Agripedia

कांदा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिका व तिचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणे फार महत्त्वाचे असते. कारण निरोगी आणि सुदृढ रोपांवरच पुढील कांद्याचे उत्पादन अवलंबून असते.त्यामुळे कांद्याच्या रोपवाटिकेचे व्यवस्थापन हे शास्त्रीय पद्धतीने आणि व्यवस्थित करणे फार महत्त्वाचे असते. या लेखामध्ये आपण उन्हाळी कांद्याच्या रोपवाटिकेचे व्यवस्थापन कसे करावे हे पाहणार आहोत.

Updated on 26 September, 2021 3:23 PM IST

 कांदा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिका व तिचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणे फार महत्त्वाचे असते. कारण निरोगी आणि सुदृढ रोपांवरच  पुढील कांद्याचे उत्पादन अवलंबून असते.त्यामुळे कांद्याच्या रोपवाटिकेचे व्यवस्थापन हे शास्त्रीय पद्धतीने आणि व्यवस्थित करणे फार महत्त्वाचे असते. या लेखामध्ये आपण उन्हाळी कांद्याच्या रोपवाटिकेचे व्यवस्थापन कसे करावे हे पाहणार आहोत.

 उन्हाळी कांदा रोपवाटिका व्यवस्थापन

 साधारण दहा ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात रब्बी कांदा रोपवाटिकातयार करणे महत्त्वाचे असते.जर आपल्याला एक एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड करायची असेल तर दोन गुंठे क्षेत्र रोपवाटिकेसाठी निवडणेआवश्यक असते. जर बियाण्याचा विचार केला तर त्यासाठी दोन ते तीन किलो बियाणे लागते. रोपवाटिकेसाठी शेत तयार करताना खोल नांगरट करून घ्यावी.अगड केल्यानंतर त्या ठिकाणाचे पिकांची धसकटे, काडी कचरा व तन तसेच दगडगोटे काढून टाकावेत. त्यामध्ये दोन क्विंटल चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. रुपासाठी गादीवाफे तयार करताना साधारण दहा दहा ते पंधरा सेंटिमीटर उंच व एक मीटर रुंद  व शेताच्या उतारानुसारगादी वाफ्याची लांबी ठेवावी.

तणनियंत्रणासाठी दादी वाफ्यानंवर पेंडीमेथिलिन 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. पेरणीपूर्वी बियाण्यास दोन ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. मर रोगाच्या प्रतिबंधासाठी 500 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडीहे जैविक बुरशीनाशक वापरावे.पेरणीपूर्वी 200 वर्ग मीटर क्षेत्रातनत्र,स्फुरद, पालाश यांचे प्रमाण अनुक्रमे 1600:400:400 ग्राम याप्रमाणे खते द्यावी.बियाण्याची पेरणी जवळ जवळ एक ते दीड सेंटिमीटर खोलीवर करावी. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने  बियाणे झाकावे.त्यानंतर थोडे पाणी द्यावे.पेरणीनंतर 20 दिवसांनी हाताने खुरपणी करावी. खुरपणी झाल्यानंतर नत्र 800 ग्राम 200 वर्ग मीटर या प्रमाणात द्यावे.

 रोपवाटिकेतील पीक संरक्षण कसे करावे?

 

 मररोग - मेटॅलेक्सिल+ मॅन्कोझेब( संयुक्त बुरशीनाशक) दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी द्रावण करून रोपांच्या ओळीत ओतावे.

2-काळा करपा- मॅन्कोझेब दोन ग्रॅम

3- जांभळा व तपकिरी करपा –ट्रायसायकॅलॉझोलएक ग्रॅम किंवाहेक्साकोनेझोल 1 मिली फवारणी प्रति लिटर पाणी फवारावे

4- फुलकिडे-फिप्रोनील एक मिली किंवा प्रोफेनोफॉस एक मिली किंवा कार्बोसल्फान 2 मिली प्रति लिटर फवारणी करावी.

 

English Summary: management of onion crop nursury and techniqe
Published on: 26 September 2021, 03:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)