कुठलेही काम हे वेळेतच पूर्ण करणे कधीही फायद्याचे असते. हीच गोष्ट शेतीमध्ये सुद्धा तंतोतंत लागू पडते. जास्त लवकर किंवा उशिरा कुठलेही काम जर वेळेच्या आधी किंवा नंतर केले तर त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. हेच तत्व भाजीपाला पिकांच्या बाबतीत देखील लागू होते. या लेखात आपण नोव्हेंबर महिन्यात भाजीपाला वर्गीय पिकांची कोणती कामे पूर्ण करावीत? याबाबतची माहिती घेणार आहोत.
नोव्हेंबर मध्ये भाजीपाला वर्गीय पिकांची करायवयाची कामे
कांदा
- रब्बी कांद्याची पुनर्लागण तसेच कांद्याची बियाण्यासाठी ची लागवड पूर्ण करावी.
- रब्बी उन्हाळी कांद्याचे रोपासाठी बी पेरावे.
लसुन
- वर खतांपैकी राहिलेली नत्राची मात्रा ¼ हेक्टरी 25 किलो द्यावी.
- फुल एचडी किंवा टाटा च्या किडीच्या नियंत्रणासाठी पाकळ्या उगवण झाल्यानंतर हेक्टरी दहा किलो थीमेट 10जी किंवा कार्बोफ्युरॉन 10 जी ही कीटक नाशके वाफ्यात टाकून द्यावी. तसेच दर 10 ते 15 दिवसांनी डायमिथोएट 10 मिली शिवा इंडोसल्फान 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10 मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. फवारणीच्या द्रावणात चिकट औषध मिसळावे.
टोमॅटो
- हेक्टरी 25 टन चांगले कुजलेले शेणखत पसरून जमीन उभी-आडवी नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी.
- सरी वरंब्यावर 60 बाय 45 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी. लागवडीपूर्वी वरखते हेक्टरी नत्र, स्फुरदव पालाश प्रत्येकी 50 किलो द्यावी. पुनर लागवडीपूर्वी अझोटोबेक्टरची पाच पाकिटे प्रति 50 लिटर पाण्यातील द्रावणात बुडवून लागवड करावी.
पानकोबी
- सपाट वाफ्यात 30 बाय 30 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी.
- लागवडीपूर्वी रोपांची मुळे दोन टक्के सुफला (15:15:15)च्या द्रावणात बुडवावीत.
- हेक्टरी 40 ते 50 बैलगाडी भर खते वापरावे.वरखते लागवडीपूर्वी हेक्टरी नत्र,स्फुरद व पालाश प्रत्येकी 75 किलो द्यावे.
बटाटा
1-हेक्टरी 50 किलो नत्राची दुसरी मात्रा देऊन पिकाला भर द्यावी.
पालेभाजी
1- पालक,मेथी,कोथिंबीर,चाकवत,राजगिरा,शेपूइत्यादी पालेभाज्यांची काढणी करावी.
Published on: 21 November 2021, 07:26 IST