कुठल्याही पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी संबंधित पिकांचे बियाणे किंवा रोप निरोगी, सक्षम असेल तर येणारी उत्पादन देखील चांगली मिळते.एवढेच नाही तर निरोगी रोपांची लागवड केली तर येणार्या काळात पिकांवर रोगजंतूंचा तसेच विविध प्रकारचे कीटकांचा देखीलप्रादुर्भाव कमी असतो. म्हणून निरोगी रोपे हे पिकाच्या चांगल्या उत्पादनाचे सूत्र आहे. या लेखात आपण या रांगड्या कांद्याचे रोपवाटिका आणि रांगड्या कांद्याचे पुनर्लागवडीसाठी तयारी याबाबत माहिती घेऊ.
रांगडा कांदा रोपवाटिका
एक हेक्टर क्षेत्रासाठी पाचगुंठे रोपवाटिका पुरेशी असते.त्यासाठी अर्धा टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून एक मीटर रुंद व 10 ते 15 सेंटिमीटर उंचगादीवाफे तयार करावेत. तणनियंत्रणासाठी पेरणीपूर्वी पेंडीमेथिलिन 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
बीजप्रक्रिया- कार्बेन्डाझिम एक ते दोन ग्रॅम प्रति किलो बियाणे.
मर रोग नियंत्रण- ट्रायकोडर्मा व्हिरिडी1250 प्रति हेक्टरी वापरावे.
- प्रति पाच गुंठे रोपवाटिकेसाठी पेरणीपूर्वी नत्र,स्फुरद, पालाश 4:1:1 किलो प्रमाणे वापर करावा.
- दोन ओळींमध्ये पन्नास मी मी किंवा 75 मी अंतर ठेवून बियाण्याची लागवड करावी. त्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरून बियाणे झाकावे.त्यानंतर हलके पाणी द्यावे.
रांगडा कांद्याचे पुनर्लागवडीसाठी तयारी
1-नांगरणी करून, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी.
- हेक्टरी 15 टनशेणखतकिंवासाडेसातटनकोंबडीखतकिंवा साडेसात टन गांडूळ खत जमिनीत चांगले मिसळून द्यावे.
- एकशे वीस सेंटीमीटर रुंद, 15 सेंटिमीटर उंच गादीवाफे तयार करावेत. दोन वाफ्यामध्ये 45 सेंटिमीटर अंतर ठेवावे.
- पुनर लागवडीसाठी हेक्टरी एकशे दहा किलो नत्र, 40 किलो स्फुरद,चाळीस किलो पालाश खतांची शिफारस आहे.माती परीक्षणानंतर गंधकाचे प्रमाण जाणून घ्यावे.
- गंधकाचे प्रमाण हेक्टरी 25 किलो पेक्षा जास्त असल्यास हेक्टरी 15 किलो गंधक द्यावे. ते 25 किलो पेक्षा कमी असल्यास हेक्टरी 30 किलो गंधक देणे अपेक्षित आहे.त्याचे योग्य नियोजन करावे.
- नत्र 40 किलो, संपूर्ण स्फुरद, संपूर्ण पालाश या प्रमाणात पूर्ण लागवडीवेळी मात्रा द्याव्यात. उर्वरित नत्र खते दोन हप्त्यात विभागून पुढे 30 आणि 45 दिवसांनी द्यावी.
- अझोस्पिरिलम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू ( पी एस बी ) प्रत्येकी पाच किलो प्रति हेक्टर या प्रमाणात देण्याची शिफारस आहे.
Published on: 25 November 2021, 09:33 IST