विषय जर सोडला तर हा मराठी मातीला उद्योजकीय वारसा महाराजांची चारशे वर्षांपूर्वीच देऊन ठेवलाय , तेच प्रिंसिपल्स आज मॅनेजमेंटच्या जाडया पुस्तकातून शिकवले जातात जे वागून दाखवलेत आपल्याला , फरक फक्त हा आहे कि आपण ते क्रुतघ्नासारखे विसरलोय !
आज काळ आहे आणि योग्य वेळ पण , त्यांचे परत एकदा पारायण करायची .
कॉमर्स फर्स्ट इअर ते MBA लास्ट सेमीस्टर पर्यंत सिलॅबस मध्ये या स्ट्रॅटर्जीज आपल्याला प्रत्येक ठिकाणी सापडतील .
START_EARLY:
बहुतेक यशस्वी व्यावसायिक लवकर सुरुवात करतात , अगदी कोवळ्या वयात , ही वेळ हाय रिस्क घेण्यासाठी सर्वोत्तम असते , जोश , एनर्जी , धडाडी तुफानाच्या लेवलला असते , जसं छत्रपतींनी कोवळ्या वयात स्वराज्याची शपथ घेतली रायरेश्वराच्या साक्षीने .
Leave_Comfort_Zone:
घरात सावलीत फेनखाली बसून , सोफ्यावर लोळत पडून , ऐशमध्ये आराम करत , मोबाईलवर टाईमपास करीत राहिल्याने प्रगती होत नसते ,
आपला कम्फर्ट झोन सोडून भटकावं लागतं , ऊन , वारा अंगावर झेलत विस्तारासाठी प्रगतीसाठी बाहेर पडावं लागतं , तेंव्हा कुठे तंजावर पर्यंत स्वराज्य विस्ताराचं स्वप्न पुरं होतंय ,
"घरबसल्या कमवा " सारख्या आमिषाला बळी पडले असते तर चाललं असतं का राजांना ?
मी माझ्या गावाच्या बाहेर कसा पडू ? असले पांचट विचार महाराजांनी केले असते तर स्वराज्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं असतं ! म्हणून काहीही झालं तरी घराच्या , गावाच्या बाहेर पडा !
आपला कम्फर्ट झोन कितीही गोड वाटत असला तरी , तो सोडा ! मगच प्रगती होईल .
नौकरी_हा_ट्रॅप_आहे .
बादशाहाची जहागिरी , सरदारकी केली असती तर जमलं नसतं काय ? पण नाही , माहिती होतं ,, "नौकऱ्या करून स्वतःचं भागेल " पण समाजाचं काय ? नौकरीत आपलं कर्तृत्व सिद्ध करायला भेटतं काय ? म्हणून राजांनी नोकरी केली नाही , स्वराज्याच्या उद्योगाचा पाया रोवला !
Aggrigator_business_Mode
इतरांच्या कुशलतेला फक्त एकत्र करून, मॅनेजमेंट लावून आपला मोठ्ठा भव्य बिझनेस ( आपलं राज्य ) उभं करणे हे मॉडेल अँग्रीगेटर मॉडेल म्हणवलं जातं .
Oyo च्या मालकीचं एकही हॉटेल नाही , OLA ची स्वतःची गाडी नाही , Zomato चं एकही हॉटेल नाही , Amazon चा एकही भव्य मॉल नाही , Facebook स्वतः एका ओळीचं कन्टेन्ट लिहीत नाही , यांनी काय केलेय ? ज्यांच्याकडे आहे त्यांना जमवलय ! आणि हजारो करोड चे मॉडेल उभे केलेत ,, हेच तर केलय ना महाराजांनी ! "अॅग्रीगेटर मॉडेल ऑफ मावळे " !
Low_cost_model_without_funding :
बऱ्याचदा मुलांची ही तक्रार असते कि , सरकार कर्ज देत नाही मग आम्ही व्यवसाय कशाच्या भरवशावर करायचाय ? आमच्या कडे जागा नाही , पैसा नाही , साधनं नाहीत ,
भावांनो ही Excuses झालीत , उद्योग हा , लो बजेट मध्येच अगदी चालू करायचा असतो. रायरेश्वराच्या मंदिरात पाच सात मावळेच होते , ते काही सोबत हत्ती वर खजिना घेऊन नव्हते फिरत , तरी पण करूच शकले ना ? का बसले रडत ?
कर्तृत्व सिद्ध केल्यावर तर मग मुद्रे वर पण छापली जातात अक्षरं , बघीतलं नाही काय ?
Lean Management:
जपानी लोकांनी अणबॉम्ब हल्ल्यात उद्वस्त झाल्यावर , थोडक्या जागेत , थोडक्या पैशात , कमीत कमी नुकसान करत व्यवसाय उभे करण्याची आणि व्यवस्थित चालवण्याची कला अवगत केली , आज ही पद्धत प्रत्येक इंडस्ट्री वापरते ज्याला Lean system म्हणतात ,
पण जपान्यांच्या अगोदर स्वराज्यात ती वापरली गेली,, कमीत कमी मावळे सोबत घेऊन लढाया करणे , साधनांचा सुयोग्य वापर करणे , यातूनच Lean system द्वारे स्वराज्याचं तोरण बांधलं गेले हे विसरतो आपण .
Bulid_it_on_need
समाजाच्या आजच्या गरजा प्रॉब्लेम ओळखून त्यावर ऊत्तम उपाय देणारा उद्योजक नेहमी यशस्वी आहे , यात सुद्धा मोठ्ठं उत्तर शोधण्याऐवजी मोठा प्रॉब्लेम शोधला पाहिजे असं तत्व सांगतं , त्याकाळी पण लहान प्रॉब्लेम असतीलच की ? पण महाराजांनी मोठा प्रॉब्लेम शोधला आणि आम्हाला गुलामीतून मोकळे केले .
हेच तर शिकवतं आपल्याला शिवतत्व
लोकांचा मोठ्ठा प्रॉब्लेम सोडवून हात मोकळे करा , मग ते तुम्हाला डोक्यावर घेतील .
Delegation_of_Responsibility
महाराजांची स्वतःची प्रबळइच्छाशक्ती प्रचंड होती हे सर्वमान्य आहे , पण वैयक्तिक पराक्रमाला मर्यादा येतात हेही तितकच खरंय , म्हणूनच छत्रपतींनी जिवाभावाचे शुर सरदार एकत्र केले , त्यांना जिम्मेदाऱ्या दिल्या त्या पूर्ण करवून घेतल्या , याला जिम्मेदाऱ्यांचं वाटप म्हणजेच Delegation of Responsibility म्हणतात , व्यवसाय वाढीचं हे महत्वाचं सूत्र आहे .
Z Theory :
तसं पाहिलं तर पगारावर माणसं ठेवायची , वापरायची आणि फेकून व दयायची अशी पद्धत पाश्चिमात्य राष्ट्रात आहे , त्यास X & Y Theory मध्ये विभागलं गेलंय , पण जपानी कंपन्या कामगारांना आयुष्यभराची जिम्मेदारी समजतात , त्यांना जपतात , म्हणून कर्मचारी पण मग तुफान निष्ठेनं कामं करतात .
अशी निष्ठाच मालकाला मोठं करते हे समजायला हवं , ही थेअरीच तानाजी मालुसरेंसारख्या आणि अन्य सरदारातून दिसली ना ?
या जगप्रसिद्ध Z थेअरीचे जनक छत्रपतीच म्हणावे लागतील .
Guriella_Marketing
खरं तर गनिमी कावा या युद्धकलेचं हे सेल्स आणि मार्केटिंग मैनेजमेंट स्वरूप आहे , आपल्या कडे पैशाची , मनुष्यबळाची ताकद कमी असताना पण मोठया मोठया स्पर्धकांच्या छातीत धडकी भरवरणाऱ्या कलात्मक जाहीराती करण्याचं कसब आहे , हे आ जरी मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना शिकवलं जातं तरी याची मुळे तिथे आहेत आपल्या गौरवशाली इतिहासात.
Contingency_Theory:
अफजलखानाने अचानक वार केला आणि सावध असणाऱ्या राजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला , ही जी कृती आहे , त्याला तीव्र प्रतिक्रियात्मक कृती म्हणतात , यूद्धकलेचा आणि उद्योजकीय निर्णय प्रक्रियेचा पाया यावर आहे , अक्कल हुशारी वेळेवर वापरणे याचा दाखला पण आपल्याला शिवचरित्रात मिळतो .
Appreciationo of Employees:
युद्धभूमीवर पराक्रम गाजवणाऱ्या सरदारांना जहागिऱ्या वाटप करणे म्हणजे त्यांनी केलेल्या कामाचं कौतूक होय , कॉर्पोरेट मध्ये सुद्धा उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ हे याचंच मॉडर्न रूप आहे .
Andon_lights
कामात व्यत्यय आला कि लाईट , आवाज करून सिग्नल मिळावा अशी व्यवस्था आजकालच्या मॅन्युफैक्चरिंग प्रोसेस मध्ये असते .
चारशे वर्षापूर्वी एक सिस्टीम अशीच होती , " राजे विशाळगडावर पोहचल्याची तोफांचे आवाज ऐकल्याचे समजेपर्यंत खिंड लढवत रहाणार " ही होती ती प्रतिज्ञा .
Published on: 19 February 2022, 07:58 IST