Agripedia

महाराष्ट्रामध्ये आडसाली हंगामासाठी लागवड केलेल्या सर्व प्रचलित जातींवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. अनुकूल वातावरणामुळे आडसाली उसामधील ऊस संख्या, कांड्याची लांबी व गोलाईवर या रोगाचा परिणाम होतो. साहजिकच ऊस उत्पादन व उत्पादकतेवर परिणाम दिसून येतो. लागवडीसाठी रोगग्रस्त बेण्याचा वापर, नियंत्रण उपाययोजनांचा वेळीच अवलंब न करणे यामुळे उसावरील रोगाचे प्रमाण वाढते. उसाचे हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी तांबेरा रोगाचे सामूहिकरित्या प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

Updated on 30 June, 2021 6:19 AM IST

महाराष्ट्रामध्ये आडसाली हंगामासाठी लागवड केलेल्या सर्व प्रचलित जातींवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. अनुकूल वातावरणामुळे आडसाली उसामधील ऊस संख्या, कांड्याची लांबी व गोलाईवर या रोगाचा परिणाम होतो. साहजिकच ऊस उत्पादन व उत्पादकतेवर परिणाम दिसून येतो. लागवडीसाठी रोगग्रस्त बेण्याचा वापर, नियंत्रण उपाययोजनांचा वेळीच अवलंब न करणे यामुळे उसावरील रोगाचे प्रमाण वाढते. उसाचे हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी  तांबेरा रोगाचे सामूहिकरित्या प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खताची निर्मिती

काय असतात तांबेरा रोगाचे लक्षण

  • उसाच्या पानावर तांबेरा हा रोग पुनक्सिनिया मिल्यानोसेफिला व पुक्सिनिया कुहिनीय या दोन बुरशींमुळे होतो. ही बुरशी फक्त ऊस पिकावर उपजीविका करते.
  • आधी बुरशीचा प्रादुर्भाव पानांच्या दोन्ही बाजूस होऊन पानावर लहान, लांबट आकारांचे पिवळे ठिपके दिसतात.
  • कालांतराने ठिपके लालसर तपकिरी होतात. ठिपक्यांचा भोवती फिकट पिवळसर हिरवी कडा तयार होते.
  • पानांच्या खालच्या बाजूस ठिपक्यांच्या जागेवर उंचवटे तयार होतात. असे ठिपके फुटून नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. हवेद्वारे हे बिजाणू विखुरले जाऊन रोगाचा मोठ्या प्रमाणात दुय्यम प्रसार होतो.
  • रोगग्रस्त ठिपक्यांतील पेशी मरुन पाने करपतात. प्रकाश संश्लेषण क्रियेत येऊन उत्पादन घटते. साखर निर्मितीवर सुद्धा परिणाम होतो.

रोग वाढीस अनुकूल बाबी

  • सकाळचे धुके, दव व थंड वातावरण.

  • बळी पडणाऱ्या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड

  • नत्र खतांचा आडसाली उसाच्या जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरणे.

 

बुरशीचा जीवनक्रम व रोगाचा प्रसार

उसाच्या पानावर दवाच्या स्वरुपातील असलेले पाणी प्रामुख्याने रोगवाढीसाठी महत्त्वाचा व अनुकूल घटक आहे. पानावर ओलसरपणा असताना बिजाणू रुजून बुरशी तयार होते. ही बुरशी पानांच्या आंतरभागात प्रवेश करुन रोग निर्मिती करते. पानामध्ये रोगनिर्मिती  प्रक्रिया सुरू झाल्यापासून ३ ते ४ दिवसांत पानावर लहान, लांबट आकारांचे पिवळे ठिपके दिसतात. दोन आठवड्यात नारंगी  किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बिजाणून बाहेर पडतात. रोगाचा जीवनक्रम १० ते १२ दिवस इतक्या कमी कालावधीत पूर्ण होतो. प्रामुख्याने या रोगाचा  दुय्यम प्रसार हवेमार्फत व पाण्यामार्फत होतो. या रोगाचा प्रसार बेण्यामार्फत अगदी कमी प्रमाणात होतो. 

व्यवस्थापन

  • ऊस पिकाचे सर्वक्षण करुन, रोगांची लक्षणे, तीव्रता व पिकाची अवस्था पाहून उपाययोजना कराव्यात.

  • प्रतिबंधक शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.

  • निरोगी बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी वापरावे.

  • रोगप्रतिकारक्षम जातीची (को ८६०३२) लागवड करावी.

  • लागवडीसाठी रुंद सरी किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब केल्यास उसामध्ये सूर्य प्रकाश व हवेचे प्रमाण वाढून रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

  • नत्राची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

 

नियंत्रण

  • जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर(फवारणी प्रति लिटर पाणी)

  • मॅन्कोझेब ३ ग्रॅम अथवा टेब्युकोनॅझोल १ मि.ली.

  • गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करुन २-३ वेळा फवारणी करावी.

 

English Summary: Management of Tambera disease on sugarcane crop
Published on: 30 June 2021, 06:19 IST