Agripedia

खोडव्याचे उसाची योग्य निघा ठेवल्यास लागवड एवढेच उत्पादन मिळते. यामध्ये उसाची पाचट कुजवणे, त्याचे अंतर मशागत, वेळोवेळी खुरपणी, रासायनिक व सेंद्रिय खतांचा संतुलित वापर व पाण्याचे उत्तम नियोजन केल्यास ऊस खोडवा पासून चांगले उत्पादन हाती येते. या लेखात आपण ऊस खोडव्यासाठी खतांचे व्यवस्थापन कसे करावे हे पाहू.

Updated on 07 December, 2021 2:10 PM IST

खोडव्याचे उसाची योग्य निघा ठेवल्यास लागवड एवढेच उत्पादन मिळते. यामध्ये उसाची पाचट कुजवणे, त्याचे अंतर मशागत, वेळोवेळी खुरपणी, रासायनिक व सेंद्रिय खतांचा संतुलित वापर व पाण्याचे उत्तम नियोजन केल्यास ऊस खोडवा पासून चांगले उत्पादन हाती येते. या लेखात आपण  ऊस खोडव्यासाठी  खतांचे व्यवस्थापन कसे करावे हे पाहू.

 ऊस खोडवा साठी खत व्यवस्थापन

  • उसाच्या खोडव्याचे सरी मध्ये पाचट ठेवल्याने अर्धी रासायनिक खतांची मात्रा सरीच्या एका बाजूस पाडेगाव पद्धतीच्या पहारी द्वारे छिद्रेदेऊन पीक पंधरा दिवसाचे असताना द्यावे.
  • खोडव्यासाठी ची उरलेली रासायनिक खतांची अर्धी मात्रा सरीच्या दुसऱ्या बाजूस पहारीच्या साह्याने छिद्रेदेऊन पिक 130 ते 135 दिवसांचे असताना द्यावी. खतमात्रा देण्यासाठी पहारीद्वारे छिद्रेपुढच्या पासून दहा ते पंधरा सेंटिमीटर अंतरावर दहा ते पंधरा सेंटीमीटर खोल घ्यावीत खते देताना वापसा आवश्यक आहे. वापसा नसेल तर वाफसा आल्यानंतर खतमात्रा द्यावी.
  • लावणीच्या उसापेक्षा खोडवा उसास कमी खत मात्रा लागते. युरिया मधून दिलेला नत्र पाटपाण्यातून बऱ्याच अंशी वाहून जातो. काही प्रमाणात जमिनीत खोल झीरपतो. उरलेला काही भाग खोडव्याची मुळे ज्यात पर्यंत पोहोचतात  तेथून शोषला जातो. फॉस्फरस ची शिफारस केलेली मात्रा जमिनीतून दिली तरी त्याचे जमिनीत मोठ्या प्रमाणात शहरीकरण होते.त्यातून 20% उपलब्धता होते.
  • सर्वां अन्नद्रव्य जमिनीत च्या माध्यमातून दिली तरी जमिनीच्या सामु नुसार त्यांच्या परस्परात आंतरक्रिया घडतात. परिणामी पिकालाही अन्नद्रव्य मिळत नाहीत. त्यामुळे सर्व फुटव्यांचे पोषण होत नाही. वाढीच्या अवस्थेत मर होण्याची शक्यता असते. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता असते.
  • यामध्ये मुख्य अन्नद्रव्य म्हणजेच नत्र,स्फुरदआणि पालाश तसेच दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे पुरवठा करावा.त्याचा चांगला परिणाम दिसतो.युरिया,सिंगल सुपर फॉस्फेट,म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या फवारणीच्या द्रावणाची तीव्रतादोन ते तीन टक्के असावी. एक लिटर पाण्यात 22 ग्रॅम युरिया वीरघडवला तर एक टक्का नत्र द्रावण तयार होते.हे प्रमाण 4 टक्के झाले तर पिकाला हानिकारक होते. फवारणी केल्यानंतर केवळ 24 तासात 50 टक्के नत्र पानात शोषली जाते. पुढच्या 48 तासात 80 टक्के शोषून पूर्ण होते. यातील 35 टक्के नत्र कोवळ्या पालवीतराहते. उरलेले नत्र गरजेप्रमाणे वाहून नेला जातो.
English Summary: management of sugercane ratoon and fertilizer apply process to crop
Published on: 07 December 2021, 02:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)