या कालावधीत पिकास ठिबकद्वारे पाणी पुरवठा शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा ल्याटरल मधील पाणी गरम झालेले नाही हे बघूनच पाणी पुरवठा करावा.ज्यावेळेस माती तापलेली असते व आपण पिकास पाणी देतो त्यावेळेस तापलेल्या मातीतील पाणीसुद्धा गरम होते व मुळांना इजा पोहचवते. यामुळे मूळकुज सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन झाड़े कोमेजु लागतात(यालाच आपण डंपिंग असे म्हणतो).हे टाळण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात 1)पाणी शक्यतो सकाळ/संध्याकाळ/रात्रीच्या वेळेस द्यावे.(लाईटची वेळनुसार)
2)ठिबक संचाच्या नळ्या व त्यातील पाणी ऊष्णतेने तापलेले असल्यास पाणी देणे थाबवावे.3)शक्य असल्यास (पिकाची अवस्था बघून)दररोज पाणी पुरवठा न करता एक दिवसाच्या अंतराने करावा. जेणेकरून पाण्याची बचत होऊन वाफसा राखण्यास मदत होईल व पाण्याचीही बचत होईल.4)पानी पुरवठ्या वेळी प्रति एकरी 3 kg गुळ + ट्राइकोडर्मा 2 kg ठिबकद्वारे दर 7 ते 8 दिवसाच्या अंतराने ऊष्णता कमी होइपर्यंत द्यावे.
सध्या राज्यात ऊष्णतेची लाट वाढत आहे.पारा 45 अंश सेल्सिअस च्या वर जाऊन आला आहे.या कालावधीत पिकास ठिबकद्वारे पाणी पुरवठा शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा ल्याटरल मधील पाणी गरम झालेले नाही हे बघूनच पाणी पुरवठा करावा.ज्यावेळेस माती तापलेली असते व आपण पिकास पाणी देतो त्यावेळेस तापलेल्या मातीतील पाणीसुद्धा गरम होते व मुळांना इजा पोहचवते. यामुळे मूळकुज सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन झाड़े कोमेजु लागतात(यालाच आपण डंपिंग असे म्हणतो).
Published on: 05 June 2022, 12:58 IST