Agripedia

सोयाबीन हे राज्यातील कोरडवाहू क्षेत्रातील महत्वाचे नगदी पीक असून विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने या पिकावर अवलंबून आहे.

Updated on 15 June, 2022 5:04 PM IST

सोयाबीन हे राज्यातील कोरडवाहू क्षेत्रातील महत्वाचे नगदी पीक असून विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने या पिकावर अवलंबून आहे.मागील काही वर्षात सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत असून सुमारे ३८ लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात येते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर अपारंपरिक विषाणूजन्य पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव पिकवाढीच्या कालावधीमध्ये आढ्ळून आला आहे. येत्या खरीप हंगामात या रोगांपासून पिकाचे होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रादुर्भावाची कारणे, प्रसार, लक्षणे व व्यवस्थापनाबाबत शास्त्रीय माहिती घेणे आवश्यक आहे

पिवळा मोझेक :- प्रादुर्भावाची कारणे आणि प्रसार हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे उद्भवतो.सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषाणूग्रस्त झाडांपासून पांढरी माशी या किंडीद्वारे या रोगाचा प्रसार होतो.या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पर्यायी पिकांवर तोजिवंत राहून सोयाबीन पिकावर संक्रमित होतो.या रोगास बळी पडणा-या वाण/जातीची लागवड केल्याने या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. जेएस ३३५ हा वाण या रोगास बळी पडतो.लक्षणे - सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकटनेिस्तेज, पिवळे ठिपके/चट्टे दिसतात. 

कालांतराने ठिपक्यांच्या/ चट्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा -हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस-करपट रंगाचे ठिपके दिसतात.रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेर्डीवाकर्डी होऊन त्यांचा आकार लहान होतो.रोगग्रस्त झाडांवरील शेंगाची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाने भरतात किंवा संपूर्ण शेंगा दानेविरहीत व पोचट उपजतात आणि पर्यायाने उत्पादनात लक्षणीय घात येते.एकात्मिक व्यवस्थापनपेरणीसाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा. तसेच रोग प्रतिकारक वाण/जात उदा. जेएस २0-२९, जेएस २0-६९. जेएस ९७-५२ इत्यार्दीची लागवड़ करावी.सोयाबीन पिकाबरोबर मका किंवा तूर ही आंतरपिके घ्यावीत.

शेत तणमुक्त ठेवावे.शेतात या रोगाची लागण दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.पिवळा मोझंक या रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होत असल्याने या किंडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.श्रयामिश्राँक्झाम ३g टक्के एफ.एस. या किंटकनाशकाची १0 मेिं लेि प्रतेि केिली बेिंयाणे या प्रमाण बीजप्रक्रया करावों.पीक पेरणीनंतर ३५ दिवसांनी 0.५ ट्क्के निंबोळी अर्काची फवारणीं करावों.ट्रायझोफाँस ४५ ईसी १६ मि.लेि. प्रति १0 लीटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी.पांढरी माशीचा पुन्हा उद्रेक टाळण्यासाठी सिंथेटीक पायरेश्रॉइड किंटकनाशकांची फवारणी करु नये.१२ इंच x १० इंच आकाराचे हेक्टरी १० ते १५ पिवळे चिकट सापळे लावावेत.

English Summary: Management of soybean crop Management of yellow mosaic disease on soybean
Published on: 15 June 2022, 05:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)