वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रमुख्याने काकडी, कारले, दुधी भोपळा, घोसळी या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते.
लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसानंतर वेलीला वळण देणे व आधार देणे दर्जेदार आणि चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन मिळविण्याकरिता मेला मंडप किंवा तारेच्या ताटीच्या आधार देता येतो. वेलींना जर चांगला आधार मिळाला तर त्यांची वाढ चांगली होते.
1) आधारासाठी मंडप व ताटी पद्धत :
वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यामुळे फळे जमिनीपासून 4 - 6 उंचीवर वाढतात. फळे लोंबकळत राहत असल्याने त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो. फळांची तोडणी, औषध फवारणी ही कामे सुलभ होतात.
2) मंडप उभारणी :
1) मंडप उभारणी करताना डबांचा वापर करतात डबा कुजणारा नाही यासाठी डबांचा जो भाग जमिनीत गाडला जाईल त्यावर डांबर लावावे.
2) मंडप पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर 10 ते 12 फूट आणि दोन वेलीतील अंतर तीन फूट ठेवावे.
3) 20 ते 25 फूट अंतरावर पाट बांधणी सुतळीने करावी. सुतळीचा एक टोक वेलाच्या खोडाजवळ काठीच्या आधाराने बांधावे तर दुसरे टोक तारेस बांधावे.
4) वेलांची वाढ पाच फूट होईपर्यंत वेलाची बगलफूट व तानवे काढावे.मुख्य वेल मंडपावर पोचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा.
नक्की वाचा:ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानुसार महाराष्ट्रात चारही महिने पडणार पाऊस
3) हवामान व जमीन:
भोपळा, कारली, काकडी या सर्व वेलवर्गीय पिकांना उष्ण आणि कोरडे हवामान पोषक असते. या वेलवर्गीय पिकांना मध्यम ते भारी योग्य पाण्याचा निचरा होणारी जमिनीची निवड करावी.
4) पाणी व्यवस्थापन:
पिकांची उगवणी वेळेस जमीन ओलवावी तसेच उगवल्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाळी पाळीने पाणी द्यावे.
पिकांची नावे हंगाम सुधारित जाती बियाणे प्रमाण हेक्टरी (kg) पिकांचा कालावधी
दिवस - उत्पादन-टन
कारले एप्रिल-जून को - लॉग व्हाईट, फुले ग्रीन गोल्ड 2-2.5 180 - 180 - 200 - 20-25
दुधी भोपळा मार्च सम्राट, नवीन पुसा समोर, प्रोलिफिक लॉग 1 -15 100 -120 15 - 20
काकडी जानेवारी पुन खीर, हिमांगी, फुले शुभांगी पोन सेंट 1 - 15 100 - 120 15 - 20
दोडका कारली यापेक्षा दहा ते पंधरा दिवस उशिरा पुसा न्सदार, कोकण हरित फुले सुचेता 2 - 15 410 - 1500 15-20
तांबडा भोपळा अरका सूर्यमुखी, अरक
काढणी -
फळे कोवळी असतानाच काढणी करावी म्हणजेच बाजार भाव चांगला मिळतो.
Published on: 29 March 2022, 07:05 IST