असे केल्याने आपले शेतात ( कापुस पीकात ) मित्र किडची चांगला प्रमानात वाढ होते उदा. लेडी लिटील बर्डयासारख्या मित्रकिडीची मोठया प्रमानात वाढ होते तसेच क्रायसोपा गांधी ल माशी. सरफीड माशी प्रार्थना किटक (मेन्टीस ) रॉबरमाशी कातीन मित्रकिड सुद्धा वाढते हि किड तुडतुडे व बोडअळीची लहान अवस्थेवर आपली उपजीवीका करते यामुळे कापुस पिकाचे नैसर्गिक संरक्षण होते.
आवश्यकता असल्यास ५ % निंबोळी अर्क व 0.५% तंबाखु अर्कची फवारणी करावी. तंबाखु अर्क तयार करण्याची पद्धत१ किलो वांग्या तंबाखु किंवा तंबाखु दुकानात तंबाखुचा चुरा (भुगा) मिळतो (४०ते ८०रु) किलो या भावाने तो १ किलो घेवुन १० लीटर पाण्यात १२ तास भिजवावे व नंतर मिश्रन अर्ध होईपर्यतं उकळावे (५ लीटर राहील) व हे. मिश्रण २०० लीटर पाण्यात २ % निंबोळी अर्काबरोबर फवारनीसाठी वापरावे.
शेतकरी बांधव इमिडाक्लोप्रिड हे कीटकनाशक सतत वेगवेगळ्या स्वरूपात वापरतात.
उदाहरणार्थ पहिल्या फवारणी इ ,मिडाक्लोप्रिड%( साधे)
इमिडाक्लोप्रिड (सुपर)
इमिडा क्लोप्रिड (दाणेदार )
हे एकच किटकनाशक ३ प्रकारात मिळते ते शेतकरी बांधव नियमीत वापरतात यामुळे किटकात (रस शोषक ) प्रतिकारशक्ती निर्मान होते यामुळे नियंत्रन करणे कठीण जाते यासाठी हे टाळवे.
पिवळे व निळे चिकट सापळे शेतात लावावे टी आकाराचे बांबु पक्षी थांबे शेतात लावावे.
आवश्यकताच असेल तरच रासायनिक किटकनाशके वापरावे. व त्यासाठी हि काळजी घ्यावी रासायनिक किटकनाशक हे परत परत वापरू नये यांचा वापर अन्य कीटकनाशकांच्या पालटून पालटून करावा यामुळे कीटकांमध्ये विशेषता रसशोषक कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही यामुळे त्यांचे नियंत्रण करणे सोपे जाते गटातील सलग वापरु नये.
निओ निकोटिन गटातील किटकनाशके
इमिडाकलोप्रीड
एसीटामा प्राईड
थायोनिथाक्याम
क्लोथीयानीडिन
हि किटकनाशके प्रत्येक फवारणीत वापरल्या यामुळे किडींनमध्ये प्रतिकारशक्ती निर्मान होते यामुळे त्याचे पुढे नियंत्रन करणे कठीन जाते.
रासायनिक किटकनाशक वापरायचे असेल तर
१)बुप्राफेझीन २५ एससी २० मीली
फिप्रोनिल ५ एससी ३० मी ली
अॅसीफेट७५ एस.पी१० ग्रम
तर यापैकी एक किटकनाशक५ % निबोळी अर्क बरोवर वापरावे. १५ लीटर पंप साठी वापरावे. या प्रकारे कमी खर्चात एकात्मीक किडनियंत्रण दीर्घकालीन करता येते.
प्रवीण सरवदे- कराड
प्रतिनिधी गोपाल उगले
Published on: 31 August 2021, 10:04 IST