Agripedia

कोथिंबीर ही रोजच्‍या आहारात वापरली जाणारी महत्त्‍वाची पालेभाजी आहे. भाज्‍यांचा स्‍वाद वाढविण्‍यासाठी कोथिंबिरीचा वापर करण्‍यात येतो. कोथिंबिरीची योग्यवेळी केल्यास आणि कोथिंबिरीच्या पिकाचे व्यवस्थापन व्यवस्थापन केल्यास आपल्याला चांगला दरदेखील मिळत असतो.

Updated on 07 May, 2021 11:34 AM IST

कोथिंबीर ही रोजच्‍या आहारात वापरली जाणारी महत्त्‍वाची पालेभाजी आहे. भाज्‍यांचा स्‍वाद वाढविण्‍यासाठी कोथिंबिरीचा वापर करण्‍यात येतो.  कोथिंबिरीची योग्यवेळी केल्यास आणि कोथिंबिरीच्या पिकाचे व्यवस्थापन व्यवस्थापन केल्यास आपल्याला चांगला दरदेखील मिळत असतो.

हवामान आणि जमीन

कोथिंबिरीची लागवड कोणत्‍याही प्रकारच्‍या हवामानात करता येते त्‍यामुळे अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्‍टड्ढातील हवामानात वर्षभर कोथिंबिरीची लागवड करता येते. कोथिंबिरीच्‍या पिकासाठी मध्‍यम कसदार आणि मध्‍यम खोलीची जमीन निवडावी. सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात असल्‍यास हलक्‍या किंवा भारी जमिनीत कोथिंबिरीचे पीक चांगले येते.

जाती

को-१, डी-९२ डी-९४, जे २१४, के ४५, करण इत्यादी जातींची लागवड करावी.

लागवडीचा हंगाम-

कोथिंबिरीची खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळी अशा तीनही हंगामात लागवड करतात. उन्‍हाळी हंगामात एप्रिल ते मे महिन्‍यात कोथिंबिरीचे उत्‍पादन घ्‍यावे.

 लागवड पध्‍दती –

कोथिंबिरीच्‍या लागवडीसाठी शेत उभे-आडवे नांगरून चांगले भुसभुशीत करून ३ बाय २ मीटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्‍यावे. प्रत्‍येक वाफ्यात ८ ते १० किलो चांगले कुजलेले शेणखत टाकून मिसळून घ्‍यावे. वाफे सपाट करून बी सारखे पडेल या बेताने फेकून पेरावे. बी, खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे. तणांचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात होत असल्‍यास सपाट वाफ्यांमध्‍ये १५ ते २० सेंमी अंतरावर खुरप्‍याने उथळ ओळी पाडून बी पेरावे आणि नंतर मातीने झाकून घ्‍यावे. उन्‍हाळी हंगामात पेरणीपूर्वी वाफे चांगले भिजवून घ्‍यावे आणि वाफसा आल्‍यावर बियाणे पेरावे.

 

कोथिंबिरीच्‍या लागवडीसाठी ऐकरी १० ते १२ किलो बी लागते. पेरणीपूर्वी बियाण्‍ाांवर चांगली उगवण होण्‍यासाठी प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. पेरणीपूर्वी धने फोडून बिया वेगळ्या कराव्‍यात यासाठी धने चपलेने अथवा लाकडी फळीने रगडून बी वेगळे करावे. तसेच पेरणीपूर्वी धन्‍याचे बी १२ तास पाण्‍यात ऊबदार जागी ठेवावे आणि नंतर लागवडीसाठी वापरावे. त्‍यामुळे उगवण १५ ते २० दिवसा ऐवजी ८ ते १० दिवसांत होऊन कोथिंबिरीच्‍या उत्‍पादनात वाढ होते आणि काढणी लवकर होण्‍यास मदत होते.

 खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन

कोथिंबिरीच्‍या पिकाच्‍या चांगल्‍या आणि जोमदार वाढीसाठी बी पेरताना हेक्‍टरी ३५ ते ४० गाड्या शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. कोथिंबिरीच्‍या पिकाला पेरणीच्‍या वेळी ५० किलो १५-५-५ हे मिश्रखत द्यावे. बी उगवून आल्‍यावर २०-२५ दिवसांनी हेक्‍टरी ४० किलो नत्र द्यावे. कोथिंबिरीचा खोडवा घ्‍यावयाचा असल्‍यास कापणीनंतर हेक्‍टरी ४० किलो नत्र द्यावे. कोथिंबिरीला नियमित पाणी देणे आवश्‍यक आहे.

 पीक संरक्षण

कोथिंबिरीवर फारसे रोग आणि किडी दिसून येत नाहीत. काही वेळा मर व भुरी रोगांचा प्रादुर्भाव होतो. शिफारशीनुसार फवारण्या करून त्यांचे नियंञण करावे.

 

काढणी आणि उत्‍पादन

पेरणीपासून दोन महिन्‍यांनी कोथिंबिरीला फुले येण्‍यास सुरुवात होते. म्‍हणून त्‍यापूर्वी हिरवीगार आणि कोवळी लुसलुशीत असताना कोथिंबिरीची काढणी करावी. साधारणपणे १५ ते २० सेंमी उंच वाढलेली परंतु फुले सृयेण्‍यापूर्वी कोथिंबीर उपटून अथवा कापून काढणी करावी. नंतर कोथिंबिरीच्‍या जुड्या बांधून गोणपाटात किंवा बांबूच्‍या टोपल्‍यांमध्‍ये व्‍यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्या.

English Summary: Management of vegetable farming, cilantro farming is important
Published on: 19 April 2021, 06:33 IST