Agripedia

सोयाबीनची पेरणी होवून जवळ जवळ २० ते २५ दिवसांचा कालावधी झाला आहे बहुतेक भागात

Updated on 11 July, 2022 5:09 PM IST

सोयाबीनची पेरणी होवून जवळ जवळ २० ते २५ दिवसांचा कालावधी झाला आहे बहुतेक भागात चांगला पावूस होवून गेला आहे योग्य वाणाची पेरणी जमीनीच्या प्रकाराप्रमाणे आपण केली असणार यात शंका नाही तरीही या लेखाच्या निम्मीताने पुन्हा एकदा सांगु इच्छीतो ज्या शेतकयाची जमीन भारी आहे त्यांनी पसरट वाढणारे वाण जसे ३३५,२२८, फुलेसंगम यांची लागवड केली असेल तर जमीन मध्यम किंवा हलकी असल्यास ९३०५,९५६०,३३४४ या सारखा उभाट वाढणाऱ्या वाणांची लागवड केली असेल.

सर्व साधारण जमीनीचा प्रकार आणि वाण या नुसार पेरणीचे अंतर हलक्या जमीनी करिता ३० x १० cm मध्यम जमीनी करिता ४५ x १५ cm तर भारी जमीनी करिता ६०x१५ cm ठेवायला हवे.तणांचे व्यवस्थापन - आपल्या भागात सर्वसाधारण दुधी, मोठीदुधी, कुंजरू, जानवेल जंगली चवळी दिवालीया ही तणे मुखत्वे दिसतात या तणांच्या व्यवस्थापना करिता विडब्लॉक, परसुयेट, लगाम, फुजी फलेक्स, ओडीसी, शाकेद ही तणनशके रूदयापानाची व गवतवर्गीय तणे दोन्हीवर काम करतात.

१) फुजी फलेक्स ४००ml / एकर २० ते २५ दिवसा दरम्यान २) शाकेद ८००ml / एकर १८ ते २२ दिवसा दरम्यान३) आयरेस ४०० ml / एकर २० ते २२ दिवसा दरम्यान४) ओडीसी ४० g / एकर २० ते २५ दिवसा दरम्यानसोयाबीनच खत व्यवस्थापनप्रती एकरी N (नत्र) १० kg : P (फोस्पोरस) २५ kg k (पोटॅश) १० kg सल्फर ८ kgसोयाबीन पेरणी पुर्वी खत दिल्यास दहा दिवस अगोदर ७५ kg SSP ३० kg DDP : १५ kg MOP तर पेरणीनंतर १५ दिवसानी DAP ५० kg MOP 15 kg सल्फर १० kg

पेरणीसोबत खतांचा वापर करणे टाळावे.

किड रोग व व्हायरस व्यवस्थापनखोड किडा :- मागील चार ते पाच वर्षापासुन या कोडीचा त्रास मोठया प्रमाणावर वाढला आहे सोयाबीन ३ ते ५ पानावर असताना पानावर या किडीचा मादी पतंग अंडी घालतो अंडयातुन अळी बाहेर पडताच पानाच्या शीरेव्दारे खोडात शिरते. अन्नपुरवठा न झाल्याने झाड सुकु लागते. ४ किलो थायमेट पेरणी सोबत दयावे किंवा क्लोरोपायरीफॉस किंवा थायोमेथाक्झामची फवारणी करावी.

English Summary: Management of soybean virus, weevil, weevil, other larvae
Published on: 11 July 2022, 05:09 IST